मुंबई पुन: पुन्हा निरपराध्यांच्या रक्ताने भिजते आहे. या रक्ताच्या थेंबातून क्रांतीचा वणवा पेटल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत!
फक्त श्रद्धांजल्याच वहा!मुंबई पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाने हादरली आहे. रक्ताच्या लोटाने भिजली आहे. निरपराध्यांच्या करुण किंकाळ्यांनी थिजली आहे. दादरचा कबुतरखाना, गिरगावचा ऑपेरा हाऊस परिसर, झवेरी बाजारातील भीषण बॉम्बस्फोटांनी पुन्हा एकदा जखमी आणि मृतांचे ढिगारेच पाडले. इस्लामी दहशतवाद मुंबईच्या छाताडावर नाचतो आहे आणि राज्यकर्ते जनतेला शांततेचे व संयमाचे आवाहन करीत आहेत. पृथ्वीराज चव्हाणांपासून अजित पवार, आर. आर. पाटलांपर्यंत सरकारचे सर्व ‘यमदूत’ सांगत आहेत, ‘लोकांनो संयम सोडू नका. धीराने घ्या.’ कालच्या हल्ल्यात जे मृत झालेत त्यांच्या नातेवाईकांना धीराने वागण्याचा संदेश देण्याच्या या पोपटपंचीने गेलेली माणसे परत येणार नाहीत. जे जखमी, कायमचे अपंग आणि जायबंदी झालेत त्यांना पुन्हा स्वत:च्या पायावर उभे राहता येणार नाही. तेव्हा कोणत्या धीराच्या गोष्टी आपण करीत आहोत. मुंबईसारख्या शहरातील लोकांनी कसे जगायचे? पावलोपावली धोका आहे. पोलीस यंत्रणा सत्ताधार्यांची राजकीय गुलाम बनली आहे व गुलामांकडून जनतेच्या संरक्षणाची अपेक्षा ठेवता येत नाही. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात लोकांनी जेवढे रक्त सांडले नसेल त्याच्या कित्येक पट रक्त आज अतिरेक्यांच्या हल्ल्यात धो धो वाहताना दिसत आहे. निदान स्वातंत्र्यलढ्यातील रक्तातून ब्रिटिशांना ‘चले जाव’चा संदेश तरी मिळाला व त्याच रक्ताने जो वन्ही चेतला त्यातून पारतंत्र्याच्या बेड्या तुटल्या. पण आज सामान्य निरपराधांचे रक्त का सांडत आहेत? ते बळी का जात आहेत? कोणामुळे जात आहेत? देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी शिक्षा भोगल्या. फासावर गेले; पण हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यावर गोळ्या झाडणार्या अफझल गुरू आणि कसाबला फाशीची शिक्षा ठोठावूनही ते आजही जिवंत आहेत. लोकमान्य टिळकांनी ‘केसरी’तून ब्रिटिश सरकारच्या विरोधात संताप व्यक्त करताना ‘या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?’ असा जळजळीत अग्रलेख लिहिला होता. पण ब्रिटिशांना डोकं तरी होतं. आताच्या सरकारला डोकंच नाही तर ठिकाणावर यायचा प्रश्नच नाही! मतांच्या लाचारीसाठी मुस्लिमांचे झालेले लांगुलचालन हेच देशाच्या मुळावर आले आहे. आम्ही मुस्लिमद्वेष्टे नाही. आमच्या विचारांतही मुस्लिमद्वेष नाही. पण सरकारच्या मुस्लिम अनुनयाच्या धोरणांनीच आम्हाला मुस्लिमद्वेष्टे बनायला भाग पाडले. आताच्या कॉंग्रेस सरकारात मुस्लिम अनुनयाची एवढी घाण साचली आहे की, आमच्या तोंडातून आता जहरच बाहेर पडणार! मुंबईत बेरोजगार मराठी तरुणांच्या ‘शिववडा’ गाड्यांवर बेगुमान कारवाई करणारे आयुक्त भेंडीबाजारात जाऊन तेथील अनधिकृत कामांवर हातोडा मारण्याची हिंमत दाखवत नाहीत. ‘वडा’ उचलला जातो आणि अतिरेक्यांचा ‘बॉम्ब’ रस्त्यावर तसाच ठेवल्याने निरपराध्यांचे बळी घेतो. उद्या गणेशोत्सवातील मंडप उभारणीवर पोलीस आयुक्त व न्यायालये बंधने घालणारच आहेत. या राज्यात शाहिस्तेखानाची बोटे तोडायची नाहीत, अफझल खानाचा कोथळा काढायचा नाही! का, तर मुस्लिमांच्या भावना दुखवायच्या नाहीत म्हणून. पण हिंदूंच्या भावनांची दखल कोणी घ्यायची म्हटले तर त्याला धर्मनिरपेक्ष व एकात्मतेचा शत्रू ठरवून गुन्हेगार मानले जाते. तुमच्या त्या धर्मनिरपेक्षतेच्या चिंधड्या बुधवारी पुन्हा एकदा मुंबईच्या रस्त्यांवर उडाल्या आहेत. दहशतवादाला जात नसते, धर्मही नसतो हे खरेच. कारण मुंबईवरील हल्ल्यांत अनेक मुसलमानही मारले गेलेत. इराक, इराण, पाकिस्तान, अफगाणिस्तानातील बॉम्बस्फोट घडविणारे आणि त्यात मरणारेही फक्त मुसलमानच आहेत. पण त्यांच्या देशात काय चालले आहे त्यापेक्षा आमच्या देशात इस्लामी दहशतवाद्यांना कोण रसद पुरवत आहेत हे पाहणे महत्त्वाचे आहे. इस्लामी दहशतवादी संघटनेने या देशातील भुसभुशीत जमिनीत असंख्य बिळे पाडून त्यात सापांची पैदास वाढवली आहे. या सापांचे विषारी फूत्कार देशाला खतम करीत आहेत. दुश्मन सीमापार नसून घरातच आहे. आधी घरातल्या सापांचे फणे ठेचा. त्यांना दूध पाजणे बंद करा व मगच परकीय हातांचा बंदोबस्त करा. मुंबई पुन: पुन्हा निरपराध्यांच्या रक्ताने भिजते आहे. या रक्ताच्या थेंबातून क्रांतीचा वणवा पेटल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत! नुसत्या श्रद्धांजल्या व पुष्पचक्रे वाहून काय होणार?
No comments:
Post a Comment