Total Pageviews

Friday, 3 June 2011

social reponsibility

स्वयंशासनाचा दिलासादायक प्रयोग! nashik(03-June-2011) Tags : Editorialदेशात सध्या लोकसंख्यावाढीशी वाहनसंख्यावाढीची स्पर्धा सुरू आहे. रस्ते रुंद केले जात आहेत तथापि वाढत्या वाहनसंख्येला ते कमीच पडतात. लोकांच्या बदलत्या आवडीनिवडीमुळे रस्त्यावरील वाहतुकीला नवे नवे अडथळे निर्माण होत आहेत. लग्नकार्याच्या हंगामात वधूवरांच्या मिरवणुका म्हणजे तर हुकमीट्रॅफिक जाम’च! त्या मिरवणुकात मिरवणारे पोलिसांनाही जुमानत नाहीत. शिमग्याच्या सणाचे स्वरूप बदलले. वेडेवाकडे अंगविक्षेप करीत रस्त्यात नाचण्याची युवावर्गाची हौस त्यामुळे हल्ली लग्नातील मिरवणुकीत एकवटते. रस्ता वाहतुकीचे सगळे नियम धाब्यावर बसवले जातात. वाहतूक तासन्‌तास खोळंबते. म्हणून या समस्येची तड लावण्यासाठी जिल्हा लॉन्स मंगल कार्यालय असोसिएशनने निर्धार केला आहे. ज्या लॉन किंवा कार्यालयातील लग्नात वर्‍हाडी किंवा तरुण नाचू लागतील त्या कार्यालयास ५१ हजार रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. १५ जूनपासून तो अमलात येणार आहे. लॉन्स मंगल कार्यालय असोसिएशनने हा निर्णय घेऊन सामाजिक जबाबदारीचे भान दाखवून दिले आहे. जुन्या रुढी-परंपरा मोडीत निघत आहेत. नव्या रूढ होत आहेत. पण ते नवे पायंडे पाडणारी मंडळी इतरांच्या होणार्‍या गैरसोयीबद्दल सर्वस्वी बेफिकीर असतात. डीजेसारख्या कर्णकर्कश वाद्यांचा वापर हे त्याचे नमुनेदार उदाहरण आहे. मिरवणुकीत मिरवणे नाचणे, त्यासाठी रस्ता वाहतुकीचे सगळे नियम धाब्यावर बसवणे वाहतुकीला अडथळा करणे हा तरुणांना आपला हक्क वाटू लागला आहे. नाशिक शहरातील काही रस्त्यांवर अशा मिरवणुकींनी होणारी कोंडी जनतेला असह्य होत आहे. औरंगाबाद नाका ते नांदूर नाका दरम्यान अनेक लॉन्स आणि मंगल कार्यालये रस्त्याच्या दुतर्फा उभी राहिली आहेत. त्या रस्त्यावर केवळ मिरवणुकांमुळे वाहतुकीची तासन्‌तास कोंडी होते. परिसरातील जनता कार्यालये आणि लॉन्सच्या व्यवस्थापनाविरोधी राग व्यक्त करीत आहे. तो लक्षात घेऊन त्यांच्या संघटनेने त्या प्रश्‍नाचा गांभीर्याने विचार केला भरघोेस दंडाचा नियम करून वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी स्वयंशासनाचा आश्‍वासक प्रयोग आरंभला आहे. नियम करणे सोपे असते, त्याच्या अंमलबजावणीत अनेक फाटे फुटतात. वैयक्तिक मैत्री नातेसंबंध हा सर्वात मोठा अडथळा ठरू शकतो. त्याला तोंड देण्याचा निर्धार संघटनेच्या सभासदांना दाखवावा लागेल. हा प्रयोग यशस्वी झाला तर कायद्यापेक्षा स्वयंशिस्त आणि स्वयंशासन अधिक प्रभावी ठरते, याचा जनतेला प्रत्यय येईल. संघटनेचे पदाधिकारी केलेल्या नियमांची कटाक्षाने अंमलबजावणी करतील शहर परिसरातील जनतेची वाहतूककोंडीसारख्या गंभीर अडचणीतून पूर्ण मुक्तता करतील अशी त्यांना जनतेच्या वतीने शुभेच्छा
 

No comments:

Post a Comment