Total Pageviews

Saturday 18 June 2011

ineffective policing in shirdi

पाप्याच्या गुंडगिरीच्याश्रध्दे’वर शिर्डी पोलिसांचीसबुरी’! अहमदनगर (19-June-2011) Tags : Ahmednagar,Editorialनगर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित आहे काय? पोलिस यंत्रणा घटनात्मक जबाबदारी पार पाडीत आहेत काय? पोलिस यंत्रणा गुन्हेगारीपुढे हतबल झाली आहे काय? असे डोक्याला झिणझिण्या आणणारे प्रश्न नगर जिल्ह्‌यातील जनतेला पडत असतील तर ते साहजिकच आहेत. मागील काही महिन्यांत जिल्ह्यातील गुन्हेगार पोलिस यंत्रणेवर वरचढ ठरू लागल्याच्या घटनांनी सामान्य माणूस भयभीत झाला आहे. आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त झालेल्या शिर्डीत रचित पाटणी प्रवीण गोंदकर या दोघा तरुणांची नियोजनबद्धरित्या कुख्यात गुंड पाप्या शेख याच्या टोळीने हत्या केली आणि ते पसार झाले. या घटनेला - दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर जंगजंग पछाडून पोलिसांना पाप्याच्या टोळीतील जण हाती लागले आहेत. मात्र, मुख्य सूत्रधार पाप्या शेख अजूनही पोलिसांना गवसलेला नाही. या दोघा तरुणांच्या हत्येच्या निषेधार्थ शिर्डीतील संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त केला आहे. दुसरीकडे कडक शिस्तीचे अशी नावलौकिक मिळविलेल्या जिल्हा पोलिसप्रमुख कृष्णप्रकाश प्रसाद यांचा दरारा कमी झाला आहे काय? कृष्णप्रकाश यांचे नव्याचे नऊ दिवसच होते काय? दरारा कमी झाल्यामुळेच हळूहळू अवैध धंदे गुंडांच्या टोळ्यांनी डोके वर काढून आपले हातपाय पसरविण्यास सुरुवात केली आहे. पोलिस दलाने वेळीच कठोर निर्णय घेतल्यास नजीकच्या काळात जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवणे कठीण होणार आहे. ‘श्रद्धा सबुरी’चा संदेश सातासमुद्रापार पोहोचलेल्या साईबाबांची शिर्डी नगरी अलीकडच्या काही महिन्यांपासून विविध गुन्ह्यांनी धुमसत आहे. खंडणीखोर, आश्रमशाळा लैंगिक अत्याचार प्रकरण आता थेट दोघा तरुणांच्या निर्घृण हत्येने शिर्डी पूर्णत: हादरली आहे. कुख्यात गुंड पाप्या शेख हा हत्येच्या घटनेमागचा मुख्य सूत्रधार असून, तो नेहमीप्रमाणे पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी झाला आहे. पोलिसांनी जणांना पकडून जेरबंद केले असले तरी गुंड पाप्या शेखचा शोध घेऊन त्याच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे अन्यथा मोकाट झालेला पाप्या आणखी किती जणांचा बळी घेणार? हे कुणीही ठामपणे सांगू शकणार नाही. या ना त्या गुन्ह्यांत नेहमी आत-बाहेर असलेल्या पाप्या शेखच्या नावावर विविध प्रकारचे १६ गुन्हे पोलिस दफ्तरी आहेत. हे सर्व गुन्हे गंभीर स्वरुपाचे असतानाही त्याच्या आत-बाहेरचा प्रवासाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे. गुंड पाप्या शेखला पोलिसांचा आशीर्वाद असल्याशिवाय हे शक्य नाही, यात आता कुणालाही तीळमात्र शंका उरलेली नाही. त्यामुळे या दोघा तरुणांच्या हत्येचा तपास योग्य दिशेने होऊन गुन्हेगारांना शिक्षा होईल का? असा प्रश्‍न शिर्डीकरांना पडला आहे. या हत्येचा तपास स्थानिक पोलिसांच्या हाती ठेवता विशेष पोलिस अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. तसे झाले तरच तपास योग्य पद्धतीने होईल असा विश्‍वास शिर्डीच्या नागरिकांना आहे. शिर्डीतील रचित पाटणी प्रवीण गोंदकर या दोघा तरुणांची बेदम मारहाण करीत हत्या करण्यात आली. या गुंडांच्या टोळीने एवढ्यावरच थांबता शहरात दहशत पसरण्यासाठी दोघांचे मृतदेह विवस्त्र करून भरचौकात टाकले ह्या प्रकाराला काय म्हणायचे? गुंड पाप्या शेखला आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त असलेल्या साईबाबांच्या शिर्डीत आपली दहशत कायम ठेवायची आहे. त्याला या नगरीत आपला दबदबा कायम ठेवायचा आहे. त्यासाठी पाप्याची काहीही करण्याची तयारी आहे. त्यामुळे शिर्डीत पाप्या शेख त्याची टोळी वेळोवेळी धुडगूस घालण्यात धन्यता मानते. मागील वर्षी पॅरोलवर सुटून आल्यानंतर पाप्याने लगेचच शिर्डीत भरचौकात हवेत गोळीबार करीत व्यावसायिकांवर दहशत निर्माण केली होती. शिर्डी शहरातील कायदा-सुव्यवस्था वेशीवर टांगली की आपले दरवाजेमोकळे’ होतात असा पाप्याचा समज झाला आहे. कुख्यात पाप्याची गुंडगिरी केवळ शिर्डीपुरती मर्यादित नाही. त्याचे गुन्हेगारीचे कनेक्शन थेट पुणे, नाशिक तसेच मुंबईशी जोडले गेलेले आहे. पाप्याची मोठी आंतरराज्य टोळी असल्याचा पोलिसांना संशय आहे. या टोळीकडून कोणकोणते अवैध धंदे केले जातात याची तंतोतत खबरबात पोलिसांना निश्‍चित ठाऊक आहे. त्याला कारणेही तशीच आहेत. पोलिस आणि गुन्हेगार यांच्यातीलसंबंध’ सर्वश्रृत आहेत. त्यामुळेेच विविध गुन्ह्यांत पोलिसांकडून न्यायालयात सादर करावयाच्या दोषारोपपत्रात काहीना काही त्रुटी राहून जातात वा मुद्दामहून ठेवल्या जातात. त्याचाच फायदा आरोपींना होतो. यातून आरोपींची एकतर जामिनावर सुटका होते, अन्यथा निर्दोष मुक्तता होण्यास संधी मिळते. पाप्या शेखच्या टोळीकडून गावठी कट्ट्यांची खरेदी-विक्री, खंडणी मागणे, ‘सुपारी’ घेणे, धमकावून जागा खाली करणे, हॉटेल व्यावसायिकांकडून हप्ते गोळा करणे आदीउद्योग’ सुरू आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून हेउद्योग’ बिनदिक्कतपणे चालविले जात आहेत. पाप्या आत असेल तर त्याचे सहकारी इमानइतबारे सर्वकाही आलबेल ठेवतात. शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे काम करणार्‍या पोलिसांकडून अद्यापही ठोस अशी कोणतीही कारवाई झालेली नसल्याने या गुंड टोळ्यांचे फावते आहे. या टोळीच्या हालचालींकडे पोलिसांनी पूर्ण डोळेझाक केल्यानेच शिर्डीतील कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाले आहेत. पाप्या शेख त्याच्या टोळीला स्थानिक पोलिसांचे आशीर्वाद असल्यामुळेच त्याला मोकळे रान मिळत आहे. त्यामुळेच पोलिस निरीक्षक नवलनाथ तांबे यांच्या निलंबनाची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. कुख्यात गुंड पाप्या शेख याच्याविरुद्ध हद्दपारीच्या नोटिसा अनेकदा निघाल्या; पण त्याची अंमलबजावणीची कधीच झाली नाही. शेखवर २००८ मध्ये तडीपारीच्या कारवाईची नोटीस निघाली. मात्र, पोलिसांच्या दुर्लक्षामुळे पुढे काहीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटते. दोन महिन्यांपूर्वी पाप्या शेख त्याच्या टोळीला तडीपार करण्याचा प्रस्ताव शिर्डी पोलिसांनी पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे पाठविला होता. या प्रस्तावात देखील अनेक त्रुटी निघाल्या. त्यामुळे तडीपारीची कारवाई बारगळली गेली. पोलिसांनी प्रस्ताव व्यवस्थितरित्या पाठविला असता तर या टोळीचा बंदोबस्त झाला असता. पण पोलिसांकडून कधीच निर्णायक अशी कामगिरी झाली नाही. मध्यंतरी पाप्याला वर्षभरासाठी स्थानबद्ध करण्यात आले होते. त्यातून तो सुटला. त्यानंतर मोक्कान्वये कारवाईसाठी गृह मंत्रालयात प्रस्ताव पाठविला होता. मात्र, हा प्रस्तावही फेटाळला गेल्याची माहिती आहे. या सर्व प्रस्तावांची चौकशी केल्यास अनेक प्रशासकीय अधिकार्‍यांचे पाप्या शेखशी असलेले संबंध उघडकीस येऊ शकतील
-

No comments:

Post a Comment