Total Pageviews

Tuesday, 5 April 2011

ANNA HAZARE FAST UPTO DEATH AGAINST CORRUPTION STORY 16

ANNA HAZARE FAST UPTO DEATH AGAINST CORRUPTION STORY 16

WILL PUBLISH ARTICLES REGLARLY ON CORRUPTION IN INDIA . PASS ON TOAS
MAY HONEST INDIANS AS POSSIBLE

भ्रष्टाचाराच्या मुद्यांवर पुन्हा एकदा रणशिंग फुंकले
अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्यांवर पुन्हा एकदा रणशिंग फुंकले आहे. नुसतेच रणशिंग फुंकले नाही, तर प्राण पणास लावण्याचीही घोषणा केली आहे. यावेळी अण्णांनी प्राण पणास लावण्यासाठी दिल्लीची निवड केली आहे. अण्णासाहेब एप्रिलपासून दिल्लीत उपोषणाला बसणार आहेत लोकपाल विधेयक मंजुरीशिवाय महाराष्ट्रात परतणार नसल्याचा वज्रनिर्धार त्यांनी केला आहे. ‘‘भ्रष्टाचारविरोधी लोकपाल विधेयकासाठी दिल्लीत जंतरमंतर येथे एप्रिलला मी उपोषण करणार आहे आणि प्राण गेला तरी चालेल, पण हे विधेयक मंजूर झाल्याशिवाय महाराष्ट्रात परतणार नाही,’’ असे अण्णा यांनी सांगितले आहे. अण्णा यांनीचले जाव सांगितले आंदोलन केले तर किती लोक त्यांचे ऐकतील भ्रष्ट सरकारविरुद्ध लढाईस सिद्ध होतील, हा प्रश्‍नच आहे! माहितीच्या अधिकारामुळे भ्रष्टाचाराची माहिती मिळते, मात्र भ्रष्ट मंत्री आणि अधिकार्‍यांना कठोर शिक्षा होत नाही. त्यासाठी भ्रष्टाचार्‍यांना जन्मठेप फाशी अशी कठोर शिक्षा देणारे लोकपाल विधेयक झालेच पाहिजे त्यासाठी जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवा, असे आवाहन अण्णा नी केले. त्या आवाहनामुळे लोक घराघरांतून बाहेर पडले झुंडीच्या झुंडी जेलच्या दिशेने निघाल्या असे नाही. क्रिकेटचा विश्‍वचषक जिंकताच सारा देश रस्त्यावर उतरतो आनंदाचा धिंगाणा घालतो, पण भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढ्यात रस्त्यावर चिटपाखरूही उतरत नाही. हे असे का व्हावे? याचा विचार दिल्लीच्या जंतरमंतर रोडवर बसून अण्णांनी करायचा आहे. अण्णांचा हेतू चांगला आहे, विचार चांगला आहे, पण त्यांच्याजेल भरो लढ्याचे काय होणार याचीच चिंता वाटते.  अण्णांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात सातत्याने आवाज उठविला. अनेक लढे दिले. त्यात यश मिळवले. त्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेतली गेली. पण त्यांचे आजवरचे लढे प्रामुख्याने भ्रष्ट नेत्यांपुरते आणि महाराष्ट्रापुरते होते. आता भ्रष्टाचाराचा राक्षसच गाडण्याचा त्यांचा निर्धार आहे. त्यासाठी त्यांनी थेट दिल्लीत ठाण मांडले आहे. भ्रष्टाचार सर्वांनाच नको आहे. त्याचे निर्मूलन व्हावे असे प्रत्येकाला वाटते. तरीसुध्दा भ्रष्टाचार अपरिहार्य आहे, तो संपवता येणार नाही, अशी अगतिकतेची भावनासुध्दा मनात कुठेतरी घर करून बसली आहे. अण्णांच्या ताज्या आंदोलनाने असहाय्यतेचे ते मळभ नक्कीच दूर केले. भ्रष्टाचाराचा राक्षस कायमस्वरूपी गाडला जाऊ शकतो असा विश्‍वास भारतीयांमध्ये निर्माण झाला आहे. त्यांच्या आंदोलनाला देशभरातून जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे त्यावरून त्याची प्रचीती येते. हा लढा एकट्या अण्णांचा किंवा त्यांना पाठिंबा देणार्‍या किरण बेदी, अरुण कजरीवाल, यांसारख्या काही समाजधुरिणांपुरता मर्यादित नाही, तो समस्त भारतीयांचा झाला आहे. सरकारने वेळीच त्याची दखल घ्यायला हवी, अन्यथा या ज्वालेचे रूपांतर वणव्यात होईल आणि देश पेटून उठेल. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि युपीएच्या नेत्या सोनिया गांधी यांचाही लोकपाल विधेयक संमत करून घेण्याचा इरादा आहे. या विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी मंत्री गटाची स्थापनाही त्यांनी केली. मात्र ज्यांच्यावर सतत भ्रष्टाचाराचे आरोप होत असतात ते शरद पवार, स्पेक्ट्रम घोटाळ्यात दमडीचाही गैरव्यवहार झाला नसल्याची ग्वाही देणारे कपिल सिब्बल, सत्तेच्या गैरवापराबद्दल ख्याती असलेले वीरप्पा मोईली यासारख्या मंत्र्यांचा त्यात समावेश असल्याने सरकारचा हेतूच संशयास्पद ठरतो. लोकपाल विधेयकाचा आदर्श नमुना ते कसा सादर करू शकतील? तो मसुदा सोनियाजींच्या नेतृत्वाखालील समितीनेसुध्दा फेटाळून लावला आहे. आता तरी सरकारने जागे व्हावे. अण्णा हजारे त्यांच्या सहकार्‍यांनी जन लोकपाल विधेयकाचा मसुदा सादर केलेला आहे. तो पूर्णत: स्वीकारता येत नसेल तर या क्षेत्रात कार्य करणार्‍या जाणकारांना विश्‍वासात घ्यावे. सर्वानुमते योग्य ठरेल असे विधेयक तयार करावे. आजवर गमजा खूप झाल्या. आता ठोस कृती करायला हवी. त्याशिवाय महाराष्ट्रात परतायचे नाही अशी प्रतिज्ञा अण्णांनी केली आहे. हा कोणा व्यक्तीचा किंवा समूहाचा नव्हे, देशाच्या हिताचा, भवितव्याचा प्रश्‍न आहे. त्यासाठी संपूर्ण देश कटिबध्द झाला आहे.  

No comments:

Post a Comment