MAHA TIMES ARTICLE
वरळी कोळीवाड्यातील एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने अवघे शहर हादरून गेले आहे. हे प्रकरण म्हणजवासनांध माणसांचे अमानुषीकरण कसे होते याचे किळसवाणे उदाहरण आहे. एका कनिष्ठ मध्यमवगीर्य घरातील १५ वर्षांच्या शाळकरी मुलीवर १८ ते २० वर्षांच्या पाच तरुणांनी आणि एका ४४ वर्षांच्या प्रौढाने वेगवेगळ्या वेळी बलात्कार केले. एका महिन्याच्या कालावधीत हे प्रकार वारंवार झाले. कोळीवाड्यातच राहणाऱ्या दोन मित्रांनी या मुलीला स्वैंपाकासाठी मदत करण्याच्या मिषाने घरी बोलवले व धाक दाखवून बलात्कार केला. या मुलांच्या अन्य दोन मित्रांनी बलात्काराच्या घटनेचा बभ्रा करण्याचा धाक दाखवून मुलीवर स्वतंत्रपणे बलात्कार केला. पाचव्या मुलाने जेव्हा हाच प्रकार मुलीशी केला, तेव्हा त्यात प्रौढ टॅक्सी ड्रायव्हरही सामील झाला. तो मुलगा व मुलगी टॅक्सीत बसून जात असताना मुलाचा इरादा ड्रायव्हरच्या ध्यानी आला आणि तोही जबरदस्तीने पापात वाटेकरी झाला. शेवटच्या घटनेने मुलीवर इतका परिणाम झाला की ती रात्री उशिरापर्यंत विमनस्कपणे घराबाहेर भटकत राहिली. ती सापडली तेव्हा काही बोलण्याच्याही मन:स्थितीत नव्हती. प्रकरणाची वाच्यता झाल्यावर पोलिसांनी सहा आरोपींपैकी पाचजणांना पकडले असून त्यांच्यावर गँग रेपचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यासाठी आरोपींना जास्तीत जास्त जन्मठेप वा किमान दहा वर्षांची सजा होऊ शकते. पण आरोपींना सजा झाल्याने मुलीला न्याय मिळाला असे होईल का? दुदैर्वाने उत्तर नकाराथीर् आहे. बलात्काऱ्याचा सामूहिक े धिक्कार आणि बळी पडलेल्या तरुणीचा निखळ स्वीकार, ही गोष्ट आजही समाजाला जमलेली नाही. योनिशुचितेची कल्पना समाजमनातून हद्दपार व्हायला तयार नाही आणि अन्य मुलींकडे आदराने पाहायला मुलग्यांना शिकवण्यास आजही अनेक कुटुंबे तयार नाहीत. अशावेळी बलात्कारासारखी एखादी घटना घडते तेव्हा मुलींवरचीच बंधने वाढतात. त्यांच्या सुरक्षेचे कारण देत पालक त्यांच्या पायांत बेड्या अडकवत त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतात. गुन्हेगारापेक्षा बळीलाच सजा देणारी ही वृत्ती मूळ गुन्ह्याइतकीच अघोरी आहे

No comments:
Post a Comment