Total Pageviews

Wednesday, 23 October 2013

आव्हान चिनी ड्रॅगनचे:दमदाटी करून बॉर्डर डिफेन्स कोऑपरेशन करारावर सही

चीनच्या पुढे नेहमीच गुडघे टेकले:परराष्ट्र धोरणावर शांततावादी विचारवंतांची पकड पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग २२-२४ ऑक्टोंबर चीनच्या दौर्यावर होते. त्यामधून काय निष्पन्न झाले? गेल्या १० वर्षांतील त्यांची चीनच्या वेगवेगळ्या पंतप्रधानांबरोबरची ही १७ वी भेट होती. चीनच्या आक्रमक वागणुकीमुळे भारती -चीन संबंध सध्या सर्वात खालच्या पातळीवर पोहचले आहेत. या भेटीमध्ये चीन भारतामधील खर्या समस्या, जसे की सीमा विवाद, भारतीय सिमेमध्ये घुसखोरी, पाकिस्तानला शस्त्र आणि अणुशस्त्र पुरवठा, भारताच्या शेजारील देशांमध्ये मिलीटरी बेसेस किंवा टेहाळणी केंद्रे उघडणे, आपल्या देशातील आर्थिक घुसखोरी यावर अजिबात चर्चा झाली नाही. दमदाटी करून बॉर्डर डिफेन्स कोऑपरेशन करारावर सही चीनला भारताला दमदाटी करून फक्त बॉर्डर डिफेन्स कोऑपरेशन करारावर भारताला सही करायला भाग पाडायचे होते. या कराराचे मुख्य कलम आहे की यापुढे भारताला आपल्या सीमा भागात नवीन रस्ते कि लढार्इकरता बंकर(खंदक) बनवता येणार नाहीत. चीनने पहिलेच रस्ते सीमेपर्यंत आणून पोहचवले आहेत. आपले रस्ते मात्र, अजुन सीमेपासून २०-४० किलो मिटर मागे आहेत.म्हणूनच या करारामुळे आपले फ़ार नुकसान होणार आहे. काही महिन्यापुर्वी लडाखच्या देवसांग भागात चीनने १९ कि.मी. आत घुसखोरी केली होती. केवळ ५० जवानांच्या ताकदीवर त्यांनी आपल्याला गुडघे टेकवायला भाग पाडले. आपले सरंक्षण मंत्री अँथनी आणि नशॅनल सेक्युरिटी अॅडव्हायसर (NSA) शिवशंकर मेनन, घार्इघार्इत चीनमध्ये गेले आणि आम्ही (BDCA) वर विचार आणि सही करू असे अलिखीत आश्वासन देऊन परत आले. चीनचे पंतप्रधान भारतात आले असतांना सुद्धा आपली चिनी घुसखोरी बद्दल बोलायची हिम्मत झाली नाही. एक गोळी न फायर करता केवळ दमदाटीच्या जोरावर चीनने आपल्याला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागण्यास भाग पाडले. आता पंतप्रधान चीनला जाऊन त्यांच्या दमदाटीला पुर्णपणे बळी पडत आहेत. १९६२ साली आपली सीमा परराष्ट्र खात्याच्या अधिपत्याखाली होती आणि आपण सिमेवर काही ठिकाणी पोलिसांच्या तुकड्या तैनात केल्या होत्या. आता पण तेच होत आहे. आपण आक्रमक चिनी सैनिकांच्या समोर गृहमंत्रालयाखालील आयटीबिपी पोलिस तैनात करत आहोत. या माघारीमुळे चीन अजुन आक्रमक होत आहे.तिबेटमध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर चीन अनेक धरणे बांधत आहे आपण मात्र निषेध खलीते पाठविण्याशिवाय काहीच करत नाही. आपल्या निषेधांस कोणीही भीक घालत नाही य़ा दौर्यामध्ये चीनला आपल्याला बोर्डर डिफ़ेन्स कोओपरेशन करारावर{BORDER DEFENSE COOPERATION AGREEMENT(B D C A)} सही करायला भाग पाडले.लेख लिही पर्यंत कराराची मुख्य पैलु जाहीर झाले नव्हते.कराराचे मुख्य कलम असावे की यापुढे आपल्याला सीमा भागात नवीन रस्ते बांधता येणार नाही. चिनचे रस्ते ,रेल्वे, ओईल पाइप लाइन सीमेपर्यंत पोहचले आहे.आपल्या सुस्त कारभारामुळे आपले रस्ते मात्र सीमेपासून मागेच आहेत. म्हणजेच पुढे लढत असलेल्या सैन्याला रसद पोहोचवण्यास आपण अजूनही असमर्थ राहणार आहोत.शिवाय चीनने रेल्वेलाईनचे जाळे तिबेटमध्ये पूर्ण पसरले आहे व पेट्रोलियम प्रॉडक्टकरता मोठी पाईपलाईन सुद्धा तयार केली आहे. ह्या उलट भारतीय रेल आसामच्या ब्रह्मपुत्रेच्या पात्रातच म्हणजे सीमेपासून शेकडो कि. मी. मागे रुतून राहिली आहे. थोडक्यात चीनने लष्करी कारवायांसाठी सर्व योग्य त्या सुविधांचे जाळे तयार करून ठेवले आहे. १९६२ च्या चिनी आक्रमणाला २०/१०/२०१३ पासुन ५१ वर्ष सुरु झाले. भारताचा निषेध अगदीच गुळमुळीत राहिलेला आहे. आपल्या निषेधांस कोणीही भीक घालत नाही. भारत व भूतान ही एकमेव अशी राष्ट्रे आहेत, ज्यांच्याबरोबर चीनचे सीमाप्रश्न सुटलेले नाहीत. आतापर्यंतच्या 19 चर्चांमधून काही निष्पन्न झाले नाही,१९०० चर्चांमधून सुधा काही निष्पन्न होणार नाही . जेव्हा चीनला वाटेल की, भारताने चीनचे प्रभुत्व मान्य केले आहे, तेव्हाच चीन हे प्रश्न सोडवेल. लष्कराचा विरोध असूनही सरकारी आदेशामुळे भारतीय संरक्षण दलाने चुमार येथील बंकर तोडण्याचा निर्णय घेतला. ज्या चिन्यांनी घुसखोरी केली, त्यांना मागे ढकलायचे सोडून, आपले सैन्यच आपल्याच प्रदेशात मागे घेणे ही कोठली राजनीती? राजकीय पक्ष काहीच का बोलत नाही ? चीनमध्ये नवे नेतृत्व आल्यानंतर शिरस्त्याप्रमाणे नवे अध्यक्ष शी जिंगपिंग यांनी भारताशी मैत्री करण्याची भाषा केली.चीनला भारताची बाजारपेठ हवी आहे, मात्र मैत्री नको.व्यापार वाढवला की चीनचा आक्रमकता नाहिशी होईल का? चीन दौरा रद्द करावयास हवा होता पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी वास्तविक, आपला २२-२४/१०/२०१३चा चीन दौरा रद्द करावयास हवा होता.भारताला अडचणीत आणण्याची एकही संधी चीन दवडत नाही. अरुणाचलातील दोन खेळाडूना स्पर्धेसाठी व्हिसा देण्याचा मुद्दा असो वा पाकिस्तानला अणुभट्टय़ा पुरवण्याचा. चीन कोणालाही भीक घालत नाही.पंतप्रधान मनमोहन सिंग हे अधिकृत दौऱ्यासाठी चीनमध्ये येणार हे माहीत असताना चीनने हा उद्योग केला. अणुऊर्जा निर्मितीसंदर्भातील सर्व कायदेकानून आणि आंतरराष्ट्रीय संकेत बाजूला सारून चीनने पाकिस्तानला अणुभट्टय़ा देण्याचा चंग बांधला आहे. पाकिस्तानचे यांचे चोरटे अणुउद्योग चीनच्याच सहकार्याने सुरू आहेत.या कुरापती चीनच्या आहेत . यानंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी वास्तविक, आपला चीन दौरा रद्द करावयास हवा होता.आंतरराष्ट्रीय संबंधांत फक्त स्वहिताचाच विचार असतो. पाकिस्तानसाठी दोन मोठय़ा अणुभट्टय़ा उभारून देण्याचे चीनचे काम हे याच हितसंबंधांचे निदर्शक आहे. दोन आठवडे आधी अरुणाचल प्रदेशातील दोन खेळाडूंना व्हिसा देण्याचे चीनने नाकारले. का? तर चीनच्या मते अरुणाचल हा चीनचाच भाग आहे त्यामुळे त्या प्रदेशातील व्यक्तींना व्हिसा देण्याची गरज नाही. या दोन्ही घटनांनंतर आपण फक्त निषेध नोंदवला.आपण मात्र पंतप्रधानांच्या चीन दौऱ्यात उभय देशांतील व्हिसा नियम शिथिल करण्यासंदर्भात करार होणार हो्तो. गेले सहा-सात महिने चीन हा सातत्याने आपल्या विरोधात कारवाया करीत असून भूप्रदेश बळकावण्यापासून अनेक उचापती त्या देशाने केल्या आहेत. कोणी महत्त्वाचा चिनी नेता भारतात येणार असताना, भारतीय नेत्याचा चीन दौरा तोंडावर आलेला असताना वा उभय देशांतील महत्त्वाच्या चर्चेच्या पाश्र्वभूमीवर चीनकडून हे उद्योग केले जातात. आताही पंतप्रधान मनमोहन सिंग महत्त्वाच्या दौऱ्यासाठी चीनला भेट देणार असतानाच चीनचे उद्योग समोर आले.

No comments:

Post a Comment