Total Pageviews

Friday 3 June 2011

BLACK MONEY IN INDIA

विदेशी बॅंकांतील काळा पैसा - काही प्रश्‍न राजीव साने Friday, June 03, 2011 AT 12:30 AM (IST) समजा परकी देशांतील बॅंकांमध्ये ठेवलेला पैसा भारतात आणला तर त्याचा विनियोग करण्यासाठी प्रचंड आयात करावी लागेल. आयात काहीच केली नाही, तर संपत्ती वाढता पैसा वाढेल प्रचंड चलनवाढीला तोंड देण्याची वेळ येईल.
करचुकवेगिरी करणारे, लाचखोर अवैध धंदेवाले अशा मंडळींवर जप्ती आणून सरकारने त्यांना शिक्षा करावी सरकारचे उत्पन्न (रेव्हेन्यू) वाढवावे (अर्थातच खरोखरीच्या विकासकामांवर लावावे) या म्हणण्यावर कोणाही प्रामाणिक नागरिकाचे दुमत असणार नाही. याकरिता आर्थिक गुन्हेगार असणारे भारतीय नागरिक नेमके कोण, ते सरकारचे किती देणे लागतात, हे सिद्ध करण्याची प्रचंड कायदेशीर प्रक्रिया अगोदर करावी लागेल. समजा एखाद्याची गाडी चोरीला गेली चोराने ती कोणत्या तरी पार्किंग लॉटमध्ये लावून ठेवली, तर ती मूळ मालकाची असल्याचे पुरावे घेऊन आणि पोलिसपार्टी घेऊन पार्किंग लॉटवाल्याकडून ती गाडी ताब्यात घेता येईल. थेड पार्किंग लॉटचालकावर हल्लाबोल करता येणार नाही. या उदाहरणात गाडी ही प्रत्यक्ष संपत्ती आहे मूळ मालक पुराव्यानिशी हजर आहे. पण पैसा म्हणजे प्रत्यक्ष संपत्ती नव्हे; ते फक्त चिन्ह (टोकन) असते. भारतीय नागरिकांनी जी प्रचंड रक्कम निनावी खात्यांत विदेशी बॅंकांत ठेवली आहे, ती मिळविताना त्यांनी जे काही उत्पादन केले, ते तर भारतातच आहे. पण जणू काही स्वित्झर्लंडमध्ये "भारताच्या मालकीचे प्रत्यक्ष संपत्तीचे घबाड' ठेवलेले आहे ते फक्त उचलून आणण्याचाच काय तो अवकाश आहे, असा बाळबोध प्रचार केला जात आहे.
परकी चलन कोण मिळवितो? विदेशी बॅंकांत ठेवलेला पैसा जर रुपयांत असेल, तर काही तरी वस्तू भारताकडून आयात केल्याशिवाय (भारतीय निर्यातदारांना संधी देऊनच) परकीयांना त्याचा वापर करताच येणार नाही. हा रुपयांतील पैसा समजा भारतीयानेच काढला आणि खर्चला किंवा गुंतवला तर त्याला भारतातच खर्च किंवा गुंतवणूक करावी लागेल. म्हणजेच रुपयात असेल तर उत्पादनसंधी शेवटी भारतातच असणार. आता अशी शक्‍यता ध्यानात घेऊ, की या गद्दार भारतीयाने आपला पैसा प्रथम विदेशी चलनात रूपांतरित करून घेतला आणि विदेशातच ठेवला. त्याला परकी चलन कोठून मिळणार? भारतीय निर्यातदार हा एकच प्राणी असा आहे, की जो त्याला परकी चलन देऊ शकेल. रिझर्व्ह बॅंक हे फक्त चॅनेल आहे; स्रोत नव्हे. हवाला पद्धतीने काळा व्यवहार झाला तरी कसल्या तरी निर्यातीच्या मोबदल्यातच तो होत असतो; पण "स्वित्झर्लंड - सिद्धान्त' जर खरा मानला, तर आंतरराष्ट्रीय व्यापारात भारताची लूट होते, हे स्वदेशीवादी म्हणणेच धादान्त खोटे ठरते. स्वदेशीवादी नेहमी असे गृहित धरतात, की भारतीय मालाला पडेल किमती मिळतात आयात मालाला चढेल किमती द्याव्या लागतात लूट होते. याला पुरावा ते असा देतात, की भारत जेवढी निर्यात करतो त्याहून नेहमीच जास्त आयात करतो यामुळे भारतावर (भारतीयांवर) परकी कर्जाचा बोजा चढत जातो. पण हे झाले अधिकृत व्यापाराबाबत. प्रत्यक्ष निर्यात खूपच जास्त असली पाहिजे. कारण स्वित्झर्लंड-सिद्धान्तानुसार भारत जेवढे परकी कर्ज घेतो, त्यापेक्षा किती तरी जास्त कर्ज तो परकीयांना देतो (विदेशी बॅंकांत पैसे ठेवून). म्हणजेच भारत हा वट्ट ऋणको नसून वट्ट धनको देश ठरतो. म्हणजेच साम्राज्यवादी देश हे भारताला लुटत नसून, भारतीय नागरिकच सरकारला ठकवत आहेत, एवढेच सिद्ध होते.
समजा हा पैसा आणलाच तर... आता असे गृहित धरू, की विदेशी बॅंकांमधील भारतीयांच्या पैशाचे ज्या प्रत्यक्ष संपत्तीत रूपांतर झाले आहे, ती संपत्तीसुद्धा कोठे तरी विदेशातच (गुंतवलेली) आहे. बॅंकांकडे फक्त परकीय चलनातले क्रेडिट जमा आहे. समजा सरकारने सगळ्या काळे पैसेवाल्यांना पकडले, जप्ती आणली आणि विदेशी बॅंकांकडे मागणी केली आणि त्या बॅंकांनी ती मान्यही केली, तरी त्या बॅंका फार तर भारताला विदेशी चलन देऊ शकतील. कारण तिथल्या ज्या उद्योगांत प्रत्यक्ष संपत्ती असेल, ती त्या उद्योगांकडून काढून घेण्याचा बॅंकांना काहीच अधिकार पोचत नाही. बॅंकांकडून वित्तपुरवठा घेणाऱ्या तेथील उद्योजकांचा काहीच दोष नाही. त्यामुळे आपल्याला प्रत्यक्ष संपत्ती मिळणारच नाही. आता असेही समजू, की आपल्या काळ्या पैसेवाल्याने फक्त "पार्किंग चार्जेस' देऊन हे चलन नुसतेच पाडून ठेवले आहे. आता हे एवढे प्रचंड विदेशी चलन घेऊन, आपण समजा भारतात आलो, तर हे चलन वसूल कसे करणार? एक मार्ग असा, की भारताला तेवढी प्रचंड आयात पत्करावी लागेल. म्हणजे चंगळवादी वस्तू आणि स्वयंचलित यंत्रे घ्यावी लागतील. आयात काहीच केली नाही, विदेशी चलन नुसतेच रुपयात रूपांतरित केले, तर संपत्ती वाढता पैसा वाढेल प्रचंड चलनवाढ म्हणजेच महागाई पत्करावी लागेल. अशा तऱ्हेने विदेशी बॅंकांतील "भारतीय काळा पैसा' भारतात आणणे हे उद्दिष्टच देशविघातक ठरणारे आहे. या प्रतिपादनात जर काही चूक असेल तर ती सप्रमाण दाखवून देणे हे आंदोलनाच्या समर्थक अर्थतज्ज्ञांचे कर्तव्य आहे. प्रतिक्रियानितीन वाघमारे said: भारताची लोकसंख्या वाढ लक्षात घेता, लोकांना रोजगार निर्मिती करण्यासाठी या पैशाचा वापर केला जावू शकेल. रोजगार हमी योजने मुळे ग्रामीण भागातील जनतेला रोजगार मिळाला तर ते एक क्रांतिकारी पाऊल ठरेल आणि त्या कामावर केला जाणारा सरकारी खर्च दुसर्या चांगल्या विधायक कामासाठी वापरला जावू शकतो. हे काय नवीनच चालवलाय माने साहेबांनी ?? अहो असा असेल तर चीन ची राखीव संपती $ trillion आहे .. मग आता चीनी काय फक्त पैसा खातात कि काय ??? साहेबा - पैसा हा फक्त आयती साठीच वापरू शकतात हा समज चुकीचा आहे. हवालाच काय ? जर काळा पैसा जर परत आला तर आपण जे काही पेट्रोल दिसेल इत्यादीनवर फालतू कर लाऊन त्यांचे भाव वाढवले आहे ते कर काढून त्यांचे भाव कमी करता येतील वरील लेख प्रतिक्रिया वाचून असे वाटते कि, भारतातील बऱ्याच जणांना राजकारण्यांप्रमाणे तो पैसा भारतात यायला नको आहे. तो पैसा आपल्या काही कामात आला नाही तरी चालेल पण जय म्हणतात त्याप्रमाणे भ्रष्टाचार करणार्यांना शिक्षा होऊन पुढे कोणाची तसे करण्याची हिम्मत होणार नाही इतके झाले तरी पुरे.भविष्यात त्याने नक्कीच फरक पडेल. वरील लेख प्रतिक्रिया वाचून असे वाटते कि, भारतातील बऱ्याच जणांना राजकारण्यांप्रमाणे तो पैसा भारतात यायला नको आहे. तो पैसा आपल्या काही कामात आला नाही तरी चालेल पण जय म्हणतात त्याप्रमाणे भ्रष्टाचार करणार्यांना शिक्षा होऊन पुढे कोणाची तसे करण्याची हिम्मत होणार नाही इतके झाले तरी पुरे.भविष्यात त्याने नक्कीच फरक पडेल. रस्त्यावर चालताना ठोस लागून पडू किंवा गाडी चालवतोय म्हणून accident होईल या भीतीने आपण चालणे किंवा गाडी चालवणे थांबवत नाही अर्थात आपला पैसा आपल्या देशात आला म्हणून चलनवाढ होईल किंवा आयात करावी लागेल असे विचार करण्यापेक्षा तो पैसा आपण संशोधन पायाभूत विकास दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना आणि देशाच्या संरक्षणावर खर्च करू शकतो आजही ग्रामीण भागात शाळा आणि शिक्षक नाहीत आरोग्य सेवा नाहीत पोलिसांकडे शास्त्रे नाहीत bullet proof jackets नाहीत bomb squad कडे आधुनिक आणि अत्यावश्यक असा वेश नाही विचार करावा रस्त्यावर चालताना ठोस लागून पडू किंवा गाडी चालवतोय म्हणून accident होईल या भीतीने आपण चालणे किंवा गाडी चालवणे थांबवत नाही अर्थात आपला पैसा आपल्या देशात आला म्हणून चलनवाढ होईल किंवा आयात करावी लागेल असे विचार करण्यापेक्षा तो पैसा आपण संशोधन पायाभूत विकास दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना आणि देशाच्या संरक्षणावर खर्च करू शकतो आजही ग्रामीण भागात शाळा आणि शिक्षक नाहीत आरोग्य सेवा नाहीत पोलिसांकडे शास्त्रे नाहीत bullet proof jackets नाहीत bomb squad कडे आधुनिक आणि अत्यावश्यक असा वेश नाही विचार करावा ह्यांना पैसा संपत्ती नसून केवळ टोकन आहे हे सामाझालेल दिसत नाहीये , आणि जरी हा पैसा परत आणून सुरक्षेवर लावला तरी भारतच बजेट नक्कीच बिघडेल आणि जो शेवटी व्हायचा तोच परिणाम होईन चलनवाढ. काही बाळबोध तर पैसा परत आण आणि दोन वर्ष इनकॅमे टक्स बंद करा असा विधान करायला देखील मागे पुढे बघत नाहीत, ह्या सगळ्या प्रक्रिया आणि प्रोसेस हे बाबा रामदेव ह्यांना नक्कीच माहित नसणार तेव्हा एकतर त्यांचा उपोशानाकडे दुर्लक्ष करावा किंवा यु बी बंकेबारोबेर चर्चा करायला त्यांना पाठवून द्यावं. ह्यांना पैसा संपत्ती नसून केवळ टोकन आहे हे सामाझालेल दिसत नाहीये , आणि जरी हा पैसा परत आणून सुरक्षेवर लावला तरी भारतच बजेट नक्कीच बिघडेल आणि जो शेवटी व्हायचा तोच परिणाम होईन चलनवाढ. काही बाळबोध तर पैसा परत आण आणि दोन वर्ष इनकॅमे टक्स बंद करा असा विधान करायला देखील मागे पुढे बघत नाहीत, ह्या सगळ्या प्रक्रिया आणि प्रोसेस हे बाबा रामदेव ह्यांना नक्कीच माहित नसणार तेव्हा एकतर त्यांचा उपोशानाकडे दुर्लक्ष करावा किंवा यु बी बंकेबारोबेर चर्चा करायला त्यांना पाठवून द्यावं. मी काही अर्थ तज्ञ नाही.. पण आपण वस्तू आयात करण्या ऐवजी आपले कर्ज परत करू शकतो... आणि आयात करायची असेल तर चंगळवादी वस्तू का घेऊ ? विदेशातील कंपन्या घेऊ... सोने घेऊ ... खाणी घेउत .... संरक्षण खात्याला लागणारे तंत्रज्ञान घेऊ...... उर्जा निर्माण करण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान घेऊ..... (सकाळ... कृपया प्रसिद्ध करा ....) परदेशात रुपयात पैसा ठेवता येत नाही हे साने यांना माहित नाही असे दिसते. बाहेर गेलेला पैसा आयात दामदुप्पट दाखवून गेलेला आहे किंवा निर्यातीचे उत्पन्न कमी दाखवून बाहेरच ठेवलेले आहे. पैसा भारतात आला आणि सरकारला त्यावर कर मिळाला तर सरकारची तुट कमी होईल कर्ज कमी होईल. पायाभूत सोयीसाठी परदेशी भिक मागण्याची गरज लागणार नाही. चलनवाढ नोटा छापून होते संपप्ती घरी आणल्यामुळे नाही. परदेशात रुपयात पैसा ठेवता येत नाही हे साने यांना माहित नाही असे दिसते. बाहेर गेलेला पैसा आयात दामदुप्पट दाखवून गेलेला आहे किंवा निर्यातीचे उत्पन्न कमी दाखवून बाहेरच ठेवलेले आहे. पैसा भारतात आला आणि सरकारला त्यावर कर मिळाला तर सरकारची तुट कमी होईल कर्ज कमी होईल. पायाभूत सोयीसाठी परदेशी भिक मागण्याची गरज लागणार नाही. चलनवाढ नोटा छापून होते संपप्ती घरी आणल्यामुळे नाही. सुंदर लेख आहे साहेब.. एक सांगा त्या पैश्यावर भारतीयांचा अधिकार आहे... ते पैसे काही विकत घेता आपल्या योजना मध्ये लागू शकतात .. आपण बराच खर्च संरक्षण वर करतो.. तो पैसा तिकडे वापरला जाऊ शकतो. आपल्या वर बरेच कर्ज आहे ते फेडू शकतो ... आणि उरलेच काही तर आपण गरीब राष्ट्रांना लोन देवू शकतो... आणि हे नाहीच जमले तर कमीत कमी भविष्यात असे पैसे बाहेर जाण्यापासून थांबवू तरी नक्कीच शकतो... पु) जो पैसा बँका मध्ये आहे रुपयात किंवा इतर चलनात तो तर "बुक्स " मध्ये असल्यामुळे त्याचा मग काढणे त्यामानाने सुलभ आहे . बाकी उद्योग , स्थावर मालमत्ता , शेअर बाजारातील गुंतवणी त्यामानाने अवघड आहेत. पण समजा आज भारतातील शेअर बाजारातील गुंतवणूकदरांनी शेअर बाजार / इतर ठिकाणाचा पैसा काढायचा ठरवला तर जास्तीत जास्त भारतातील बाजार कोसळतील आणि भारतातील कर भरून हा पैसा परत जाऊ शकेल.त्याच मार्गाने भारतीयांनी केलेली गुंतवणूक काढता येऊ शकेल . पण एवढी इच्चाशक्ती कोण दाखवणार आणि कारण सगळेच त्यात अडकले आहेत . सर्व सामान्यात रूढ समजांच्या विरुद्ध वर्तन /लिखाण जेंव्हा होते ते एक तर अगदी क्रांतिकारी असते किंवा अगदी चुकीचे असते. सदर लेख दुसऱ्या प्रकारात मोडतो असे वाटते. पहिल्यांदा कोणी असे म्हणत नाही कि स्वित्झर्लंड वर हल्ला करा. या आधी पण अनेक देशांनी दशहतवाद/ भ्रष्टाचार्यांची संपत्ती गोठवली/ताब्यात घेतली आहे. मुबारक / गडाफी त्याचे ताजे उदाहरण आहेत. त्यामुळे असे करणे अगदीच अशक्य नाही. काळा पैसा ज्या मार्गाने कमावला जातो तसेच ज्या मार्गाने देशाचे कायदे मोडून तो फिरवला जातो त्यामुळे तो काळा होतो (क्र) रणजीत said: सर्व सामान्यात रूढ समजांच्या विरुद्ध वर्तन /लिखाण जेंव्हा होते ते एक तर अगदी क्रांतिकारी असते किंवा अगदी चुकीचे असते. सदर लेख दुसऱ्या प्रकारात मोडतो असे वाटते. पहिल्यांदा कोणी असे म्हणत नाही कि स्वित्झर्लंड वर हल्ला करा. या आधी पण अनेक देशांनी दशहतवाद/ भ्रष्टाचार्यांची संपत्ती गोठवली/ताब्यात घेतली आहे. मुबारक / गडाफी त्याचे ताजे उदाहरण आहेत. त्यामुळे असे करणे अगदीच अशक्य नाही. काळा पैसा ज्या मार्गाने कमावला जातो तसेच ज्या मार्गाने देशाचे कायदे मोडून तो फिरवला जातो त्यामुळे तो काळा होतो (क्र) ज्यांचा का ला पेईसा परदेशात आहे, त्यांना त्या पेअसाने भारतात घरे बांधायला सांगा !रास्त दारात विकायला लावा सरकारने त्यांना कर माफ करावा कोणालाच तोटा होणार नाही याची काळजी घ्यावी जनतेला पैसा नको आहे. ज्यांनी काळाबाजार केला, भ्रष्टाचार केल आणि माया जमवली त्यांना जबरदस्त शिक्षा व्हायला पाहिजे हे जनतेला अभिप्रेत आहे.  
 
 
On 03/06/2011 02:05 AM jay said:
On 03/06/2011 02:23 AM dilip ambavanekar said:
On 03/06/2011 03:18 AM
On 03/06/2011 03:31 AM Ranjit said:
(
On 03/06/2011 03:19 AM ranjit said:
On 03/06/2011 04:51 AM Mahesh said:
On 03/06/2011 07:16 AM Jignesh said:
On 03/06/2011 07:16 AM Jignesh said:
On 03/06/2011 08:46 AM nil said:
Jignesh
On 03/06/2011 08:46 AM nil said:
Jignesh
On 03/06/2011 07:42 AM Rahul said:
On 03/06/2011 09:23 AM Santosh C said:
On 03/06/2011 09:23 AM Santosh C said:
On 03/06/2011 09:38 AM abhay surve said:
On 03/06/2011 09:39 AM abhay surve said:
On 03/06/2011 10:16 AM sagar mutha said:
On 03/06/2011 10:47 AM Nanan said:
On 03/06/2011 11:06 AM sagar said:

No comments:

Post a Comment