Total Pageviews

Wednesday, 16 October 2013

आव्हान चिनी ड्रॅगनचे - ब्रिगेडियर हेमंत महाजन

आव्हान चिनी ड्रॅगनचे - ब्रिगेडियर हेमंत महाजन Added On: October 16, 2013 1 Visits [Edit] Tags: INDOCHINA RELATIONS, CHINA, CHINESE DRAGON आव्हान चिनी ड्रॅगनचे - ब्रिगेडियर हेमंत महाजन 1962 चे चिनी आक्रमण व अपयश आपल्या सेनेचे नाही तर नेत्यांचे होते. 1962 च्या घोडचुकांपासून आपण काही शिकलो का? भारतीय द्वीपकल्पाभोवती नाविक "तळाची माळ" चीन प्रस्थापित करीत आहे. चीन ब्रम्हपुत्रेचे पाणी पळवतोय. चीनची आर्थिक घुसखोरी आणि बाजारपेठेत आक्रमण थाबंले पाहिजे. आपण चीनच्या पुढे नेहमीच गुडघे का टेकतो? चीनशी चर्चेतून काही निष्पन्न झाले आहे का? भारताची कुरापत काढणे सोपे आहे म्हणून भारताला शह देऊन चीन जगाला आपण महासत्ता असल्याचा इशारा देत आहे. आपला चीनसंबंधीचा कटू अनुभव बिलकूल न विसरता भारताने एकात्मिक सुरक्षेकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. एकाच वेळी चीन, पाकिस्तान, दहशतवादी, माओवाद्यांशी युद्ध लढण्याची तयारी आवश्यक आहे. जर तुम्हाला युद्ध टाळायचं असेल तर युद्धाकरिता सक्षम व सज्ज राहा. त्यासाठी प्रखर राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. लष्कराची, संरक्षण सामग्रीची सिद्धता आणि डावपेचांच्या आघाडीवरील प्रयत्नांना राजकीय नेतृत्वाच्या कणखर भूमिकेची जोड मिळाली, तर चीनचे आव्हान परतविणे भारताला मुळीच कठीण जाणार नाही. आव्हान चिनी ड्रॅगनचे हे ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचे पुस्तक 1962 चे चिनी आक्रमण, भारत चीन संबंधाचे आजचे स्वरूप,- भविष्यात चीनसोबत युद्ध होईल का ? असे अनेक पैलू सांगणारे सुबोध पुस्तक आहे. चीन संबंधी बरीच इंग्रजी पुस्तके आहेत. मराठीत मात्र अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकीही नाहीत. ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी अतिशय मेहनतीने संशोधन करून हे अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिले आहे. चीनच्या उपद्रवी कारवायांविषयी जनमानस जागृत करण्याचा हा लेखक- प्रकाशक यांचा संयुक्त प्रयत्न आहे.

No comments:

Post a Comment