Total Pageviews

Sunday 19 June 2011

VASHIM POLICE INSPECTOR SETTLESSUICIDE CASE FOR 4 LAKHS

पोलिसांनीच लावली सुसाईड नोटची वाट 19-06-2011 : 12:59:42) नागेश घोपे) LOKMAT
वाशिम - महिनाभरापूर्वी आत्महत्या केलेल्या दगडउमरा येथील नितीन राऊत नामक युवकाच्या खिशातील सुसाईड नोटची चक्क पोलिसांनीच वाट लावली असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. तत्कालीन ठाणे’दारांनी तब्बल चार लाख खिशात’ घालून प्रकरण मॅनेज केले, तर अंगलट येऊ नये म्हणून वरिष्ठांचे पाय पकडून स्वत:ची वाशिमवरून बदली करून घेतली. एवढेच नव्हेतर बदलीची ऑर्डर’ हातात मिळताच अरुणोदय’ होण्यापूर्वीच या महाशयाने बदलीचे ठाणे गाठले.
दगडउमरा येथील नितीन बलवंत राऊत हा युवक गावातीलच एका डॉक्टरच्या शेतात कामाला होता. डॉक्टरांचे वाशिमला वास्तव्य असल्यामुळे गावातील त्यांच्या सर्व व्यवहारांचा हाच कारभारी होता. परिवारातीलच युवक असल्यामुळे डॉक्टरांचाही त्याच्यावर पूर्ण विश्वास बसला होता. नितीनने गावातीलच चार युवकांकडून काही पैसे उधार घेतले होते. मात्र, त्याची परतफेड करण्यास विलंब होत असल्यामुळे सदर युवकांनी त्याच्याभोवती वसुलीचा तगादा वाढविला होता. नितीन पैसे परत करण्यास असर्मथ ठरत असल्यामुळे त्यांनी हा कामावर असलेल्या डॉक्टरांच्या शेतातील मोटारपंप काढून नेला. त्यामुळे नितीनचे धाबे दणाणले होते. डॉक्टरांचा आपल्यावर कमालीचा विश्वास आहे; परंतु आपल्यामुळे त्यांचे नुकसान झाल्यास आपण डॉक्टरांना काय तोंड दाखवावे? या चिंतेने त्याला ग्रासले होते. त्याने चौघांकडेही दयायाचना करून मोटार परत करण्याची विनवणी केली. मात्र, फायदा झाला नाही. आत्महत्येचा इशाराही दिला. तरीही चौघांपैकी एकाचेही दगडाचे हृदय पाझरले नाही. अखेर 14 मे रोजी नितीनने आत्महत्या केली. तथापि, आत्महत्या करण्यापूर्वी नितीनने पैशांसाठी मोटार नेणार्‍या चौघांच्याही नावाची सुसाईड नोटलिहून खिशात ठेवली होती. घटनास्थळी गेलेल्या पोलिसांना पंचनामा करताना ही नोट’ दिसली. त्यांनी ती ताब्यात घेऊन तत्कालीन ठाणेदारांकडे सोपविली. ठाणेदाराने या प्रकरणाला अर्थ’ आणण्याचे आव्हा’नात्मक सूत्र हलविले. ‘सुसाईड नोटमध्ये नावे असलेल्या चौघांनाही बोलावून वाटाघाटी सुरू केल्या. ‘ठाणे’दाराने तब्बल सात लाखांची ऑफर’ केली. चर्चेच्या गुर्‍हाळानंतर चार लाखात प्रकरण मॅनेज झाले. त्यानंतर पोलिसांनी सुसाईड नोटची वाट लावून याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आणि प्रकरण लालफितीत गुंडाळून ठेवले. सदर प्रकरणाची कुणकुण पोलीस दलातील वरिष्ठांना लागली. त्यामुळे प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून ठाणे’दारानेअरुणोदय’ होण्यापूर्वीच वरिष्ठांचे पाय पकडून स्वत:ची बदली करून घेतली

No comments:

Post a Comment