कोरची तालुक्यात सुरू असलेले बांधकाम बंद करण्याबाबत सूचना देऊनही काम बंद न केल्याने माओवाद्यांनी सोनपूर-पिटेसूर या मार्गावर कंत्राटदाराची चार वाहने मंगळवारी (दि. 31 मे) जाळली. चारही वाहनांची राखरांगोळी झाल्याने या घटनेमध्ये सदर कंत्राटदारास लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कोरची तालुक्यातील कोटगुल पोलीस मदत केंद्राअंतर्गत येणार्या सोनपूर -पिटेसूर हा रस्त्याचे बांधकाम मागील काही दिवसांपासून प्रशांत कंस्ट्रक्शन कंपनी करीत आहे. माओवाद्यांनी या कंपनीच्या मालकास सदर काम त्वरित बंद करण्याची सूचना केली होती. परंतु कंत्राटदाराने त्याकडे दुर्लक्ष करीत काम सुरुच ठेवले. माओवाद्यांच्या धमक्यांना भीक न घालण्याचा निर्णय कंत्राटदाराने घेतला. त्याची किमत त्याला चुकवावी लागली. काल 31 मे रोजी सायंकाळी 5 वाजताच्यासुमारास नक्षलवाद्यांनी बांधकामस्थळावर येऊन या वाहनास आग लावली. यावेळी नक्षलवाद्यांनी जाळलेल्या वाहनांमध्ये हॉट मिक्सर, टिप्पर, मॅजिक ऑटो व रोड रोलरचा समावेश आहे. नक्षलवादी घटनास्थळावर आले तेव्हा या कंपनीचा एक कर्मचारी घटनास्थळी हजर होता. त्याला तेथून निघुण जाण्यास सांगितल्यानंतर नक्षलवाद्यांनी या वाहनांना आग लावल्याची माहिती आहे. या घटनेमुळे सोनपूर -पिटेसूर या रस्त्याचे एक किमीचे बांधकाम अपूर्ण राहण्याची शक्यता आहे. नक्षलवाद्यांनी रस्ता बांधकामावरील वाहने जाळल्याने कंत्राटदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे
No comments:
Post a Comment