नक्षली हिंसाचारात १२ हजार नागरिक, तीन हजार पोलिस ठार गेल्या तीन दशकांच्या काळात देशाच्या विविध भागांमधील नक्षली हिंसाचारात १२ हजार नागरिक ठार झाले असून, तीन हजारावर पोलिस व सुरक्षा दलांचे जवान शहीद झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबतची माहिती सादर केली आहे. याच काळात विविध नक्षलविरोधी मोहिमांच्या काळात सुरक्षा दल व पोलिसांना ४६३८ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालणे शक्य झाले आहे, असे गृह मंत्रालयाच्या अहवालात म्हटले आहे. नक्षल्यांच्या हिंसाचारात सर्वाधिक नागरिक २०१० मध्ये ठार झाले आहेत. या एकाच वर्षात छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, बिहार, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश या नऊ नक्षलग्रस्त राज्यांमध्ये नक्षल्यांनी ७२० नागरिकांना ठार केले आहे. तर, २००९ मध्ये नक्षल्यांनी सुरक्षा दल आणि पोलिस दलातील ३१७ जवानांना ठार केले आहे. सर्वाधिक म्हणजेच २९६ नक्षल्यांचा खात्मा १९९८ मध्ये करण्यात आला. १९८० मध्ये नक्षलवाद्यांनी ८४ नागरिकांना ठार केले होते. तर जवान व पोलिसांनी याच वर्षात केवळ १७ नक्षलवादी मारले होते. या वर्षात पोलिस व सुरक्षा दलाचा एकही जवान शहीद झाला नव्हता. २०१२ मध्ये नक्षलवाद्यांनी ३०० नागरिक आणि ११४ जवानांना ठार केले होते. तर, जवानांनी ५२ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले होते. यावर्षीच्या ३० सप्टेंबरपर्यंत एकूण १९८ नागरिक आणि ८८ जवान नक्षल्यांनी मारले असून, जवान व पोलिसांनी ५२ नक्षल्यांना यमसदनी पाठविले आहे, असे हा अहवाल सांगतो
No comments:
Post a Comment