Total Pageviews

Monday, 20 June 2011

SATYA SAI BABA १२ कोटी रुपये, ९८ किलो सोने आणि ३०० किलो चांदी & POLICE

अन्वयार्थ : संपत्ती संचय हेचसत्य’
 
सामान्य माणूस अध्यात्माचा संबंध अकारण सर्वसंगपरित्यागाशी जोडतो. गृहस्थाश्रमात राहूनही संन्यासी धर्माचे पालन करण्याची सोय आपल्याकडे आहे. त्याचप्रमाणे सर्व सुखांच्या सागरात खोलवर बुडी मारूनही त्यागाचे गुणगान करता येते. मोहापासून दूर राहण्याची भाषा करता येते आणि हे सगळे करून पुन्हा आपण या भूतलावर अवतार घेतला असल्याची भाषाही वापरता येते. आपला देश त्यामुळेच तर महान आहे. सत्य साईबाबांचा खासगी कक्ष त्यांच्या मृत्यूनंतर जवळपास दीड महिन्याने उघडण्यात आला. त्यांच्या या कक्षात उदी, भगव्या वस्त्रांचे संच, खडावा, रुद्राक्षाच्या अथवा तुळशीच्या माळा आणि विशेष भक्तांसाठी बाहीच्या आत दडवण्याकरिता दहा-पाच अंगठय़ा असा काही तरी ऐवज मिळेल अशी अपेक्षा होती. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे धनवान भक्त हमसाहमशी रडले होते. या सामान्य धनवंतांची आणि त्यांचे श्रद्धास्थान असलेल्या बाबांची जातकुळी एकच असेल असे समजण्याचा मूर्खपणा किमान शहाणीसुरती माणसे तरी करणार नाहीत. परंतु सत्य काही वेगळेच असते, सत्य हे नेहमी कल्पिताच्या पलीकडे असते, हे सत्य साईंनी आपल्या मृत्यूनंतरही दाखवून दिले. त्यांच्या खासगी कक्षातून १२ कोटी रुपये, ९८ किलो सोने आणि ३०० किलो चांदी असा डोळे फिरविणारा किंवा डोळे दिपविणारा असा खजिना सापडला.  त्यावरून अध्यात्म किती महागडे आहे याची आपल्याला कल्पना येईल. बाबांचे फाईव्ह स्टार हॉस्पिटल होते, त्यांच्या आश्रमाशी संबंधित आणखीही बरेच व्यवसाय होते. खरेतर हातात किंवा तुमच्या व्यक्तित्वात जर अद्भुत शक्ती असेल तर मग इस्पितळ, औषधोपचार, प्रशिक्षित डॉक्टरांचे पथक हा सगळा लवाजमा कशासाठी हवा? एवढे सगळे दिमतीला असल्यावर कोणीही चार गरिबांवर मोफत उपचार करण्याचे पुण्य पदरात पाडून घेण्यास हसतखेळत तयार होईल. हे सगळे झाले आपले अंदाज आणि आडाखे. आता सत्य साईबाबांच्या खासगी कक्षातून हा नश्वर द्रव्यसाठा सापडल्यावर तरी अंधश्रद्धांचे डोळे उघडणार आहेत का? या पैशाच्या आणि सोन्या-चांदीच्या साठय़ाबाबत आता अर्थातच त्यांच्या आश्रमाकडूनपटतील असे’ खुलासे येतील
. परंतु सत्य हे आहे की, त्यांच्या पश्चात त्यांच्या संपत्तीचा धनी कोण, यावरून सध्या शीतयुद्ध रंगले असून त्यामुळेच त्यांचा कक्ष चारचौघांसमक्ष उघडावा लागला. अन्यथा तो केव्हा उघडला आणि त्यात काय काय दडलेले होते हे जगाला कधीच कळले नसते. सध्या भारतात कायद्यापेक्षा उपोषण आणि आंदोलनांना अधिक वजन प्राप्त झालेले आहे. घरात बसून, फेसबुकवर जाऊन क्लिक करून आंदोलनांना पाठिंबा देणाऱ्या फुकटचंबूंच्या भ्रष्टाचारविषयक काळजीच्या नद्यांचे पाटच्या पाट वाहत आहेत. भ्रष्टाचाराच्या विरोधात मत व्यक्त केले की जगरहाटी पाळण्यास माणसे मोकळी होतात. या सर्व लोकांनी आता बाबा रामदेव यांच्याकडे हट्ट धरायला हवा. स्विस बॅंकेतला पैसा भारतात येईल तेव्हा येईल, सत्य साईंच्या कक्षात एवढा पैसा कुठून आला, त्यांच्याकडे आणखी किती पैसा आहे आणि तो कोणाकोणाचा आहे, याची आधी चौकशी झाली पाहिजे. परंतु ते असे करणार नाहीत. कारण सरकारविरुद्ध आंदोलन करणे हे जगातील सर्वात सोपे काम आहे. अशा आश्रमाच्या संपत्तीच्या वगैरे चौकश्या व्हायला लागल्या तर त्यांचा एक पदर कधीही रामदेवबाबांकडे येऊ शकतो. तेव्हा, संपत्ती संचय हेच एकमेव सत्य आहे आणि ते कोणाला चुकले

No comments:

Post a Comment