BRIG HEMANT MAHAJAN NATIONAL SECURITY: पंतप्रधानांच्या चीन दौर्याने काय साधले?: पंतप्रधानांच्या चीन दौर्याने काय साधले?
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग गेल्या आठवड्यात चीनच्या दौर्यावर होते. गेल्या दहा वर्षांतील चीनच्या...
SPREAD MESSAGE OF INDIAN NATIONAL SECURITY TO AS MANY INDIANS AS POSSIBLE. LET US FREE INDIA OF CORRUPTION BY SPREADING THE MESSAGE TO AS MANY PEOPLE.MANY OF THE ARTICLES HAVE BEEN RECEIVED AS FORWARDED MAIL FROM VARIOUS FRIENDS . SHOULD SOME FACTS BE NOT CORRECT , YOU ARE REQUESTED TO PUT IT IN REMARKS BELOW THE ARTICLE. THIS WILL ENSURE A MORE BALANCED PERSPECTIVE OF THE SUBJECT DISCUSSED.
Total Pageviews
Wednesday, 30 October 2013
पंतप्रधानांच्या चीन दौर्याने काय साधले?
Here is an address by Dr. Subramanian Swamy. Whatever you might be doing, put it aside and listen to a brilliant talk by one of India's profound thinkers. You wont regret it. He might be radical in his thinking and erudite in expression. Some may even call him a maverick. But when it comes to commitment to the cause of what's good for our country's economy and for sound reasoning ability, Swamy will be difficult to beat. This is a must watch presentation by a fearless politician who appears to have researched the subject thoroughly.
Tuesday, 29 October 2013
पाटण्यातले स्फोट
Monday, 28 October 2013
PRIORITY TO POLICE BAND INSTEAD FACILITIES IN NAXAL ARES
जवानांच्या बळकटीपेक्षा बॅण्ड पथकाला प्राधान्य-राज्याच्या सुरक्षेपेक्षा नेत्यांना सलामी महत्त्वाची!
नागेश दाचेवार
राज्यातील दहशतवाद्यांचा आणि माओवाद्यांचा सामना करण्यासाठी जवानांना प्रशिक्षण देण्याची कुठली योजना राज्य सरकारने हाती घेतली किंवा हाती घेऊन पूर्णत्वास नेल्याचे ऐकिवात नाही. मात्र, पोलिसांची वाद्यवृंद प्रबोधनी उभारण्याची तयारी गृह विभागाने दर्शविली असून, पोलिस दलातील वाद्यवृंद अर्थात बॅण्ड पथकाचा दर्जा उंचावण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्याचे कधी नव्हे ते धाडस राज्याच्या गृह विभागाने दाखविले आहे.
राज्याचे पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांनी ६ एप्रिल २०१३ रोजी वाद्यवृंध प्रबोधिनीची उभारणी आणि त्यासाठी ७५ कर्मचार्यांच्या नियुक्तीचे आदेश दिले आणि केवळ तीन-चार महिन्यांच्या कालावधीत १३ ऑगस्ट २०१३ ला महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या कार्यकारी अभियंत्याने प्रबोधिनीच्या पहिल्या टप्प्यातील ८८८७ चौरस फूट जागेवरील बांधकामासाठी २३.३९ कोटी रुपयांचे ढोबळ अंदाजपत्रक शासनाला मंजुरीसाठी सादर केले. त्याचा पाठपुरावा करुन गृहविभाग ते लवकरच मंजूर देखील करून घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
गडचिरोलीसाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्य राखीव दलाच्या बटालियनसाठी कायमस्वरुपी निवासाची सुविधा करण्याबाबत गृह विभागाने अशीच तत्परता का दाखविली नाही, हा प्रश्न अनत्तरीतच राहिला आहे.
शासन कधी आणि कोणत्या गोष्टीला प्राधान्य देईल याची आता शाश्वती राहिली नसल्याचे चित्र आहे. अर्थात नक्षल आणि दहशदावाद्यांशी दोन हात करणार्यांसाठी काही प्रशिक्षण केंद्र उभारणे, अत्याधुनिक साधन सामग्री उपलब्ध करुन देणे, पोलिसांना चांगली नव्हे पण प्रतिकूल परिस्थितीत किमान राहण्याची सुविधा उपलब्ध करुन देणे, यांसारख्या विषयांचे आव्हान गृह विभागासमोर उभे ठाकले आहे. शिवाय तब्बल वीस वर्षांआधी गडचिरोलीत स्थापन केलेली राज्य राखीव दलाची एक हजार जवानांची बटालियन आजही सोयी सुविधेच्या प्रतीक्षेत आहे.
नक्षल्यांचा खात्मा करण्यासाठी निर्माण केलेल्या राज्य राखीव दलाच्या बटालियनसाठी ८० एकर जागा गृह विभागाने ताब्यात घेतली होती. तब्बल वीस वर्षांनंतर त्यावर अद्याप कुठलेही काम झालेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, ढोबळपणे माहिती अशी पुढे येते की, शासनाने आजवर या जवानांसाठी उपलब्ध करुन द्यावयाच्या पायाभूत सुविधांसाठी एक पैसाही उपलब्ध करून दिलेला नाही. नक्षल्यांचा बीमोड करण्यासाठी एकीकडे आम्ही किती शर्थीचे प्रयत्न करीत आहोत, हे ‘दाखवण्याचा’ प्रयत्न करायचा आणि दुसरीकडे त्यासाठी लागणारा निधी मात्र, उपलब्ध करून द्यायचा नाही, यातून सरकारची मानसिकता काय, असा प्रश्न आपसूकच निर्माण होते.
मंत्र्यांच्या सलामीसाठी असलेले वाद्य थोडे कमी जास्त वाजले तर यात देश आणि राज्याचे फार मोठे नुकसान हेाणार नाही. त्यामुळे या ‘बॅण्ड पार्टीवर’ खर्च करण्यापेक्षा गृह विभागाने जर हाच पैसा नक्षल भागातील राज्य राखीव दलातील जवानांच्या २० वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पासाठी लावला तर ते उपयुक्त ठरेल, अशी प्रतिक्रिया एका वरिष्ठ पोलिस अधिकार्याने तरुण भारतशी बोलताना व्यक्त केली आहे. मंत्र्यांची सलामी महत्त्वाची की जवानंाचे जीव, याचा विचार राज्य सरकारने करणे अपेक्षित आहे. गृह विभागाने घेतलेल्या कोणत्याही निरुपयोगी निर्णयावर त्यांचे कान टोचण्याचे काम राज्य सरकारचा प्रमुख या नात्याने मुख्यमंत्र्यांनी करणे अपेक्षित आहे. पण, तेही या ‘कर्तव्यात’ कसूरच करताना दिसत असल्याची खंतही या अधिकार्याने व्यक्त केली आहे. १९९३ मध्ये राज्य राखीव दलाची स्थापना करुन ८० एकर जमीन हस्तगत करण्याचा घाट घालणार्या गृह विभागाचा आता पुण्यातील दौंड भागातील ७० एकर जमीन बळकावण्याचा डाव असल्याचे बोलले जाते
ISI, RAHUL GANDHI COMMUNAL RIOTS
मुंबईतील दंगलीत आयएसआयने शस्त्र पुरविल्याची माहिती आम्ही याच स्तंभात दिली होती तेव्हा कॉंग्रेसवाल्यांनी हे आरोप नाकारले होते. आज ‘युवराज’ राहुल मुझफ्फरनगरच्या दंगलीबाबत तीच भूमिका मांडत आहेत. ते चुकून खरे बोलले आहेत. म्हणून त्यांना झोडपलेच पाहिजे असा नियम नाही.
आयएसआय आणि युवराज
सत्य झाकू नका!
कॉंग्रेसचे युवराज राहुल गांधी यांच्या एका वक्तव्यावरून सध्या वादळ निर्माण झाले आहे. राहुल गांधी यांनी एखादे विधान करावे व त्यावरून मोदी यांनी खिल्ली उडवावी अशा प्रकारचा प्रचारी धुरळा गेल्या काही दिवसांपासून उडत आहे, पण या धुरळ्यात यावेळी सत्य हरवताना दिसत आहे. राहुल गांधी हे कोणी तत्त्वचिंतक किंवा झुंजार नेते नाहीत. त्यांची भाषणे व मुक्ताफळे नेहमीच हास्यास्पद ठरत असतात, पण इंदूरच्या सभेत त्यांनी मुझफ्फरनगर दंगलीवरून केलेल्या विधानांवर इतका गदारोळ माजविण्याचे कारण काय? कॉंग्रेसचे युवराज अजाणतेपणे सत्य बोलून गेले आहेत. राहुल गांधी यांनी सांगितले, ‘‘मुझफ्फरनगरच्या दंगलीत आयएसआयचा हात आहे आणि दंगलीच्या झळा बसलेले मुसलमान युवक आयएसआयच्या संपर्कात आहेत.’’ युवराजांनी या देशातील धर्मांध मुसलमानांच्या बाबतीत जे सत्य सांगितले आहे त्यात धक्का बसावे असे काही नाही. आयएसआय व धर्मांध मुसलमानांविषयी युवराजांनी मांडलेले विचार नवीन नाहीत. यापूर्वीही अनेकदा अनेक हिंदुत्ववादी, राष्ट्रवादी नेत्यांनी ‘आयएसआय’च्या येथील कारवायांवर आग ओकली आहे. खुद्द शिवसेनाप्रमुखांनी सरसकट नव्हे तर पाकधार्जिण्या मुसलमानांवर बेधडक हल्ले करून देशात जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हिंदुस्थानातील प्रत्येक दंगा व दहशतवादी कारवाईमागे पाकड्या आयएसआयचा हात हा असतोच व त्यामुळे मुझफ्फरनगरच्या दंगलीतही तो हात अदृश्यपणे किंवा उघडपणे फिरत होता. मुसलमान तरुणांची ‘डोकी’ भडकवून त्यांना माथेफिरू बनवून ‘देशद्रोही, दहशतवादी’ कारवायांत गुंतवण्याचे काम आयएसआय करीत आली आहे. ‘जिहाद’साठी तरुणांना तयार करून त्यांना पाकिस्तान किंवा बांगलादेशात दहशतवादी प्रशिक्षणासाठी नेले जाते व नंतर परत येथे पाठवून
देशविरोधी कारवायांसाठी त्यांचा वापर
केला जातो. आयएसआयच्या या कारवायांत गोपनीय असे काही नाही. मुंबईतील १९९२ च्या दंग्यात व नंतरच्या प्रत्येक बॉम्बस्फोट मालिकेमागे फक्त ‘आयएसआय’ होती. माहीमच्या दर्ग्याजवळ राहणारे ‘मेमन बंधू’ हे आयएसआयचे हस्तक म्हणूनच वापरले गेले व शेवटी आयएसआयच्या छत्रछायेखालीच पाकिस्तानात राहू लागले. ‘टुंडा’ व ‘भटकळ’ या खतरनाक दहशतवाद्यांना पोलिसांनी नुकतेच जेरबंद केले. देशातील किमान ५० दहशतवादी कारवाया व स्फोटांत या दोघांचा हात होता. टुंडा व भटकळ हे आयएसआयचेच सुभेदार होते ना! हैदराबादचा ओवेसी खुलेआम हिंदूंच्या कत्तली घडविण्याचे फर्मान सोडतो. ती जिहादी भाषा पाकड्या ‘आयएसआय’ची आहे. मुंबई, दिल्ली, गुजरात, आसाम आणि हैदराबादसह कश्मीर खोर्यातील मुसलमानांच्या मनात विद्वेषाचे जहर पसरवून त्यांना हिंदुस्थानविरोधात उभे करण्याचे जोरदार कारस्थान रटारटा शिजत आहे. मुसलमानांनी देशाच्या मुख्य प्रवाहात सामील होऊ नये यासाठी जितके प्रयत्न कॉंग्रेस, सपासारखे बेगडी ‘निधर्मी’ पक्ष करीत असतात त्यापेक्षा जास्त कारस्थाने ‘आयएसआय’चे येथील हस्तक करीत असतात. पुन्हा हिंदू-मुसलमानांची जातीय फाळणी व्हावी व त्या फाळणीतून आणखी एक पाकिस्तान निर्माण व्हावे हेच ‘आयएसआय’चे भयंकर कारस्थान आहे, पण या कारस्थानाच्या चिंधड्या उडविण्याऐवजी आपण सगळेच याप्रश्नी मतांचे व धर्माचे राजकारण करण्यात धन्य धन्य मानीत असू तर या देशाला ब्रह्मदेवही वाचवू शकणार नाही. हिंदुस्थानात लश्कर-ए-तोयबा, अल कायदा, सिमी, बांगलादेशी हुजी, इंडियन मुजाहिद्दीन, हिजबुलसारख्या धर्मांध संघटना मुसलमान तरुणांची माथी भडकवीत आहेत व या सर्व सैतानी संघटनांचा बाप ‘आयएसआय’ आहे. या सैतानांपासून देशातील मुसलमानांनी दूर राहावे व स्वत:स कलंकित होण्यापासून वाचवावे, पण
मुसलमानी समाजास सन्मार्गी लावणारा नेता
आज तरी दिसत नाही. उलट मुसलमान आज आहे त्यापेक्षा अधिक धर्मांध कसा बनेल व तो स्वत:ला जास्तीत जास्त असुरक्षित कसा मानेल यासाठी राजकीय डावपेच आखले जात असतात. याचाच फायदा पाकिस्तान व त्यांचे आयएसआय घेत असते. अनेकदा ‘आयएसआय’ला हवे असलेले प्रताप कॉंग्रेस व सपावाले करतात. भडकत्या आगीवर पाणी ओतण्याऐवजी तेल टाकणारे असल्यावर मुसलमान समाज हा सदैव खदखदतच राहील. तेच देशाच्या मुळावर आले आहे. मुसलमानी मतांसाठी राजकारणी कोणत्याही थरास जाऊ शकतात व सत्तेसाठी देशाची द्रौपदी करून स्वातंत्र्य आणि अखंडता पणास लावू शकतात. राहुल गांधी यांनी धर्मांध मुसलमान व आयएसआयचा संबंध दाखवून अजाणतेपणे ‘सत्य’ समोर आणले. मुसलमानांतील धुरिणांनी हे सत्य स्वीकारून या कलंकापासून मुक्ती मिळविण्याचा प्रयत्न केला तर त्यात त्यांचेच हित आहे. भारतीय जनता पक्ष व मोदी यांनी ‘राहुल गांधी’ यांना ‘आयएसआय’प्रकरणी आरोपीच्या पिंजर्यात उभे केले हे त्यांच्या धोरणास धरूनच आहे, पण दंगली व दहशतवादामागे आयएसआयचा हात आहे हे जसे गुजरातच्या दंगलीत सिद्ध झाले तसेच इशरत जहां, सोहराबुद्दीन यांना गुजरात पोलिसांनी ठार केले तेदेखील त्यांचा पाकिस्तानी दहशतवादी संघटनांशी संबंध उघड झाल्यामुळेच. राहुल गांधी यांचे वक्तव्य नीट तपासून पाहिले तर इतकेच दिसते की, त्यांनी ‘दंगापीडित’ मुसलमान तरुणांशी आयएसआय संपर्कात असल्याचे म्हटले. मुंबईतील दंग्याच्या वेळी आयएसआयने हेच केले होते व दंगलीत आयएसआयने शस्त्र पुरविल्याची माहिती आम्ही याच स्तंभात दिली होती तेव्हा कॉंग्रेसवाल्यांनी हे आरोप नाकारले होते. आज ‘युवराज’ राहुल मुझफ्फरनगरच्या दंगलीबाबत तीच भूमिका मांडत आहेत. ते चुकून खरे बोलले आहेत. म्हणून त्यांना झोडपलेच पाहिजे असा नियम नाही
10 MOST CORRUPT POLICE FORCES
PATANA BOM BLASTS NARENDRA MODI & TERROR ATTACKS
नरेंद्र मोदी च्या, पाटण्यातील आयोजित सभेपूर्वी झालेळॆ बॉम्बस्फोट
पाकच्या गोळीबारात लष्करी अधिकारी हुतात्मा
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलओसी) उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत केलेल्या गोळीबारात भारतीय लष्करातील कनिष्ठ विभागातील एक अधिकारी हुतात्मा झाला.गोळीबाराच्या या घटनेनंतर श्रीनगर-मुझफ्फराबाद बससेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. दहशतवाद्यांना सीमेवरून घुसविण्यासाठी पाककडून हा गोळीबार करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.पाकिस्तानकडून या वर्षभरात 130 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. गेल्या आठ वर्षांत यावर्षी सर्वाधिकवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे. 14 ऑक्टोबरला सीमेवर झालेल्या गोळीबारात तीन भारतीय जवान हुतात्मा झाले होते.
इंटरनेट विश्वात दोन्ही देशांमधील नेटिझन्समध्ये सायबर युद्ध सुरू
आता इंटरनेट विश्वात दोन्ही देशांमधील नेटिझन्समध्ये एक प्रकारचे सायबर युद्ध सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. भारतातील विविध राज्यांमधील नागरिकांनी आंदोलने करून, पाकिस्तानचा धिक्कार केला. मात्र, युवा पिढीला आपले थेट मत मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ म्हणजे सोशल नेटवर्किंग साईटस. इंटरनेट विश्वामध्ये सध्या सोशल नेटवर्किंगसाठी आघाडीवर असलेल्या फेसबुक, ट्विटर व विविध वृत्तपत्रांच्या संकेतस्थळावर नेटिझन्स आक्रमक झालेले दिसताना पाहायला मिळत आहे. जगभर पसरलेल्या भारतीय नेटिझन्सनी वेगवेगळ्या संकेतस्थळावर आपले थेट मत व्यक्त केल्याचे दिसत आहे.
भारतातील नेटिझन्सनी पाकिस्तानचा तीव्र शब्दामध्ये धिक्कार करून, त्यांच्यावर थेट सायबर हल्लाच केला. सायबर वॉरमध्येही भारताने पाकिस्तानवर विजय मिळविल्याचे दिसते. सायबर युद्धात लढाई जिंकून, दोन्ही भारतीय सैनिकांना नेटिझन्सनी आदरांजली वाहिली आहे. भारत माता की जय, --अमर रहे... या घोषणा पाहायला मिळत आहेत.
इंटरनेटवरील विविध वृत्तपत्रांची संकेतस्थळे व सोशल नेटवर्किंगवरील विविध साइटस या थेट मत मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ ठरले आहे. भारतीय सैनिकांची मनोधैर्य वाढविण्यासाठी फेसबुकवर विविध पेजेस तयार झाली असून, एका प्रतिक्रियेवर अनेक प्रतिक्रिया पडत असल्याचे दिसत आहे. भारतीय सैनिकांच्या कामगिरीची छायाचित्रे, व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होताना दिसत आहेत.
इंटरविश्वात फक्त भारत-पाक
- आठ जानेवारीपासून इंटरनेट क्षेत्रामध्ये भारत-पाक, बॉर्डर, भारतीय सैनिक हा ट्रेंड.
- भारतीय सैनिकांची कामगिरीची छायाचित्रांची मोठ्या प्रमाणात शेअरींग.
- इंटरनेट विश्वामध्ये भारत-पाक युद्धात भारताचा विजय.
- पाकिस्तानच्या संकेतस्थळावर भारताच्या बाजूने मतप्रवाह.
- भारत-पाक युद्धाचे व्हिडिओ पाहण्याचे प्रमाण वाढले.
इंडियन मुजाहिदीनचा हात
पाटणा येथील सभास्थळाजवळ साखळी बॉम्बस्फोट घडविण्यात इंडियन मुजाहिदीनचा हात असल्याचा संशय असून स्फोटांसाठी 'बोध गया'चे मॉडेल वापरण्यात आले.बॉम्बस्फोटांनंतर पोलिसांनी चार संशयितांना अटक केली आहे. इम्तियाज अन्सारी, ऐनुल, अख्तर आणि कलीम अशी त्यांची नावे आहे. यातील ऐनुल हा स्फोटात जखमी झाला असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इम्तियाजच्या घरी पाटणा पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात डिटोनेटर, ज्वालाग्राही पावडर, प्रेशर कुकर बॉम्ब, जिहादी साहित्य, हातोडी, रॉकेल, सीडी तसेच स्फोटकांमध्ये वापरले जाणारे फ्युज आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी इम्तियाजचा भाऊ व वडिलांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू केली आहे.
रांचीत शिजला कट
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार सभास्थळी बॉम्बस्फोट करण्याचा कट इम्तियाजच्या रांची येथील घरी रचला गेला होता. मोनू ऊर्फ तहसिन हा या कटाचा सूत्रधार असून तो सध्या अटकेत असलेला दहशतवादी यासिन भटकळच्या गटातील आहे.
फोन नंबर मिळाले आणि धागेदोरे जुळले
बॉम्ब ठेवण्यासाठी आलेल्या अन्सारी याला त्याच्या बॉसेसनी मोबाइल न वापरण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे त्याने एका कागदावर काही नंबर लिहून स्वत:जवळ ठेवले होते. अन्सारीला अटक केल्यानंतर हे फोन नंबर पोलिसांच्या हाती लागले. त्यामुळे इतरांचा ठावठिकाणा लागण्यास मदत झाली.
गुजरातचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या, पाटण्यातील गांधी मैदानावर रविवारी आयोजित जाहीर सभेपूर्वी झालेल्या बॉम्बस्फोटांचा आणि हे नापाक कृत्य करणार्या नराधमांचा जेवढा धिक्कार करावा, तेवढा थोडाच आहे. या सभेपूर्वी सात बॉम्बस्फोट होऊन पाच कार्यकर्त्यांना प्राणास मुकावे लागले आाणि सुमारे ५० कार्यकर्ते जखमी झाले. भारतात लोकशाही आहे आणि संविधानानुसार सत्तारूढ पक्षासोबतच विरोधी पक्षांनाही तेवढेच स्थान आहे. सरकारच्या धोरणांकडे जनतेचे लक्ष वेधणे, त्यातील बर्यावाईटाची जाण करून देणे, त्या निर्णयांवर आपले मत संसदेत, विधानसभेत तसेच सार्वजनिक रीत्याही मांडणे हे सक्षम विरोधी पक्षाचे कामच आहे. आज भारतीय जनता पक्ष हा देशातील सर्वांत मोठा विरोधी पक्ष आहे. लोकसभा आणि राज्यसभेत या पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपद आहे. त्यामुळे सत्तारूढ पक्षासोबतच विरोधी पक्षांच्या कार्यक्रमांनाही समान सुरक्षा प्रदान करणे, हे संबंधित राज्यातील सरकारचे कर्तव्य आहे. परंतु, हे कर्तव्य बजावण्यात जदयुचे नितीशकुमार सरकार अपयशी ठरले आहे, असेच म्हणावे लागेल. आमच्याकडून सुरक्षेत कोणतीही हयगय झाली नाही, असे नितीशकुमार यांनी म्हटले असले, तरी सकाळी १० वाजताच्या सुमारासच नवीन पाटणा रेल्वेस्थानकावरील प्रसाधनगृहात पहिला बॉम्बस्फोट घडून आला होता. एक बॉम्ब निकामी करताना एक जवान जखमीही झाला होता.
या घटनेनंतर मोदींच्या रॅलीला संरक्षण देण्याची कडक सुरक्षा व्यवस्था बिहार सरकारला करता आली असती. कारण, मोदींची रॅली त्यानंतर चार तासांनंतर सुरू झाली होती. या चार तासांत रॅलीभोवती सुरक्षा कडे उभारता आले असते, घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, प्रत्येक कार्यकर्त्याची कसून तपासणी करता आली असती. त्याला कुणीही आक्षेप घेतला नसता. पण, तसे झालेले दिसत नाही. नितीशकुमार म्हणाले की, आम्हाला केंद्राकडून रॅलीत काही अनुचित प्रकार घडणार असल्याची कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती. यामुळे हे अतिरेक्यांनी घडवून आणलेले स्फोट आहेत, की कुणी बिहारला बदनाम करण्यासाठी राजकीय वैमनस्यातून घडवून आणलेले कृत्य आहे, हे आताच सांगता येणार नाही. या घटनेत एका इसमाला अटक करण्यात आली आहे. त्याने एवढेच सांगितले आहे की, सभास्थळाची आमच्या ११ सदस्यीय चमूने आधीच पाहणी केली होती. पण, ही चमू कोणत्या संघटनेशी संबंधित आहे, हे मात्र सांगण्यास नितीशकुमार यांनी नकार दिला आहे. तपास सुरू असल्यामुळे आताच काहीही सांगता येणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. ते योग्यही आहे. नितीशकुमार म्हणतात, आम्हाला अलर्ट सूचना नव्हती. पण, मोदींच्या सभेच्या चार तासांआधीच एका बॉम्बचा स्फोट झाला होता आणि पेरून ठेवलेला एक बॉम्ब निकामी करण्यात आला असतानाही, अलर्ट सूचनेची आवश्यकता होती का? चार तासांच्या आत बरेच काही करता आले असते. पण, सभामैदानाची सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात नितीशकुमार यांच्याकडून कसूर झाली, असेच एकंदरीत चित्र आहे. नितीशकुमार यांनी या घटनेचा निषेध केला असला, मृतकांच्या वारसांना पाच लाखांची मदत जाहीर केली असली, तरी तेवढ्याने हा प्रश्न सुटणारा नाही.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींच्या प्रचाराला प्रारंभ झाला आहे. त्यानंतर लगेच लोकसभेच्या निवडणुका आहेत. आज भाजपाकडून नरेंद्र मोदी आणि सत्तारूढ कॉंग्रेसकडून राहुल गांधी अनेक राज्यांमध्ये प्रचारसभा घेत आहेत. त्यामुळे केवळ भाजपाच्या सभांना सुरक्षा प्रदान करण्याचा नव्हे, तर राहुल गांधी यांच्या सभांनाही तेवढीच चोख सुरक्षा व्यवस्था प्रदान करावी लागणार आहे. अनेक राज्यांमध्ये भाजपाची, अनेक राज्यांत कॉंग्रेसची, तर अनेक राज्यांत प्रादेशिक पक्षांची सरकारे आहेत. पण, देशातील प्रमुख विरोधी पक्षांचे नेते हे येत्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशभर प्रचारासाठी फिरणार आहेत. त्यामुळे बिहारच्या घटनेपासून आतापासूनच सर्व राज्यांनी सावधगिरीच्या उपाययोजना आखण्यास सुरुवात केली पाहिजे. इंटेलिजन्स आणि स्थानिक विशेष शाखांनी आतापासूनच दक्ष राहण्याची गरज आहे.बिहारच्या घटनेमुळे राज्य आणि केंद्रातील इंटेलिजन्स यंत्रणा चौकस दृष्टी ठेवण्यात अपयशी ठरली आहे, असेच म्हणावे लागेल.
रेल्वेस्थानकावर पहिला बॉम्बस्फोट झाल्यानंतरच बरीच पळापळ झाली होती. सभेत बॉम्बस्फोट घडवून आणला तर पळापळ होईल, चेंगराचेंगरी होईल आणि यात मोठी मनुष्यहानी होईल, असा बॉम्बस्फोट घडवून आणणार्यांचा मनसुबा होता. एकदा बिहारमध्ये यश आले की, मग मोदींच्या सभेला गर्दी होणार नाही, हा या कारस्थानामागील उद्देेश होता, हेही उघडच दिसत आहे. मोदींना देशाचे काहीच कळत नाही, त्यांनी गुजरात सांभाळावे, असा सल्ला कॉंग्रेससह अनेक पक्षांनी दिला होता. पण, मोदींच्या सभांना प्रत्येक ठिकाणी मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद पाहता, सर्वच पक्षांचे धाबे दणाणले आहे. प्रामुख्याने उत्तरप्रदेश आणि बिहारमध्येही हजारोंच्या संख्येने जनता मोदींचे भाषण ऐकायला येते, हा संकेत सर्वच पक्षांसाठी धोक्याची घंटा आहे.
एवढी मोठी घटना घडूनही नरेंद्र मोदी यांनी घेतलेली संयमित भूमिका स्वागतार्ह आहे. त्यांनी सभेची सांगता करताना, सर्व कार्यकर्त्यांना व्यासपीठावरूनच शांत राहण्याचे जाहीर आवाहन केले. घटनेनंतर बोलतानाही त्यांनी कोणतीच तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. बिहारच्या घटनेनंतर देशाच्या अन्य भागातही नेत्यांच्या सभा होतील. त्या वेळी सतर्क राहण्याची गरज आहे. सोबतच अन्य पक्षांनीही सभास्थानी लक्ष देण्यासाठी स्वत:चे स्वयंसेवक ठेवले पाहिजेत. जनतेनेही बिहारच्या घटनेमुळे क्रोधित न होता, शांतताच पाळली पाहिजे. तोच खरा मानवधर्म आहे.
Sunday, 27 October 2013
Saturday, 26 October 2013
PRIME MINISERS VISIT TO CHINA DOUBTFUL GAINS
SIX WAR CHINA WILL FIGHT IN NEXT 50 YEARS
SHP ABOUT TO SINK
Thursday, 24 October 2013
PAKISTANIZATION AL QUEDA
Wednesday, 23 October 2013
BRIG HEMANT MAHAJAN NATIONAL SECURITY: आव्हान चिनी ड्रॅगनचे:दमदाटी करून बॉर्डर डिफेन्स क...
BRIG HEMANT MAHAJAN NATIONAL SECURITY: आव्हान चिनी ड्रॅगनचे:दमदाटी करून बॉर्डर डिफेन्स क...: चीनच्या पुढे नेहमीच गुडघे टेकले:परराष्ट्र धोरणावर शांततावादी विचारवंतांची पकड पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग २२-२४ ऑक्टोंबर चीनच्या दौर्यावर ह...
NAXALS KILL 12000 INDIANS -HOME MINISTRY REPORT
नक्षली हिंसाचारात १२ हजार नागरिक, तीन हजार पोलिस ठार गेल्या तीन दशकांच्या काळात देशाच्या विविध भागांमधील नक्षली हिंसाचारात १२ हजार नागरिक ठार झाले असून, तीन हजारावर पोलिस व सुरक्षा दलांचे जवान शहीद झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबतची माहिती सादर केली आहे. याच काळात विविध नक्षलविरोधी मोहिमांच्या काळात सुरक्षा दल व पोलिसांना ४६३८ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालणे शक्य झाले आहे, असे गृह मंत्रालयाच्या अहवालात म्हटले आहे. नक्षल्यांच्या हिंसाचारात सर्वाधिक नागरिक २०१० मध्ये ठार झाले आहेत. या एकाच वर्षात छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, बिहार, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश या नऊ नक्षलग्रस्त राज्यांमध्ये नक्षल्यांनी ७२० नागरिकांना ठार केले आहे. तर, २००९ मध्ये नक्षल्यांनी सुरक्षा दल आणि पोलिस दलातील ३१७ जवानांना ठार केले आहे. सर्वाधिक म्हणजेच २९६ नक्षल्यांचा खात्मा १९९८ मध्ये करण्यात आला. १९८० मध्ये नक्षलवाद्यांनी ८४ नागरिकांना ठार केले होते. तर जवान व पोलिसांनी याच वर्षात केवळ १७ नक्षलवादी मारले होते. या वर्षात पोलिस व सुरक्षा दलाचा एकही जवान शहीद झाला नव्हता. २०१२ मध्ये नक्षलवाद्यांनी ३०० नागरिक आणि ११४ जवानांना ठार केले होते. तर, जवानांनी ५२ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले होते. यावर्षीच्या ३० सप्टेंबरपर्यंत एकूण १९८ नागरिक आणि ८८ जवान नक्षल्यांनी मारले असून, जवान व पोलिसांनी ५२ नक्षल्यांना यमसदनी पाठविले आहे, असे हा अहवाल सांगतो
CHINESE STRATEGY IN INDIAN OCEAN-आव्हान चिनी ड्रॅगनचे, -BRIG HEMANT MAHAJAN
आव्हान चिनी ड्रॅगनचे:दमदाटी करून बॉर्डर डिफेन्स कोऑपरेशन करारावर सही
Tuesday, 22 October 2013
आव्हान चिनी ड्रॅगनचे –BRIG HEMANT MAHAJAN
चीनच्या पुढे नेहमीच गुडघे टेकले:परराष्ट्र धोरणावर शांततावादी विचारवंतांची पकड
. भारत-चीनी भाई भाईचा परत एकदा नारा देताना, चिनची नजर दोन्ही देशांदरम्यानचा व्यापार ४० अब्ज डॉलर्सने वाढविण्यावर होती. डॉ. मनमोहन सिंग यांच्यासोबत गेल्या काही वर्षांत ११ वेळा बैठका घेणारे चीनचे पंतप्रधान वेन जिआबाओ पुन्हा एकदा भारत भेटीवर येऊन गेले. तेव्हा त्यांच्याकडून भारतीयांना फार अपेक्षा नव्हत्या. चीनने चालविलेल्या खोड्या बंद कराव्यात अशी एक अपेक्षा होती. या अपेक्षेचे खापर त्यांनी भारतीय प्रसारमाध्यमांच्या माथी फोडले आणि चीन खोड्या करत नाही, भारतीय प्रसारमाध्यमेच तसे चित्र निर्माण करतात, असे अंग काढून घेत त्यांनी काढता पाय घेतला.त्यांच्या ११ भेटीचा काहीच फ़ायदा झाला नाही. ऊलटी चिनी आयात जास्त वाढल्यामुळे रुपयाची किम्मत घसरली आणी महागाई वाढली.चीनच्या पंतप्रधानपदावरून वेन जिआ बाओ गेले आणि केचियांग आले, याचे आपल्याला कौतुक होते. चीनने घुसखोरी केलेली असताना आपले परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद हे चीनला जाण्यासाठी उतावीळ होते.त्यानी चीनच्या सैनिकांनी केलेल्या घुसखोरीचा मुद्दा उपस्थितदेखील केला नाही! चीनच्या नाराजीमुळे भारताने जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यासोबतचा परंपरागत युद्धाभ्यास टाळला.इतके घाबरणे बरोबर आहे का? भारताचा स्वाभिमान आणि सैनिकांच्या मनोबलाचा विचार केला आहे का?.जुन २०१३ मध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन हेही चीनला गेले आणी हात हलवत परत आले. भारताला एकीकडे सहकार्याचे, व्यापारवाढीचे गाजर दाखवायचे आणि दुसरीकडे सतत दबावाखाली ठेवण्याचा प्रयत्न करायचा. नवे नेतृत्व आले म्हणून त्यात कोणताही बदल झालेला नाही. बोर्डर डिफ़ेन्स कोओपरेशन करारावर सही?य़ा दौर्यामध्ये चीनला आपल्याला बोर्डर डिफ़ेन्स कोओपरेशन करारावर{BORDER DEFENSE COOPERATION AGREEMENT(B D C A)} सही करायला भाग पाडायचे आहे.कराराचे मुख्य कलम आहे की यापुढे आपल्याला सीमा भागात नवीन रस्ते बांधता येणार नाही. चिनचे रस्ते ,रेल्वे, ओईल पाइप लाइन सीमेपर्यंत पोहचले आहे.आपल्या सुस्त कारभारामुळे आपले रस्ते मात्र सीमेपासून ३०-४० मैल मागेच आहेत. म्हणजेच पुढे लढत असलेल्या सैन्याला रसद पोहोचवण्यास आपण अजूनही असमर्थ राहणार आहोत.शिवाय चीनने रेल्वेलाईनचे जाळे तिबेटमध्ये पूर्ण पसरले आहे व पेट्रोलियम प्रॉडक्टकरता मोठी पाईपलाईन सुद्धा तयार केली आहे. ह्या उलट भारतीय रेल आसामच्या ब्रह्मपुत्रेच्या पात्रातच म्हणजे सीमेपासून शेकडो कि. मी. मागे रुतून राहिली आहे. थोडक्यात चीनने लष्करी कारवायांसाठी सर्व योग्य त्या सुविधांचे जाळे तयार करून ठेवले आहे. १९६२ च्या चिनी आक्रमणाला २०/१०/२०१३ पासुन ५१ वर्ष सुरु झाले. भारताचा निषेध अगदीच गुळमुळीत राहिलेला आहे. आपल्या निषेधांस कोणीही भीक घालत नाही. भारत व भूतान ही एकमेव अशी राष्ट्रे आहेत, ज्यांच्याबरोबर चीनचे सीमाप्रश्न सुटलेले नाहीत. आतापर्यंतच्या 19 चर्चांमधून काही निष्पन्न झाले नाही,१९०० चर्चांमधून सुधा काही निष्पन्न होणार नाही . जेव्हा चीनला वाटेल की, भारताने चीनचे प्रभुत्व मान्य केले आहे, तेव्हाच चीन हे प्रश्न सोडवेल. लष्कराचा विरोध असूनही सरकारी आदेशामुळे भारतीय संरक्षण दलाने चुमार येथील बंकर तोडण्याचा निर्णय घेतला. ज्या चिन्यांनी घुसखोरी केली, त्यांना मागे ढकलायचे सोडून, आपले सैन्यच आपल्याच प्रदेशात मागे घेणे ही कोठली राजनीती? राजकीय पक्ष काहीच का बोलत नाही ? चीनमध्ये नवे नेतृत्व आल्यानंतर शिरस्त्याप्रमाणे नवे अध्यक्ष शी जिंगपिंग यांनी भारताशी मैत्री करण्याची भाषा केली.चीनला भारताची बाजारपेठ हवी आहे, मात्र मैत्री नको.व्यापार वाढवला की चीनचा आक्रमकता नाहिशी होईल का?जपान व्हिएतनाम कसे वागतात?आशियात जपान व भारत हे चीनला आपले प्रतिस्पर्धी वाटतात. जपानशी कुरापत काढली आणी जपाननी आपले एयरफ़ोर्स अलर्ट केले.चीनने व्हिएतनामवर दबाव टाकला, व्हिएतनामने आपला शत्रू असलेल्या अमेरिकेशी मैत्री प्रस्थापित केली.लडाखमधील चिनी लष्करी अतिक्रमणाला, छोटे समजणे धोकादायक ठरणार आहे. असे प्रोत्साहन मिळत राहिले, तर घुसखोरीबाबत चीनला काळजी करण्याचे कारणच उरणार नाही. तिन्हीं देशापैकी भारताची कुरापत काढणे सोपे, असे चीनला वाटते. हा समज भ्रामक आहे, याची जाणीव करून देण्यासाठी तरी भारताने धैर्य दाखविले पाहिजे. चीनच्या 'एन्सर्कलमेंट'ला भारताने वेळीच प्रत्युत्तर दिले पाहिजे. मालदीव, मादागास्कर, तसेच सेशेल्सबरोबर असलेल्या संबंधात वाढ करणे, जपान, तैवान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया यांच्याशी विशेष संबंध प्रस्थापित करणे यांसारख्या उपाययोजना भारत करू शकतो. चीनभोवती भारतानेही आपला विळखा मजबूत करणे गरजेचे आहे. परराष्ट्र धोरणावर शांततावादी विचारवंतांची पकड आज इन्दीरा गांधी
,सरदार वल्लभभाई पटेल यांसारखे एखादे खंबीर भूमिका घेणारे आणि कोणत्या परिणामाला सामोरे जाण्याची ताकद असणारे नेते असावेत .त्यासाठी प्रखर राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. अशी इच्छाशक्ती निर्माण होण्यासाठी जनतेनेच सरकारवर दबाव टाकायला हवा. चीनच्या घुसखोरीच्या विरोधात जनतेनेही उत्स्फूर्तपणे तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करायला हव्यात. संपूर्ण देशात चीनच्या विरोधात वातावरण निर्माण व्हायला हवे. चिनी बनावटीच्या वस्तूंवर बहिष्कार टाकायला हवा. अशा वस्तू विकणार्यांना देशद्रोही मानायला हवे. व्यापार ही चीनची सर्वात मोठी आर्थिक शक्ती आहे . त्यामुळे या देशात चिनी वस्तुंच्या व्यापारावर निर्बंध आले तर ते चीनला परवडण्यासारखे नाही.त्यादृष्टीने जनता विचार करेल ही आशा आहे.जर तुम्हाला युद्ध टाळायचं असेल तर युद्धाकरता सक्षम व सज्ज राहा .भारताच्या दृष्टीने हे महत्त्वाचे आहे की, अरुणाचल प्रदेशलगत असलेल्या क्षेत्रांमध्ये सैन्याचे बळकटीकरण करणे आवश्यक आहे. आज भारतीय सैन्य चीनबरोबर युद्ध करू शकते का? राष्ट्राने याबाबतीत चिंता करू नये. आपल्या सीमांचे संरक्षण करण्यात भारतीय सैन्य सक्षम आहे. राजकीय सामर्थ्य निर्माण करण्याची गरज आहे. चीनचा उद्देश/हेतू कधीही बदलू शकतो.
Subscribe to:
Posts (Atom)