महाराष्ट्रात महिला असुरक्षितच!
राज्यात महिलांची स्थिती दिवसेंदिवस असुरक्षितच आहे. बिहार हे राज्य महिला अत्याचारात कोणे एकेकाळी पहिल्या क्रमांकावर होते, पण दुर्दैवाने सरकारी नाकर्तेपणामुळे बिहारालाही महाराष्ट्राने मागे टाकले आहे.
ज्या राज्यात महिला व बालविकास विभागासाठी देण्यात आलेले 221 कोटी हे राज्यावरील आर्थिक भार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांना वाटते, तर दुसरीकडे एका मुलीवर होणारा गुन्हा डोळ्यांदेखत बघून लोक साक्ष द्यायला धजावत नाहीत. कल्याणी महिला बालविकास आश्रमात संशयास्पद घटना घडत असल्याची तक्रार घटनेआधी सहा महिने नोंदविली जाते आणि पोलीस त्याकडे दुर्लक्ष करतात. देशात 1 लाख 99 हजार 171 महिलांवरील अत्याचाराची नोंद आहे. याचाच अर्थ देशात महिलांना 50 टक्के आरक्षण मिळते, पण तिचे ‘रक्षण’ हा आजही एक प्रश्न आहे! कल्याणी महिला व बालविकास आश्रमातील मतिमंद मुलींवरील बलात्कार, नागपूरचे मोनिका प्रकरण किंवा गोंदियातील आदिवासी गोवारी समाजातील 13 वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि हत्या...आजही महिलांवर पाशवी अत्याचार सुरू आहेत आणि डोळ्यांदेखत घडलेल्या या नाट्याची साक्ष देण्यासाठी लोक धजावत नाहीत. महाराष्ट्राचा बिहार झालाय! राज्याचा 2010-2011च्या आर्थिक पाहणी अहवालात देण्यात आलेली स्त्रियांवरील अत्याचाराची आकडेवारी महाराष्ट्राचा बिहार होतोय याला पुष्टी देते. पुरोगामी महाराष्ट्रात स्त्रियांवर होणारे अत्याचार बिहारपेक्षाही अधिक असल्याचे यातून स्पष्ट होते. आश्चर्याची बाब म्हणजे आजही राज्यात महिलांचे हुंडाबळी जात आहेत. 2008 पेक्षा 2009 साली हुंड्यासाठी होणार्या खुनांमध्ये आणि खुनाच्या प्रयत्नांमध्ये वाढ झाल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. 2009 साली हुंड्यासाठी 217 खून झाले, तर हुंड्यासाठी खून करण्याचा प्रयत्न केल्याच्या 155 गुन्ह्यांची नोंद आहे. सासू-सुनेचे नाते बदलल्याच्या सीरियल पाहणार्या राज्यात पती-पत्नीच्या नातेवाईकांकडून होणारे अत्याचाराचे प्रमाण सर्वाधिक आहे. घराबाहेर पडलेली स्त्री स्वत:च्या घरात आजही सुरक्षित नसावी हे दु:ख आहे. लैंगिक अत्याचाराच्या प्रमाणातही वाढ झाली असून 2009 साली राज्यात लैंगिक अत्याचाराचे 1099 गुन्हे दाखल करण्यात आले. या अहवालात हिंदुस्थानातील निवडक राज्यांच्या सामाजिक व आर्थिक निर्देशकांच्या आकडेवारीत बिहारमध्ये 8803 तर महाराष्ट्रात 15,048 महिलांवर अत्याचार झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. ही आकडेवारी अधिकही असू शकेल कारण जबरी चोरी, खून यात बळी गेलेल्या स्त्रियांची गणना स्त्रियांवरील अत्याचारात होत नाही. तसेच बालकांवर होणार्या अत्याचाराचे प्रमाणही राज्यात बिहारपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्रात बालकांवरील 2894 गुन्हे, तर बिहारमध्ये 1016 गुन्हे झाल्याचे या अहवालात नोंद करण्यात आले आहे. राज्यातील बालकांवरील अत्याचारांमध्ये सर्वाधिक गुन्हे हे बलात्काराचे आहेत. 2009 साली 612 बालकांवर बलात्काराचे गुन्हे नमूद करण्यात आले आहेत. नुकतेच लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराबाबत विधेयक आले आहे. स्त्रियांवरील अत्याचारासाठी समाजाची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे महिला दिनादिवशी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते. त्यासाठी त्यांनी वेगळी बैठक घेण्याचेही आश्वासन दिले. पाहूयात त्यावेळी काही मार्ग निघतो का? गुन्हे - महाराष्ट्र
बलात्कार 4.3 6.9अपहरण आणि पळवून नेणे 7.7 3.6हुंडाबळी 15.4 4.1पती-पत्नीच्या 2.8 8.6नातेवाईकांकडून अत्याचार विनयभंग 1.9 8.3लैंगिक अत्याचार 0.1 10.0अनैतिक व्यापार 1.6 11.0 -
No comments:
Post a Comment