भावनांचे राजकारण आणि लोकांचे हित
भावनांचे राजकारण करणे आणि लोकांना हितकारक असे प्रशासन करणे या दोन्ही गोष्टी भि आहेत. या संदर्भात आजवर अनेक अनुभव आलेले आहेत. मुस्लिम जातीयवादी भावनांना चिथावणी देऊन जिनांनी पाकिस्तान मिळविले खरे, पण पाकिस्तानची आजची अवस्था पाहिली तर पाकिस्तान मिळवून जिनांनी पाकिस्तानच्या मुसलमानांचे हित केले की अहित याचा हिशोब करण्याची वेळ आली आहे. भारतातले मुसलमान अधिक सुरक्षित आहेत की पाकिस्तानमधले? यावर परखड चर्चा झाली पाहिजे. तशी झाली तरच काश्मीरमध्ये जातीयवादी भावना भडकवून दहशतवाद्यांना समर्थन देण्याचा फुटीरतावाद्यांचा जो प्रयत्न सुरू आहे त्याला आळा बसेल. काश्मीरमधले मुसलमान असुरक्षित पाकिस्तानमध्ये जाण्याऐवजी भारतात सुरक्षितपणे जगणे अधिक पसंत करतील. परंतु मुसलमानांच्या प्रश्नावर स्पष्ट व परखड बोलणे म्हणजे या देशात जातीयवाद ठरतो.जे पाकिस्तानबाबत तेच उत्तर प्रदेशबाबत घडत आहे. दलितांवर होणाऱ्या सामाजिक अन्यायाच्या विरोधात मायावतींनी आपले राजकीय सामर्थ्य उभे केले. याच सामर्थ्याचा उपयोग करून उत्तर प्रदेशातील सत्ताही हस्तगत केली. मायवती सत्तेवर आल्यानंतर या देशात राजकीय परिवर्तनाचा झंझावात निर्माण होईल असाही अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु उत्तर प्रदेश वगळता अन्य राज्यात या क"ांतीचा पडसाद तर उमटला नाहीच, परंतु उत्तर प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसात ज्या घटना घडत आहेत त्यांनी मायावतींना नेमके कायसाधायचे आहे, यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. मायावती सत्तेवर आल्यानंतर प्रारंभीच्या काळात जिल्ह्यांची नावे बदलणे यासार"या भावनात्मक निर्णयाबरोबरच त्यांनी कायदा व सुरक्षेच्या स्थितीवर चांगल्यापैकी नियंत्रण आणले. परंतु त्यानंतर आपली सत्ता टिकविण्याकरिता त्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर अधिकाधिक विसंबू लागल्या आणि त्याचा परिणाम आज उत्तर प्रदेशात दिसत आहे. गुन्हेगारी प्रवृत्तींचा प्रभाव वाढला तर त्याचा सर्वाधिक त्रास हा समाजातील दुर्बळ घटकांनाच होतो. त्यामुळे भावनेचे राजकारण करून सत्तेवर येणे व खऱ्या अर्थाने लोकांना हितकारक असे प्रशासन चालविणे या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही मायावती आपला पाय रोवण्याचा प्रयत्न करीत आहेत. रिपब्लिकन पक्षाची भाजप-सेना युतीसोबत जी आघाडी होऊ घातली आहे या पार्श्वभूमीवर मायवतीचा प्रभाव वाढणे कॉंग"ेस व राष्ट्रवादीला हितकारक वाटले तरी मागच्या वेळी मायावतींच्या आगमनाची चर्चा करण्यात व त्यांना पाठिंबा देण्यात जो उत्साह होता तो यावेळी दिसला नाही. याचे कारणही त्यांच्या उत्तर प्रदेशमधल्या प्रशासनाचे अपयश हेच आहे.या पार्श्र्वभूमीवर उठसूठ मुसलमानांवर अन्याय होतो, असा ओरडा करीत सच्चर आयोगाच्या नावाने राजकारण करण्यावर केंद्रीय अल्पसं"याक मंत्री सलमान खुर्शीद यांनी जी टीका केली आहे ती महत्त्वाची आहे. सच्चर आयोगाच्या शिफारशी म्हणजे कुराणांच्या कलमासारखी पवित्र वचने नव्हेत असे सांगून आपल्या कोंडून घेतलेल्या मानसिकतेतून बाहेर पडण्याचा त्यांनी मुसलमानांना सल्ला दिला आहे. लोकपालांसार"या सर्वत्र चर्चेला असलेल्या मुद्द्यावर मुस्लिम समाज मौन पाळून आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे. अल्पसं"याक आयोग हा केवळ मुसलमानांकरिता नसून तो अन्य अल्पसं"याकांकरिताही आहे, याचीही त्यांनी जाणीव करून दिली.एखाद्या विशिष्ट समाजाच्या भावना भडकवून त्यावर केलेले राजकारण हे लोकांच्या स्थायी हिताचे नसते, असा अनुभव असूनही तसे प्रयत्न कमी झालेले नाहीत. किंबहुना सलमान खुर्शीद काहीही म्हणाले असले तरी खुद्द त्या पक्षाचेच नेते दिग्विजय सिंग अशाच प्रकारचे राजकारण करण्यात अग"भागी आहेत. ज्या मध्यप्रदेशचे दिग्विजयसिंग मु"यमंत्री होते त्या मध्यप्रदेशमधल्या नुकत्याच झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत जबेरा मतदारसंघातील कॉंग्रेसची जागा भाजपने जिंकून घेतली आहे. फेब"ुवारी महिन्यात झालेल्या दोन पोटनिवडणुकांतही भाजपने कॉंग"ेसकडून दोन जागा आपल्याकडे खेचून आणल्या आहेत. शिवराजसिंग चौहान सरकारने जे प्रशासनिक कौशल्य दाखविले आहे त्याचा तो पुरावा आहे. नरेंद्र मोदींवर सातत्याने टीका होत असतानाही तिथल्या निवडणुकीत तिथली जनता त्यांच्यावर जो विश्वास दाखवीत आहे तो त्यांच्या प्रशासनिक कौशल्यामुळे. त्यामुळे केवळजातीय किंवा भावनिक अभिनिवेशातून केलेले राजकारण तात्कालिक लाभ मिळवून देते, परंतु राज्यकर्त्यांच्या मनात लोकहिताविषयी आस्था नसेल तर मिळालेली सत्ता ही समाजाचा अपेक्षाभंग करणारी ठरते. केंद्र सरकारच्या सार्वत्रिक अपयशामुळे अल्पसं"याक समाजाची जातीय भावना भडकावत ठेवत राजकारण करणे एवढाच पर्याय आज कॉंग"ेसजवळ शिल्लक आहे हे कॉंग"ेसला माहिती असल्याने त्या पक्षात दिग्विजयसिंग यांच्यासार"यांना महत्त्व आले आहे. उत्तर प्रदेशसार"या प्रशासनाच्या दृष्टीने अपयशी ठरलेल्या राज्यात त्यांचे हे धोरण यशस्वी ठरेल, असा त्यांना विश्र्वास वाटतो. परंतु मध्यप्रदेशसार"या चांगले प्रशासन देणाऱ्या राज्यात अशा राजकारणाचा काही उपयोग होत नाही. हाच अनुभव बिहार, गुजरात, छत्तीसगड यांचाही आहे. काश्मीरमध्ये कोणतेही सरकार चांगले प्रशासन देण्यास असमर्थ ठरले आहे. त्यामुळे त्या प्रशासनाविरोधी भावना देशाच्या विरोधात पाकिस्तान व दहशतवादी वापरत आहेत. त्यामुळे कॉंग"ेसच्या जातीयवादी प्रचाराला भाजपला उत्तर द्यायचे असेल तर ही उदाहरणे त्या पक्षाला सातत्याने लोकांपुढे ठेवायला लागतील. आपापसातील भांडणातून त्यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हे काम त्यांना करता येण्यासारखे आहे.
No comments:
Post a Comment