काश्मीरमध्ये लष्करी जवान शहीद
दक्षिण काश्मीरमध्ये सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये मंगळवारी झालेल्या घनघोर चकमकीत एक लष्करातील एक जवान शहीद झाला, तर हिजबुल मुजाहिदीनचा एक दहशतवादी ठार झाला. श्रीनगर- दक्षिण काश्मीरमधील त्राल शहराजवळ सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये मंगळवारी झालेल्या घनघोर चकमकीत लष्करातील एक जवान शहीद झाला. हिजबुल मुजाहिदीनचा एक दहशतवादीही या चकमकीत ठार झाला. त्राल शहराजवळील दादसर गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यामुळे पोलिसांनी 42 राष्ट्रीय रायफल्सच्या तुकड्यांच्या मदतीने शोधमोहीम हाती घेतली होती. दहशतवादी लपून बसलेल्या घरात सुरक्षादलांनी प्रवेश करताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. यात पोलिस उपनिरीक्षक नोर्बो आणि लष्कराचा एक जवान शहीद झाला. सुरक्षादलांनी प्रत्युत्तरादाखल जोरदार गोळीबार सुरू केला. सुमारे दोन तास चाललेल्या धुमश्चक्रीत एक दहशतवादी मारला गेला, तर दहशतवादी घरातून पळून गेले. या दहशतवाद्यांनी जवळच्याच एखाद्या घरात आश्रय घेतला असावा, असा संशय व्यक्त केला. त्यामुळे परिसरात जोरदार शोध चालू आहे.

No comments:
Post a Comment