Total Pageviews

Thursday, 21 April 2011

INDIA AGAINST CORRUPTION & BAD GOVERNANCE STORY 77 भ्रष्टाचाराची साफसफाई करण्यासाठी देशात प्रत्येकानेच लोकपाल होऊन काम केले पाहिजे.

 
INDIA AGAINST CORRUPTION & BAD GOVERNANCE STORY 77
WILL PUBLISH ARTICLES REGULARLY ON CORRUPTION / BAD GOVERNANCE IN INDIA . PASS ON TO AS MAY HONEST INDIANS AS POSSIBLE
http://brighemantmahajan.blogspot.com/भ्रष्टाचाराची साफसफाई करण्यासाठी देशात प्रत्येकानेच लोकपाल होऊन काम केले पाहिजे.
-जी स्पेक्ट्रम घोटाळा उघड झाल्यापासून अनेक धनाढ्य उद्योगपतीही नागडे झाले आहेत तुरुंगात चक्की पिसायला पोहोचले आहेत. त्या चक्कीवाल्यांच्या यादीत आता विनोद गोएंका यांच्यासह संजय चंद्रा, गौतम दोशी वगैरेंची भर पडली आहे. जगातील श्रीमंतांच्याफोर्ब्स’ यादीत या महाशयांची नावे आहेत. देशातील शक्तिमान राजकारण्यांशी त्यांचे अगदी घरगुती संबंध आहेत. पैशांच्या जोरावर राजकारणी सत्ताधार्‍यांनाही त्याने अंकित करून ठेवले. अनेक राजकारण्यांसाठी विनोद गोएंकांचे डी. बी. रिऍलिटी म्हणजे एटीएम मशीन होते, पण फासे पलटले हे महाशय आता दिल्लीच्या तुरुंगात गेले. त्यांची अमाप संपत्ती, गाडीघोडे, विमाने, सत्तामत्ता याचा काडीमात्र उपयोग झाला नाही. अलीकडे विनोद गोएंकांची रोज नवी भानगड बाहेर पडत होती. भानगडी केल्या की त्या बाहेर पडणारच. पैशांची अति हाव संपत्तीच्या नको तितक्या पाठलागाचा परिणाम काय असतो त्याचे विनोद गोएंका हे सध्याच्या काळातले उदाहरण. उद्योगपती आणि राजकारणी यांच्यातील भ्रष्ट संबंध हा तसा आपल्याकडे नवीन विषय नाही. अधूनमधून त्यावर प्रकाश पडतच असतो. स्पेक्ट्रम घोटाळ्याने मात्र हे साटेलोटे चांगलेच चव्हाट्यावर आणले. मुळात उद्योगपती आणि राजकारणी यांच्यातील संबंध प्रेमाचे किंवा धर्मादाय कधीच नसतात. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या वेळची गोष्टच वेगळी होती. तेव्हाचे उद्योगपतीही स्वातंत्र्याच्या प्रेरणेने भारावलेले होते. आता सगळेच चित्र बदलले. उद्योगपती आणि राजकीय मंडळीदेखील पूर्वीसारखी कुठे राहिली? उद्योगपती हे राजकारण्यांचे एटीएम मशीन असतात तर राजकीय लागेबांधे म्हणजे उद्योगपती किंवा धनिकांच्या बेकायदा, भ्रष्ट व्यवहारांसाठी संरक्षक कवच असते. ‘एकमेका साह्य करू; दोघेच धरू सुपंथ’ अशा पद्धतीने गेल्या तीन-चार दशकांत राजकारणी-उद्योगपती संबंध फळले-फुलले आहेत. अर्थात या भ्रष्ट संबंधांसाठी राजकारणीच सर्वाधिक जबाबदार आहेत हेदेखील खरे. पैशासाठी
सत्ता आणि सत्तेतून पुन्हा पैसा हे राजकारण्यांचे एकमेव सूत्र बनले आहे. त्यातूनच भ्रष्ट राजकारणी, उद्योगपती, बिल्डर, कंत्राटदार, गुन्हेगार, नोकरशहा अशी भ्रष्टाचाराची एक साखळी बनली आहे. आदर्श, राष्ट्रकुल आणि स्पेक्ट्रमसारखे महाघोटाळे त्यामुळेच घडले. त्यातील काही बडे मासे आता गजाआड आहेत. -जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात . राजा हे मंत्रीमहोदय आधीच तुरुंगात गेले. अनेक बडे अधिकारी तेथेच विश्रांती घेत आहेत. शाहीद बलवा हा पैशाने उन्मत्त झालेला बिल्डरही सध्या तिहार तुरुंगातच आहे. शाहीद बलवा हा गोएंकांचा भागीदार. आता बलवाच्या सोबतीला गोएंकाही गेले. अनिल धीरूभाई अंबानी कंपनीचे दोन बडे अधिकारीही याच प्रकरणात तिहारमध्ये पोहोचले आहेत. करुणानिधी यांची कन्या कनिमोझी हिलाही बहुधा तिहारची हवा खावी लागेल असे चित्र आहे. गरीबांना फसवून, सरकारला गंडवून ज्यांनी मजा मारली त्यांना ही सजा आहे. भ्रष्टाचारी मंडळाची संपूर्ण टोळीच अशा प्रकारे तुरुंगात गेली. हिंदुस्थानच्या इतिहासातील ही सनसनाटी घटना आहे. हे सर्व डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या न्यायालयीन लढाईतून घडले. आपला कायदा न्यायालये यांनी मनात आणले तर काय घडू शकते ते या सर्व प्रकरणांत दिसले. सत्ता पैसा यांची ऊब असली की आपले कोण काय वाकडे करणार या भ्रमात सगळे होते. स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणात हनुमानाची भूमिका डॉ. स्वामी यांनी वठवली. सध्या वातावरण असे आहे की, कोणीही वाचणार नाही. उलट भ्रष्टाचार्‍यांना वाचवणारेच फासावर लटकतील. सीबीआय ही कधी नव्हे ती वेगवान पद्धतीने काम करीत आहे कोणाकोणाला आत घालायचे कोणाला अभय द्यायचे याची यादी तयार केल्याप्रमाणे कारवाया सुरू आहेत. प्रश्‍न इतकाच आहे की, . राजापासून विनोद गोएंकांपर्यंत सगळेच तुरुंगात गेले, पण तरीही कुणाला तरी वाचविले जात आहेच. सीबीआयने हे वाचविण्याचे उद्योग केलेच तर हे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन नसूनकॉंग्रेस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ असल्याच्या आरोपास पुष्टी मिळेल. भ्रष्टाचाराची साफसफाई करण्यासाठी फक्त लोकपाल बिलाचीच आवश्यकता आहे असे नाही. तर या देशात प्रत्येकानेच लोकपाल होऊन काम केले पाहिजे. या देशातील कायदा सक्षम आहे. मनात आणले तर हाच कायदा कोणाचीही तमा बाळगत नाही

No comments:

Post a Comment