Total Pageviews

Monday, 28 October 2013

PATANA BOM BLASTS NARENDRA MODI & TERROR ATTACKS

नरेंद्र मोदी च्या, पाटण्यातील आयोजित सभेपूर्वी झालेळॆ बॉम्बस्फोट पाकच्या गोळीबारात लष्करी अधिकारी हुतात्मा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलओसी) उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत केलेल्या गोळीबारात भारतीय लष्करातील कनिष्ठ विभागातील एक अधिकारी हुतात्मा झाला.गोळीबाराच्या या घटनेनंतर श्रीनगर-मुझफ्फराबाद बससेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. दहशतवाद्यांना सीमेवरून घुसविण्यासाठी पाककडून हा गोळीबार करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.पाकिस्तानकडून या वर्षभरात 130 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. गेल्या आठ वर्षांत यावर्षी सर्वाधिकवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे. 14 ऑक्टोबरला सीमेवर झालेल्या गोळीबारात तीन भारतीय जवान हुतात्मा झाले होते. इंटरनेट विश्वात दोन्ही देशांमधील नेटिझन्समध्ये सायबर युद्ध सुरू आता इंटरनेट विश्वात दोन्ही देशांमधील नेटिझन्समध्ये एक प्रकारचे सायबर युद्ध सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. भारतातील विविध राज्यांमधील नागरिकांनी आंदोलने करून, पाकिस्तानचा धिक्कार केला. मात्र, युवा पिढीला आपले थेट मत मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ म्हणजे सोशल नेटवर्किंग साईटस. इंटरनेट विश्वामध्ये सध्या सोशल नेटवर्किंगसाठी आघाडीवर असलेल्या फेसबुक, ट्‌विटर व विविध वृत्तपत्रांच्या संकेतस्थळावर नेटिझन्स आक्रमक झालेले दिसताना पाहायला मिळत आहे. जगभर पसरलेल्या भारतीय नेटिझन्सनी वेगवेगळ्या संकेतस्थळावर आपले थेट मत व्यक्त केल्याचे दिसत आहे. भारतातील नेटिझन्सनी पाकिस्तानचा तीव्र शब्दामध्ये धिक्कार करून, त्यांच्यावर थेट सायबर हल्लाच केला. सायबर वॉरमध्येही भारताने पाकिस्तानवर विजय मिळविल्याचे दिसते. सायबर युद्धात लढाई जिंकून, दोन्ही भारतीय सैनिकांना नेटिझन्सनी आदरांजली वाहिली आहे. भारत माता की जय, --अमर रहे... या घोषणा पाहायला मिळत आहेत. इंटरनेटवरील विविध वृत्तपत्रांची संकेतस्थळे व सोशल नेटवर्किंगवरील विविध साइटस या थेट मत मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ ठरले आहे. भारतीय सैनिकांची मनोधैर्य वाढविण्यासाठी फेसबुकवर विविध पेजेस तयार झाली असून, एका प्रतिक्रियेवर अनेक प्रतिक्रिया पडत असल्याचे दिसत आहे. भारतीय सैनिकांच्या कामगिरीची छायाचित्रे, व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होताना दिसत आहेत. इंटरविश्वात फक्त भारत-पाक - आठ जानेवारीपासून इंटरनेट क्षेत्रामध्ये भारत-पाक, बॉर्डर, भारतीय सैनिक हा ट्रेंड. - भारतीय सैनिकांची कामगिरीची छायाचित्रांची मोठ्या प्रमाणात शेअरींग. - इंटरनेट विश्वामध्ये भारत-पाक युद्धात भारताचा विजय. - पाकिस्तानच्या संकेतस्थळावर भारताच्या बाजूने मतप्रवाह. - भारत-पाक युद्धाचे व्हिडिओ पाहण्याचे प्रमाण वाढले. इंडियन मुजाहिदीनचा हात पाटणा येथील सभास्थळाजवळ साखळी बॉम्बस्फोट घडविण्यात इंडियन मुजाहिदीनचा हात असल्याचा संशय असून स्फोटांसाठी 'बोध गया'चे मॉडेल वापरण्यात आले.बॉम्बस्फोटांनंतर पोलिसांनी चार संशयितांना अटक केली आहे. इम्तियाज अन्सारी, ऐनुल, अख्तर आणि कलीम अशी त्यांची नावे आहे. यातील ऐनुल हा स्फोटात जखमी झाला असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इम्तियाजच्या घरी पाटणा पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात डिटोनेटर, ज्वालाग्राही पावडर, प्रेशर कुकर बॉम्ब, जिहादी साहित्य, हातोडी, रॉकेल, सीडी तसेच स्फोटकांमध्ये वापरले जाणारे फ्युज आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी इम्तियाजचा भाऊ व वडिलांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू केली आहे. रांचीत शिजला कट आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार सभास्थळी बॉम्बस्फोट करण्याचा कट इम्तियाजच्या रांची येथील घरी रचला गेला होता. मोनू ऊर्फ तहसिन हा या कटाचा सूत्रधार असून तो सध्या अटकेत असलेला दहशतवादी यासिन भटकळच्या गटातील आहे. फोन नंबर मिळाले आणि धागेदोरे जुळले बॉम्ब ठेवण्यासाठी आलेल्या अन्सारी याला त्याच्या बॉसेसनी मोबाइल न वापरण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे त्याने एका कागदावर काही नंबर लिहून स्वत:जवळ ठेवले होते. अन्सारीला अटक केल्यानंतर हे फोन नंबर पोलिसांच्या हाती लागले. त्यामुळे इतरांचा ठावठिकाणा लागण्यास मदत झाली. गुजरातचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या, पाटण्यातील गांधी मैदानावर रविवारी आयोजित जाहीर सभेपूर्वी झालेल्या बॉम्बस्फोटांचा आणि हे नापाक कृत्य करणार्‍या नराधमांचा जेवढा धिक्कार करावा, तेवढा थोडाच आहे. या सभेपूर्वी सात बॉम्बस्फोट होऊन पाच कार्यकर्त्यांना प्राणास मुकावे लागले आाणि सुमारे ५० कार्यकर्ते जखमी झाले. भारतात लोकशाही आहे आणि संविधानानुसार सत्तारूढ पक्षासोबतच विरोधी पक्षांनाही तेवढेच स्थान आहे. सरकारच्या धोरणांकडे जनतेचे लक्ष वेधणे, त्यातील बर्‍यावाईटाची जाण करून देणे, त्या निर्णयांवर आपले मत संसदेत, विधानसभेत तसेच सार्वजनिक रीत्याही मांडणे हे सक्षम विरोधी पक्षाचे कामच आहे. आज भारतीय जनता पक्ष हा देशातील सर्वांत मोठा विरोधी पक्ष आहे. लोकसभा आणि राज्यसभेत या पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपद आहे. त्यामुळे सत्तारूढ पक्षासोबतच विरोधी पक्षांच्या कार्यक्रमांनाही समान सुरक्षा प्रदान करणे, हे संबंधित राज्यातील सरकारचे कर्तव्य आहे. परंतु, हे कर्तव्य बजावण्यात जदयुचे नितीशकुमार सरकार अपयशी ठरले आहे, असेच म्हणावे लागेल. आमच्याकडून सुरक्षेत कोणतीही हयगय झाली नाही, असे नितीशकुमार यांनी म्हटले असले, तरी सकाळी १० वाजताच्या सुमारासच नवीन पाटणा रेल्वेस्थानकावरील प्रसाधनगृहात पहिला बॉम्बस्फोट घडून आला होता. एक बॉम्ब निकामी करताना एक जवान जखमीही झाला होता. या घटनेनंतर मोदींच्या रॅलीला संरक्षण देण्याची कडक सुरक्षा व्यवस्था बिहार सरकारला करता आली असती. कारण, मोदींची रॅली त्यानंतर चार तासांनंतर सुरू झाली होती. या चार तासांत रॅलीभोवती सुरक्षा कडे उभारता आले असते, घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, प्रत्येक कार्यकर्त्याची कसून तपासणी करता आली असती. त्याला कुणीही आक्षेप घेतला नसता. पण, तसे झालेले दिसत नाही. नितीशकुमार म्हणाले की, आम्हाला केंद्राकडून रॅलीत काही अनुचित प्रकार घडणार असल्याची कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती. यामुळे हे अतिरेक्यांनी घडवून आणलेले स्फोट आहेत, की कुणी बिहारला बदनाम करण्यासाठी राजकीय वैमनस्यातून घडवून आणलेले कृत्य आहे, हे आताच सांगता येणार नाही. या घटनेत एका इसमाला अटक करण्यात आली आहे. त्याने एवढेच सांगितले आहे की, सभास्थळाची आमच्या ११ सदस्यीय चमूने आधीच पाहणी केली होती. पण, ही चमू कोणत्या संघटनेशी संबंधित आहे, हे मात्र सांगण्यास नितीशकुमार यांनी नकार दिला आहे. तपास सुरू असल्यामुळे आताच काहीही सांगता येणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. ते योग्यही आहे. नितीशकुमार म्हणतात, आम्हाला अलर्ट सूचना नव्हती. पण, मोदींच्या सभेच्या चार तासांआधीच एका बॉम्बचा स्फोट झाला होता आणि पेरून ठेवलेला एक बॉम्ब निकामी करण्यात आला असतानाही, अलर्ट सूचनेची आवश्यकता होती का? चार तासांच्या आत बरेच काही करता आले असते. पण, सभामैदानाची सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात नितीशकुमार यांच्याकडून कसूर झाली, असेच एकंदरीत चित्र आहे. नितीशकुमार यांनी या घटनेचा निषेध केला असला, मृतकांच्या वारसांना पाच लाखांची मदत जाहीर केली असली, तरी तेवढ्याने हा प्रश्‍न सुटणारा नाही. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींच्या प्रचाराला प्रारंभ झाला आहे. त्यानंतर लगेच लोकसभेच्या निवडणुका आहेत. आज भाजपाकडून नरेंद्र मोदी आणि सत्तारूढ कॉंग्रेसकडून राहुल गांधी अनेक राज्यांमध्ये प्रचारसभा घेत आहेत. त्यामुळे केवळ भाजपाच्या सभांना सुरक्षा प्रदान करण्याचा नव्हे, तर राहुल गांधी यांच्या सभांनाही तेवढीच चोख सुरक्षा व्यवस्था प्रदान करावी लागणार आहे. अनेक राज्यांमध्ये भाजपाची, अनेक राज्यांत कॉंग्रेसची, तर अनेक राज्यांत प्रादेशिक पक्षांची सरकारे आहेत. पण, देशातील प्रमुख विरोधी पक्षांचे नेते हे येत्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशभर प्रचारासाठी फिरणार आहेत. त्यामुळे बिहारच्या घटनेपासून आतापासूनच सर्व राज्यांनी सावधगिरीच्या उपाययोजना आखण्यास सुरुवात केली पाहिजे. इंटेलिजन्स आणि स्थानिक विशेष शाखांनी आतापासूनच दक्ष राहण्याची गरज आहे.बिहारच्या घटनेमुळे राज्य आणि केंद्रातील इंटेलिजन्स यंत्रणा चौकस दृष्टी ठेवण्यात अपयशी ठरली आहे, असेच म्हणावे लागेल. रेल्वेस्थानकावर पहिला बॉम्बस्फोट झाल्यानंतरच बरीच पळापळ झाली होती. सभेत बॉम्बस्फोट घडवून आणला तर पळापळ होईल, चेंगराचेंगरी होईल आणि यात मोठी मनुष्यहानी होईल, असा बॉम्बस्फोट घडवून आणणार्‍यांचा मनसुबा होता. एकदा बिहारमध्ये यश आले की, मग मोदींच्या सभेला गर्दी होणार नाही, हा या कारस्थानामागील उद्देेश होता, हेही उघडच दिसत आहे. मोदींना देशाचे काहीच कळत नाही, त्यांनी गुजरात सांभाळावे, असा सल्ला कॉंग्रेससह अनेक पक्षांनी दिला होता. पण, मोदींच्या सभांना प्रत्येक ठिकाणी मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद पाहता, सर्वच पक्षांचे धाबे दणाणले आहे. प्रामुख्याने उत्तरप्रदेश आणि बिहारमध्येही हजारोंच्या संख्येने जनता मोदींचे भाषण ऐकायला येते, हा संकेत सर्वच पक्षांसाठी धोक्याची घंटा आहे. एवढी मोठी घटना घडूनही नरेंद्र मोदी यांनी घेतलेली संयमित भूमिका स्वागतार्ह आहे. त्यांनी सभेची सांगता करताना, सर्व कार्यकर्त्यांना व्यासपीठावरूनच शांत राहण्याचे जाहीर आवाहन केले. घटनेनंतर बोलतानाही त्यांनी कोणतीच तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. बिहारच्या घटनेनंतर देशाच्या अन्य भागातही नेत्यांच्या सभा होतील. त्या वेळी सतर्क राहण्याची गरज आहे. सोबतच अन्य पक्षांनीही सभास्थानी लक्ष देण्यासाठी स्वत:चे स्वयंसेवक ठेवले पाहिजेत. जनतेनेही बिहारच्या घटनेमुळे क्रोधित न होता, शांतताच पाळली पाहिजे. तोच खरा मानवधर्म आहे.

No comments:

Post a Comment