काश्मीर: तीन दहशतवादी ठार Friday, June 03, 2011 AT 08:31 AM (IST) श्रीनगर
काश्मिरातश्रीनगर - धुमसत्या काश्मिरात दहशतवाद्यांशी सामना करताना गेल्या वर्षभरात लष्कराच्या काही अधिकाऱ्यांसह 67 जवान हुतात्मा झाले असून लष्कराशी उडालेल्या धुमश्चक्रीत 217 दहशतवादी ठार झाल्याची माहिती जम्मू आणि काश्मीर सरकारच्या गृहमंत्रालयाने आज दिली.
सरकारतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेली ही आकडेवारी राज्यातील सीमेवर दहशतवाद्यांशी उडालेल्या धुमश्चक्रीच्या घटनांची असून नियंत्रण रेषेवर उडालेल्या चकमकींचाही त्यामध्ये समावेश आहे.
हिंसाचारात होरपळणाऱ्या काश्मीर खोऱ्यातील नागरिकांना आतापर्यंत मोठी किंमतही मोजावी लागली आहे. राज्यातील हिंसाचाराची माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले, की पाकव्याप्त काश्मिरात पाचशेहून अधिक दहशतवाद्यांना अत्याधुनिक हत्यारे चालविण्याचे आणि स्फोटके तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे सर्व दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र भारतीय जवान डोळ्यांत तेल घालून देशाच्या सीमेचे रक्षण करीत असल्याने दहशतवाद्यांना घुसखोरी करणे शक्य होत नाही.
राज्यात शंभराहून अधिक दहशतवादी नव्याने सक्रिय झाले असून काही जणांनी घुसखोरी केली आहे. गतवर्षीपेक्षा चालू वर्षी दहशतवादी कारवायांमध्ये किंचित घट झाली आहे. गेल्या वर्षी 458, तर चालू वर्षी 450 हिंसाचाराच्या घटना घडल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच चोरीच्या वाहनांचा वापर स्फोट घडवून आणण्यासाठी होत आहे. हजारो गाड्यांची कागदपत्रेच नसून दुचाकी वाहनांची संख्या यामध्ये मोठी आहे. दरम्यान, गेल्या दोन दशकांत वीस हजार दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने अटक केली आहे. चालू वर्षी 613 जणांची त्यामध्ये भर पडली - लष्करे तैय्यबाच्या तीन संशयित अतिरेक्यांना संरक्षण दलाच्या जवानांनी बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर शहरामध्ये आज (शुक्रवारी) ठार केले.
पहाटे झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले असून आता कारवाई संपली आहे, असे सैन्यदलाचे प्रवक्ता लेफ्टनंट कर्नल जे. एस ब्रार यांनी सांगितले. अधिक तपशील मिळायचा असल्याचेही त्यांनी सांगितले.
काल संध्याकाळी ही चकमक सुरू झाली होती; ५२ राष्ट्रीय रायफल्स व पोलिसांनी संयुक्तरित्या सोपोरमधील सीर भागात कारवाई सुरू केली. एका बांधकाम सुरू असलेल्या घरामध्ये दहशतवादी लपून बसले होते 20 हजार दहशतवादी गजाआड
India Fatalities, 2011
Civilians | Security Force Personnel | Terrorists | Total | |
Arunachal Pradesh | 0 | 0 | 35 | 35 |
Assam | 5 | 14 | 19 | 38 |
Jammu & Kashmir | 19 | 12 | 30 | 61 |
Manipur | 8 | 10 | 12 | 30 |
Meghalaya | 5 | 0 | 1 | 6 |
Mizoram | 0 | 0 | 0 | 0 |
Nagaland | 1 | 0 | 2 | 3 |
Punjab | 0 | 0 | 0 | 0 |
Tripura | 1 | 0 | 0 | 1 |
Left-wing Extremism | 110 | 57 | 132 | 299 |
Total* | 149 | 93 | 231 | 473 |
श्रीनगर - धुमसत्या काश्मिरात दहशतवाद्यांशी सामना करताना गेल्या वर्षभरात लष्कराच्या काही अधिकाऱ्यांसह 67 जवान हुतात्मा झाले असून लष्कराशी उडालेल्या धुमश्चक्रीत 217 दहशतवादी ठार झाल्याची माहिती जम्मू आणि काश्मीर सरकारच्या गृहमंत्रालयाने आज दिली.
सरकारतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेली ही आकडेवारी राज्यातील सीमेवर दहशतवाद्यांशी उडालेल्या धुमश्चक्रीच्या घटनांची असून नियंत्रण रेषेवर उडालेल्या चकमकींचाही त्यामध्ये समावेश आहे.
हिंसाचारात होरपळणाऱ्या काश्मीर खोऱ्यातील नागरिकांना आतापर्यंत मोठी किंमतही मोजावी लागली आहे. राज्यातील हिंसाचाराची माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले, की पाकव्याप्त काश्मिरात पाचशेहून अधिक दहशतवाद्यांना अत्याधुनिक हत्यारे चालविण्याचे आणि स्फोटके तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे सर्व दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र भारतीय जवान डोळ्यांत तेल घालून देशाच्या सीमेचे रक्षण करीत असल्याने दहशतवाद्यांना घुसखोरी करणे शक्य होत नाही.
राज्यात शंभराहून अधिक दहशतवादी नव्याने सक्रिय झाले असून काही जणांनी घुसखोरी केली आहे. गतवर्षीपेक्षा चालू वर्षी दहशतवादी कारवायांमध्ये किंचित घट झाली आहे. गेल्या वर्षी 458, तर चालू वर्षी 450 हिंसाचाराच्या घटना घडल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच चोरीच्या वाहनांचा वापर स्फोट घडवून आणण्यासाठी होत आहे. हजारो गाड्यांची कागदपत्रेच नसून दुचाकी वाहनांची संख्या यामध्ये मोठी आहे. दरम्यान, गेल्या दोन दशकांत वीस हजार दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने अटक केली आहे. चालू वर्षी 613 जणांची त्यामध्ये भर पडली
No comments:
Post a Comment