INDIA AGAINST CORRUPTION & BAD GOVERNANCE STORY 50
WILL PUBLISH ARTICLES REGULARLY ON CORRUPTION / BAD GOVERNANCE IN INDIA . PASS ON TO AS MAY HONEST INDIANS AS POSSIBLEhttp://brighemantmahajan.blogspot.com/
पीएच.डी.चा बाजार : पैसे मोजून पीएच.डी विकत घेण्याची प्रवृत्ती वाढलीइंग्रजीतून पानभर पत्रदेखील लिहू न शकणाऱ्या आखाती देशातील विद्यार्थ्याचा चारशे पानांचा पीएच.डी.चा प्रबंध इंग्रजीतून उत्तमरीत्या पूर्ण केलेला असतो. लाडक्या शिष्याच्या विषयनिवडीपासून प्रबंध मार्गी लागेपर्यंत मार्गदर्शकाने त्याची गुणवत्ता पणाला लावत विद्यार्थ्याला पीएच.डी. मिळवून दिल्याची उदाहरणे पुणे विद्यापीठातही आहेत.
गुणवत्तेच्या आधारे पीएच.डी. करणारे काही परदेशी विद्यार्थी आहेत आणि तितकेच प्रामाणिक मार्गदर्शकही आहेत. मात्र, शिष्याला "अर्थपूर्ण' मार्गदर्शन करणाऱ्या काही जणांमुळे संपूर्ण व्यवस्थेची प्रतिमा खराब होत आहे. परदेशातून, विशेषत: आखाती देशातून विद्यापीठात येणाऱ्या विद्यार्थ्यांना "योग्य' मार्गदर्शक मिळाल्यास ठरलेल्या वेळेआधीच अशा विद्यार्थ्यांची पीएच.डी. पूर्ण होते.
"पीएच.डी.'चे प्रबंध सादर करताना आवश्यक असलेला निबंध प्रकाशित करणारी अनेक नियतकालिके राज्यातील जवळपास सर्वच विद्यापीठांच्या ठिकाणी आहेत. विद्यापीठाचे मुख्य केंद्र असलेल्या शहरातून या नियतकालिकांचे काम चालते. संबंधित विद्यापीठातील मार्गदर्शकांची यादी या नियतकालिकाच्या संपादकांकडे तयार असते. मार्गदर्शकांना नियतकालिकाविषयी माहिती पाठविली जाते व या माध्यमातून निबंध प्रकाशित करण्यासाठी ग्राहक मिळविला जातो. एकदा मार्गदर्शक किंवा पीएच.डी.करणाऱ्या विद्यार्थ्याचा नियतकालिकांचे संपादक किंवा व्यवस्थापकाशी संपर्क झाल्यानंतर पुढील काम सोपे होते. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील निबंधप्रसिद्धीच्या कामाची गॅरंटी नियतकालिकांचे प्रतिनिधी देत असतात.
याविषयी बोलताना पुणे विद्यापीठातील अधिसभेचे ज्येष्ठ सदस्य व महाराष्ट्र प्राचार्य महासंघाचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार निकम म्हणाले, ""गुणवत्तेच्या विशिष्ट हेतूने विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) निबंध प्रकाशनाची अट घातली आहे. त्या हेतूलाच हरताळ फासण्याचे काम यामुळे होत आहे. पीएच.डी.चा हा बाजार थांबवून गुणवत्तापूर्ण संशोधनाकडे वाटचाल करण्याची गरज आहे.''
औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पीएच.डी.चे मार्गदर्शक म्हणून 20 वर्षे काम केलेले व सोसायटी फॉर पब्लिक एज्युकेशन ऍण्ड कन्सर्न (सोपेक) या संस्थेचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मण पेठे म्हणाले, 'पैसे मोजून सर्वच विकत घेण्याची प्रवृत्ती वाढत असून, पीएच.डी.च्या निमित्ताने पुन्हा हा विषय पुढे आला आहे.''
'शैक्षणिक मूल्यांमध्ये न बसणारा हा प्रकार आहे. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संबंधित व्यक्तीच अशा गोष्टींना प्रोत्साहन देत आहेत, ही निंदनीय बाब आहे.''
- डॉ. अरुण निगवेकर, माजी अध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयोग ,त्यामुळेच भारतातल्या पीएचडी ला जगात कवडीची हि किंमत नाही ........ काही प्रतिक्रियाऔरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात असे काही घडत नाही अशी शपथ घेऊन सांगू शकणार का....पेठे अहो परवाच बातमी आहे कि दिल्लीच्या आंबडेकर विद्यालयात स्वतः शिक्षक bcom चा पेपर फळ्यावर लिहून देत होते... पहिले ते सुधारा आणि मग दुसर्यांना शिकवा... पीएच. डी. मिळविण्याच्या ध्यासाने वर्षेच्या वर्षे कुटुंबियांचा दुरावा सहन करत सातासमुद्रापार काटकसरीने जगताना, अनेकदा पोटाला आणि मनाला चिमटा काढत, दिवसातून १५ ते १८ तास प्रयोगशाळेत खापताना माझ्या मायभूमीत घडणारी ही बातमी वाचून आज मनाला केवळ वेदनाच झाल्या नाहीत तर फार मोठा भ्रमनिरास झालाय... आपल्याकडे पैसा टाकून बरेच 'तमाशे' देखिले जातात हे जाणून होतोच. पण 'पैसा द्या, पीएच. डी. घ्या' हा प्रकार केवळ नवीनच ऐकलेला, निंदनीय व धक्कादायकच नाही तर आधीच भ्रष्ट प्रवृत्तींनी पोखरलेल्या आपल्या देशातील शिक्षणव्यवस्थेलाच सुरुंग लावणारा आहे. आपल्याकडच्या अनेक शिक्षण सम्राटांच्या नावापुढील 'डॉक्टर' या उपाधीमागाचे गुपीत या बातमीत तर दडलेले नाही ना? सर्व जबाबदार व्यक्तींच्या प्रत्रीक्रिया अति सावध आणि मुळमुळीत वाटतात. पुणे विद्यापीठात हा प्रकार गेली ३०-३५ वर्षे तरी चालू असावा. माझ्या माहितीतल्या एकाला अशीच डॉक्टरेट मिळाली आहे.बाकीच्या ज्या दोघांना मिळाली ते पाहून आमच्यातल्य प्रत्येकाला अचंबा वाटला. एखाद्या नियमावलीची पायमल्ली कशी करावी हे भारतीयांकडून खरोखरच शिकण्यासारखे आहे. खर तर या विद्येसाठी भारत हे जगातील एकमेव मुक्त विद्यापीठ आहे. ही 'कला' सर्वांनाच जमेल अशी नाही. अमेरिकेत असे काही घडले..तर तो विद्यार्थी, मार्गदर्शक अणि यूनिवर्सिटी...रद्द केलि जाईल...!!!

No comments:
Post a Comment