Total Pageviews

Sunday, 5 June 2011

ADARSHA UPDATE

आदर्श'चा बाजारभाव ६०० कोटी?७५ कोटी रुपये खर्च -6 Jun 2011, 0803 hrs IST सुरेशचंद वैद्य
कुलाब्यातील वादग्रस्त 'आदर्श'च्या ३१ मजली इमारतीचे बांधकाम करण्यासाठी नेमका किती खर्च आला याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे. या इमारतीच्या बांधकामासह सर्व प्रकियेसाठी फ्लॅटधारकांनी सुमारे ७५ कोटी रुपये खर्च केले असल्याची माहिती चौकशी आयोगापुढे आलेल्या प्रतिज्ञापत्रातूनच उघड झाली आहे. मात्र या इमारतीच्या एकूण १०३ फ्लॅटची मार्केट किंमत ६०० कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. आदर्श सोसायटीचे सेक्रेटरी आर. सी. ठाकूर यांच्या प्रतिज्ञापत्रात इमारत बांधकाम अन्य खर्चाचा तपशील देण्यात आला आहे. सोसायटीत दोन प्रकारचे फ्लॅट असून एकूण १०३ सदस्यांना किमान ५७० चौ. फूट कमाल १०७६ चौ. फुटांचे फ्लॅट देण्यात आले आहेत. प्रॉपटीर् माकेर्टनुसार नरिमन पॉइंट कुलाबा भागातील जागेचे भाव प्रति चौ. फुटाला साधारण ७० हजार ते ७५ हजार रुपये असल्याचा अंदाज आहे. यावरून ५७० चौ. फुटाच्या फ्लॅटची माकेर्ट किंमत चार कोटी रुपये होईल, तर १०७६ चौ. फुटांच्या फ्लॅटची किंमत १० कोटी रुपयांपर्यंत जाते. यावरून संपूर्ण 'आदर्श'च्या इमारतीची किंमत किमान ५०० कोटी ते ६०० कोटी रुपयांपर्यंत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नियमानुसारच फ्लॅट
सोसायटी सदस्यांनी त्यांच्या आयुष्याची पुंजी या इमारतीसाठी गुंतविली असून सर्व सदस्यांनी नियमानुसारच फ्लॅट मिळविले असल्याचा दावा आर. सी. ठाकूर यांनी केला आहे. बॅकबे आगाराची जी जागा 'एफएसआय'साठी वापरली आहे. त्या जागेसाठी सोसायटीने कोटी १४ लाख रुपये मोजले असल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे. मात्र सोसायटीने केवळ 'एफएसआय' घेतला असून बॅकबे आगाराकडूनच जागेचा वापर होत आहे.
आजपासून पुन्हा सुनावणी
सोमवारपासून न्या. जे. एन. पाटील पी. सुब्रमण्यम यांच्या चौकशी आयोगापुढे पुन्हा सुनावणी सुरू होत आहे. निवृत्त मेजर एस. के. लांबा यांची साक्ष चालू असून ती पुढे सुरू राहणार आहे. याशिवाय संरक्षण खात्याच्या इस्टेट ऑफिसर गीता कश्यप यांचीही साक्ष अर्धवट राहिली आहे.
व्हॅल्युएशन
जमिनीची किंमत १६.१४ कोटी रु.
इमारत बांधकाम खर्च ४५ कोटी रु.
विकास खर्च १० कोटी रु.
बेस्टचा वीजजोडणी खर्च ७० लाख रु.
अन्य खर्चासह इमारतीच्या बांधकामासाठी एकूण ७४ कोटी ७० लाख रु. खर्च

No comments:

Post a Comment