देशासाठी, मानवतेसाठी आणि काश्मिरी संस्कृतीसाठी मतदान करणार्या् काश्मिरी नागरिकांचा आवाज ऐकला पाहिजे, त्यांच्याविषयी आत्मीयता दाखविली पाहिजे की पाकिस्तानी पैशावर गिलानीसारख्या देशद्रोह्याच्या चिथावणीवरून दगडफेक करणार्याी मूठभर जिहादी लोकांचे ऐकले पाहिजे? जर जिहादचा मार्ग स्वर्गापर्यंत घेऊन जाणारा आणि ‘पवित्र’ आहे, तर त्या मार्गावर केवळ गरीब मुसलमानांच्या मुलांनाच का लोटले जाते? गिलानी आणि अन्य जिहादप्रेमी नेत्यांची मुले मुंबई, बंगळुरू आणि विदेशात शिकणार आणि सुखासीन जीवन जगणार आणि स्वर्गाचा खुळखुळा हाती देऊन मृत्यूच्या मार्गावर लोटले जाणार केवळ गरिबांची मुले? या जिहादी नेत्यांपेक्षा अधिक भेकड, भित्रे आणखी कोण असू शकेल? आपल्याच प्रजेचा विश्वासघात करण्यासही ते मागे-पुढे पाहात नाहीत.
काश्मीरवर कुणी राज्य केले? या विषयावर हे टीकाकार तोंडातून चकार शब्दही काढत नाहीत. मी हिशोब केला तेव्हा असे आढळून आले की, केवळ अब्दुल्ला परिवाराने, शेख अब्दुल्ला, फारुख आणि ओमरने एकूण २९ वर्षे ७९ दिवसपर्यंत सत्ता उपभोगली. या २९ वर्षांच्या अब्दुल्ला-शाही काश्मीरची काय अवस्था झाली? यांच्या राजवटीमुळेच तर दगडफेक करणार्यांअची जमात अस्तित्वात आली. आजोबा, मुलगा आणि नातू यांनी काश्मिरी मुसलमानांचा विकास केला, त्यांना नोकर्याु दिल्या, रस्ते, वीज, पाणी उपलब्ध करून दिले की, मीरवाईज आणि गिलानीसारखे नेते त्यांच्या माथी मारले?
अब्दुल्लाशाहीशिवाय काँग्रेस आणि त्यांना पाठिंबा देणार्या पक्षांची २५ वर्षे जम्मू-काश्मीरवर सत्ता होती. या ५४ वर्षांत काँग्रेस अथवा अब्दुल्लांनी जम्मू-काश्मिरात अशा पद्धतीने सत्ता राबविली की जम्मू आणि लडाख भागातील जनता अतिशय त्रस्त होऊन गेली. लोकसंख्या आणि भूभाग मोठा असूनही खोर्याततील मूठभर वहाबी-सुन्नी मुसलमानांचा एक वर्ग संपूर्ण काश्मीरला विनाशाच्या खाईत लोटत असतो. विदेशी धन आणि विदेशी विचारांनी संचालित ‘दगडफेकी आंदोलक’ आणि त्यांच्या नेत्यांशी कोणी, कशाला आणि का म्हणून चर्चा करावी?
विशेष दर्जा असलेल्या राज्यांपेक्षाही देशात सर्वात जास्त आर्थिक मदत जम्मू-काश्मीरला (२०१५ मध्ये १४.८३ टक्के आर्थिक मदत केवळ एका राज्यासाठी) मिळते. एवढे असूनही विद्वेषाची धार एवढी की, अमरनाथभक्तांसाठी समर्पणस्थळासाठी एक इंचही भूमी देणार नाही, ही तेथील लोकांची भूमिका. काश्मिरात दररोज जवान शहीद होतात, पण त्यांच्यासाठी काश्मिरात सैनिक कॉलनी वसविण्यास विरोध. जम्मू-काश्मीरच्या मुलांना शाळा, महाविद्यालयात शिक्षणासाठी विशेष पॅकेज देण्यात येते. राजस्थानपासून दिल्लीपर्यंत आणि थेट कर्नाटकपर्यंत काश्मिरी मुस्लिम मुलांसाठी राज्य सरकारतर्फे विशेष व्यवस्था. मात्र, एवढे सगळे असूनही ज्या मूठभर लोकांनी ‘आझादी’चे जे नारे लावले, त्यांच्यामुळे जम्मू-काश्मिरातील लाखो भारतनिष्ठ नवतरुणांचे भविष्य पणाला लावता येणार नाही.
दुर्दैवाने गेल्या सहा दशकांपासून राजकारणाच्या सारिपाटावर काश्मीरचा बळी जात आहे. ज्या राज्यात लहान मुलांना भारत ही त्यांची मातृभूमी आहे, हे पाठ्यपुस्तकातून शिकविलेच जात नाही, ज्या राज्यातील पुस्तकात राष्ट्रगीताचा समावेश नसतो, जेेथे शाळेत राष्ट्रगीत गायले जात नाही, ज्या राज्यातील गल्ली-बोळात, रस्त्यावर जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, लोहिया आणि जयप्रकाश नारायण यांच्या नावांचा उल्लेखही होत नाही, त्यांची चित्रेही कुठे दिसत नाही, त्यांच्या योगदानाचा कुठे उल्लेखही करण्यात येत नाही, जेथे १९४७ पासून आजपर्यंत केवळ काश्मिरी मुसलमानांनीच राज्य केले आहे, जम्मूतून गुलाम नबी आझाद हे केवळ एकच मुख्यमंत्री बनले,
अखेर कुठपर्यंत, आणखी किती वर्षे आणि किती निवडणुकांपर्यंत आम्ही दहशतवादासह दगडांचा वर्षाव सहन करायचा, आणखी किती वर्षे पाकिस्तानी पैशावर पोसलेल्या देशद्रोही विश्वासघातक्यांच्या कारवाया सहन करायच्या? वेदनेचे औषध जर हृदय जिंकण्याचे असेल, तर ते हृदय हिंदुस्थानीच हवे.
No comments:
Post a Comment