Total Pageviews

Monday, 20 June 2011

SATYA SAI BABA PROPERTY 40,000 CRORES?

 
सत्यसाईबाबांची मायाPrahaar सत्यसाईबाबा यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वैयक्तिक दालनात सोन्या-चांदीचा जो प्रचंड खजिना सापडला तो भल्याभल्यांचे डोळे दीपवणारा ठरला. 98 किलो सोने, 307 किलो चांदी आणि साडेअकरा कोटी रुपयांची रोकड असा हा ऐवज बघून त्यांच्या कट्टर अनुयायांनीसुद्धा तोंडात बोटे घातली असतील.सत्यसाईबाबा यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वैयक्तिक दालनात सोन्या-चांदीचा जो प्रचंड खजिना सापडला तो भल्याभल्यांचे डोळे दीपवणारा ठरला. 98 किलो सोने, 307 किलो चांदी आणि साडेअकरा कोटी रुपयांची रोकड असा हा ऐवज बघून त्यांच्या कट्टर अनुयायांनीसुद्धा तोंडात बोटे घातली असतील. रोख रकमेच्या चळती बघितल्यावर तर नोटा मोजणारी यंत्रे मागवावी लागली. ब्रह्म सत्यं, जगत् मिथ्या अशी शिकवणूक देणारे आपले संतमहंत स्वत: मात्र पैशाच्या राशीत लोळताना बघितल्यावर त्यांच्या उपदेशामृतांमधील ढोंग उघड होते. चमत्कारी संत असा लौकिक लाभलेल्या सत्यसाईबाबांभोवती सुरुवातीपासून संशयाचे वलय निर्माण झाले होते. ते अर्थातच अंधश्रद्धेवर आधारलेले होते, परंतु राजकारण्यांपासून उच्च वर्तुळातील धुरिणांचा त्यांच्याभोवतीचा वावर बघून सामान्यजन त्यांच्या कथित चमत्काराला भुलत आणि चमत्काराशिवाय देव नाही, ही भावना अधिकच बळकट होत असे. दोन महिन्यांपूर्वी सत्यसाईबाबांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या उत्तराधिका-याचा प्रश्न उपस्थित झाला होता.कारण 40 हजार कोटी रुपयांची मालमत्ता असलेल्या त्यांच्याट्रस्ट’चा कारभार कोणाच्या हाती जाणार, हा प्रश्न होता. अर्थात, तो प्रश्न अद्याप अनुत्तरीतच आहे. सत्यसाईबाबांनी मृत्युपत्र केले किंवा नाही यावर त्यांच्याच अनुयायांत मतभेद आहेत. सुदैवाने काही समाजहितैषी जाणत्या व्यक्ती त्यांच्या ट्रस्टवर सदस्य म्हणून असल्याने अद्याप तरी वारसाहक्कावरून भांडणे सुरू झालेली नाहीत. पण पुढे ती होणारच नाहीत, याची शाश्वती छातीठोकपणे कोणी देऊ शकणार नाही, कारण काही हितसंबंधीयांची वर्दळ सत्यसाई संस्थानच्या क्षेत्रात पूर्वीपासूनच दिसून आल्याचे सांगितले जाते. सत्यसाईबाबांच्या खोलीत सापडलेली संपत्ती बँकेत जमा करण्यात आल्यामुळे सध्या तरी ती चुकीच्या माणसांच्या हाती पडण्याचे भय संपले आहे, मात्र सत्यसाईबाबांनी एवढी संपत्ती जमवून कशाला ठेवली, त्यांना त्याचे काय करायचे होते हे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे ही संपत्ती त्यांनी निर्माण केलेल्या सामाजिक प्रकल्पांच्या उन्नतीसाठी खर्च करणे शहाणपणाचे ठरेल.एकीकडे फकिरावस्थेत शिर्डीत आलेल्या साईबाबांना त्यांचे भक्त सोन्या-चांदीने मढवत असतात. सोन्याचा कळस, सोन्याच्या शाली अर्पण करतात तर दुसरीकडे गंगा नदीच्या शुद्धीकरणासाठी निगमानंदासारखा साधू उपोषणासारख्या मार्गाने जिवाची बाजी लावतो तरी कोणी त्याची दखल घेत नाही ही विसंगती विचित्र आहे. साईबाबांची शिकवणूक आचरणात आणण्यापेक्षा सोन्यात त्यांची तुला करण्याचा भक्तांचा मोह अजब तर आहेच पण त्या शिकवणुकीतून काहीही शिकल्याचे सांगणारे आहे

No comments:

Post a Comment