Total Pageviews

Sunday 19 June 2011

GOOD DIET INDIANS

भारतीयांसाठी राष्ट्रीय पोषण संस्थेचे सल्ले’
हैदराबाद येथे राष्ट्रीय पोषण संस्थानया केंद्रीय संस्थेतर्फे व्यापक स्तरावर पोषण आहारासंबंधी संशोधन केले जाते. जागतिक स्तरावर सध्या काय चाललेले आहे, यासंदर्भात तेथे कोणता अभ्यास केला गेला आहे, सुरू आहे याचा तर अभ्यास या संस्थेत केला जातोच; पण भारतीय हवामान आणि बदलत्या जीवनशैलीच्या अनुषंगाने भारतीयांसाठी नेमका कोणता आहार आवश्यक आहे याविषयीही सूक्ष्म पातळीवर येथे संशोधन केले जाते. या अभ्यासाचे निष्कर्ष आणि अहवालही वेळोवेळी प्रसिद्ध केले जातात.
आपला आहार, त्यातील पोषणमुल्ये, स्वयंपाकाच्या सवयी, स्वयंपाकात तेलाचे, मीठाचे प्रमाण किती असावे इथपासून तर व्यायाम का करावा, तो कोणी, किती, कसा करावा, कोणत्या वयोगटासाठी कोणता आहार असावा, त्यातील आवश्यक, अनावश्यक घटक कोणते, आहाराच्या चुकीच्या सवयींमुळेही कुपोषण कसे होऊ शकते, कोणत्या आजारासाठी कोणता आहार असावा, कोणता टाळावा इथर्पयत सर्वागीण अभ्यास येथे केला जातो. त्यासाठी देशभरातून तज्ञांच्या सूचना, त्यांनी केलेला अभ्यासदेखील पडताळून पाहिला जातो. आतार्पयतच्या संशोधनाची यथार्थताही तपासून पाहिली जाते आणि आवश्यकता भासल्यास नव्या सूचना, बदलांसह संशोधनाचा हा अहवाल प्रसिद्ध केला जातो. भारतीयांच्या नजरेतून केलेला हा अभ्यास नुकताच प्रसिद्ध झाला आहे. त्यातीलच हे काही निष्कर्ष.
खालील लिंकवर हा संपूर्ण अहवाल पाहता येईल.

http://www.ninindia.org/DietaryguidelinesforIndians-Finaldraft.pdf

No comments:

Post a Comment