Total Pageviews

Sunday, 5 June 2011

BLACK MONEY BABA RAMDEVA

http://www.tarunbharat.net/news.detail/news_id/209359



दिल्लीचे रामलीला मैदान शनिवारी रात्री दीडच्या सुमारास अचानक संघर्षाचा आखाडा बनले. दिवसभर सरकार आणि बाबा रामदेव यांच्यात खोट्या कुस्तीचा खेळ चालू होता.
रात्री दीडच्या सुमारास बाबांविरोधात शांतता भंगाचा गुन्हा दाखल झाला. दिल्ली पोलीसांनी मैदानावर १४४ कलम जारी केले. बाबांवर हद्दपारीचा आदेश बजावला. पोलीसांना हुलकावणी देत बाबांनी व्यासपीठावरून भक्तांच्या गदीर्त उडी मारली. त्यांना अटक होऊ नये, यासाठी महिला भक्तांनी कडे केले. मंडपातल्या अनुयायांनी पोलीसांवर दगडफेक केली, काही पोलीस जखमी झाले. अखेर पोलीसांनी अश्ाूधुराची नळकांडी फोडली. रामलीला जणू युद्धभूमी झाली. पोलीसांनी बाबांना सुरक्षित ठिकाणी हलवले आणि सकाळी डेहराडूनमागेर् हरिद्वारच्या आश्ामात नेऊन सोडले.

उज्जैनहून चार्टर्ड विमानाने बाबा दिल्लीला आले तेव्हाच बाबांचा ग्राफ एकदम उंचावला आणि सरकार खुजे वाटायला लागले. चचेर्च्या दोन फेऱ्या झाल्या.
भ्रष्टाचार हा गंभीर आजार आहे, हे मान्य केले तरी त्यावर मात करण्यासाठी दिल्लीत तीन महिन्यांपासून जन आंदोलनांचे जे तमाशे सुरू आहेत, त्याचे वर्णन रोगापेक्षा इलाज भयंकर, असेच करावे लागेल. अण्णा हजारे असोत की बाबा रामदेव, कायदा, अर्थशास्त्र अथवा राज्यशास्त्र या विषयांचे तज्ज्ञ नाहीत. सर्वाधिक कीव करावीशी वाटते ती मनमोहनसिंग सरकारची. नाचक्की झाल्यावर शनिवारी मध्यरात्री जी कारवाई झाली ती सरकारचे केविलवाणे रूप दर्शवणारी होती. परदेशातील काळी संपत्ती बाबांच्या उपोषणामुळे परत येणार नाही, सरकारलाच त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. व्यवस्थेत परिवर्तन घडवणे, कपालभारती अथवा प्राणायम करण्याइतके सोपे नाही, हे बाबांना कोण समजावून सांगणार? लोकांमधे भ्रष्टाचाराविषयी कमालीचा संताप आहे. त्याच्या विरोधात आवाज उठवणाऱ्याच्या पाठिशी लोक उभे रहातात.

No comments:

Post a Comment