INDIA AGAINST CORRUPTION & BAD GOVERNANCE STORY 51
WILL PUBLISH ARTICLES REGULARLY ON CORRUPTION / BAD GOVERNANCE IN INDIA . PASS ON TO AS MAY HONEST INDIANS AS POSSIBLE
http://brighemantmahajan.blogspot.com/ संशोधन आणी
भ्रष्टाचार पीएच
.डी. किंवा विद्यावाचस्पती ही पदवी मिळविण्यासाठी मोठ्या संख्येने नोंदणी होणे ही खरे तर शिक्षण क्षेत्रातील एक चांगली घटना म्हणायला हवी. आपण निवडलेल्या विषयात सखोल अभ्यास करून काही नवीन निरीक्षणे, निष्कर्ष पुढे यावेत; त्यातून त्या त्या विषयात नव्या ज्ञानाची भर पडावी, हाच प्रामुख्याने पीएच.डी.चा उद्देश असतो. म्हणजे संशोधन हे साध्य असते आणि पीएच.डी.ची पदवी हे त्याचे निमित्त किंवा केवळ साधन असते. परंतु ही पदवी मिळविणे हेच एकमेव लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवून ती मिळविण्यासाठी ज्या प्रकारे खटपटी-लटपटी चालू आहेत, त्या पाहिल्यानंतर भ्रष्टाचाराची कीड संशोधनाच्या क्षेत्रातही शिरली असल्याचे स्पष्ट होते. कोणत्याही मार्गाने हा टिळा आपल्या भाळी लागलाच पाहिजे, असा अट्टहास केला जात आहे, असे दिसते. सखोल अभ्यास आणि संशोधनाऐवजी थातूरमातूर विषय निवडून त्यावर माहिती गोळा करणे आणि मग या "संशोधना'ला मंजुरी मिळविण्यासाठी सर्व भल्याबुऱ्या मार्गांचा वापर बिनदिक्कतपणे करणे, असे प्रकार वाढले आहेत. पीएच.डी.चे हे दुखणे नवीन नाही,त्यावर उतारा म्हणूनच विद्यापीठ अनुदान आयोगाने मान्यताप्राप्त नियतकालिकांमध्ये पीएच.डी.च्या उमेदवारांचे निबंध प्रकाशित होण्याची अट घातली. परंतु गैरप्रकार रोखण्यासाठी जेवढे नियम केले जातील, तेवढ्याच वेगाने त्यांना हरताळ फासण्याच्या क्लृप्त्या शोधल्या जातात आणि या खटपटींच्या सुरस आणि चमत्कारिक गोष्टींमध्ये भर पडते. काहींनी तर कंत्राटे घेतल्याप्रमाणेच पीएच.डी.साठी आवश्यक असलेली कामे करून देण्याचा उद्योग सुरू केला आहे. नियतकालिकांचा नियम झाला म्हटल्यावर काहींची स्वतःच नियतकालिक काढण्यापर्यंत मजल गेली आहे. प्रादेशिक भाषा, संस्कृत, पाली यासारख्या भाषा; तसेच मानव्य विद्याशाखांमधील विविध विषयांच्या मराठीतून लिहिलेल्या निबंधांसाठी नियतकालिकांची शोधाशोध सुरू झाली आहे. अशी नियतकालिके महाराष्ट्रात अत्यल्प आहेत. तीदेखील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तग धरून आहेत. काही व्यक्तींच्या त्यागावर ती चालली आहेत. नियतकालिकांनी चालविलेल्या वैचारिक कार्यात वाचक आणि लेखक म्हणून सहभागी होण्याची उत्सुकता कधीही न दाखविणाऱ्यांचे आता मात्र या नियतकालिकांविषयी प्रेम अचानक वाढू लागले आहे. त्या नियतकालिकांमध्ये काय प्रसिद्ध झाले आहे, हे पाहण्यापेक्षा त्या विशिष्ट नियतकालिकाला "आयएसएनएन' क्रमांक आहे का, हे पाहण्यापुरते हे प्रेम मर्यादित आहे, हेही ओघाने आलेच. काहींनी चक्क याच कारणासाठी नवी नियतकालिके सुरू केली आहेत. काही भाडोत्री निबंधलेखकही तयार झाले आहेत. एकूणच गुणवत्तेचा ऱ्हास मोठ्या प्रमाणावर होत असून, पीएच.डी. पदवीचा खुले आम व्यापार सुरू झाला आहे. सर्वच पीएच.डी.चे इच्छुक गैरप्रकार करताहेत असे अजिबात नाही, परंतु गैरप्रकारांची एकूण व्याप्ती आपल्या विद्यापीठीय शिक्षणाविषयीच्या दुरवस्थेकडे बोट दाखवीत आहे आणि त्याची गंभीर दखल घ्यायला हवी. पुणे विद्यापीठात गेल्या आठ वर्षांत चार हजारांहून अधिक विद्यार्थी पीएच.डी झाले; मात्र त्यातून या विद्यापीठाला अत्यल्प पेटंट मिळाले आहेत. ही आकडेवारी संशोधनाचा दर्जा आणि गुणवत्ता सुधारण्यास केवढा वाव आहे, याचीच जाणीव करून देत आहे. एकूणच, केवळ नियम करून विद्यापीठीय ज्ञानाचा दर्जा उंचावणार नाही, तर त्यासाठी पूरक वातावरण निर्माण व्हायला हवे. या दुष्प्रवृत्तींचे उच्चाटन करण्यासाठी व्यापक प्रयत्नांची गरज आहे. केंद्र सरकारने शालेय स्तरावर विज्ञान संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रकल्प तयार करणाऱ्यांना पाच हजारांचे अनुदान देण्याची योजना जाहीर केली, तेव्हा त्या योजनेचाही गैरफायदा घेतला गेला. स्वतः कष्टपूर्वक व कल्पकतेने विज्ञान उपकरणे तयार करण्याऐवजी ती विकत घेऊन सादर करण्याचा शॉर्टकट अनेक विद्यार्थ्यांकडून अवलंबण्यात आला. ज्ञानाच्या क्षेत्रातील या गैरप्रवृत्ती चिंताजनक आहेत. आर्थिक महासत्ता होण्याचे स्वप्न भारताने पाहायला सुरवात केल्यानंतर साहजिकच उच्च शिक्षणाला प्राधान्य दिले. त्यातून या क्षेत्रासाठी जास्तीत जास्त पैसा उपलब्ध करून देण्याचे धोरण आखले गेले. ते योग्यही आहे. परंतु केवळ पैसा ओतणे पुरेसे नाही. गुणवत्तेची चाड निर्माण करणे, शुद्ध ज्ञानाची जिज्ञासा निर्माण होणे,यासाठी वातावरण तयार करावे लागते. वेतनवाढ, नियुक्त्या आणि बढत्या महत्त्वाच्या नाहीत असे नाही; परंतु या गोष्टी मिळवीत असताना आपण ज्या क्षेत्रात काम करतो आहोत, त्याच्याशीच प्रतारणा करणे योग्य नाही, एवढे भान ठेवलेच पाहिजे. पीएच.डी. मिळवण्यासाठी अनेक गैरप्रकार होत आहेत. संशोधनाच्या क्षेत्रातील कीड नष्ट करण्यासाठी उपाय योजण्याबरोबरच ज्ञानाला पोषक वातावरण निर्माण केले पाहिजे
प्रतिक्रिया
संशोधनाला
: ह्याला
This is sad, but here in America we have a saying: "You get what you measure." When misinformed or incompetent individuals make artificial rules about what qualifies, you get the "results" that you see. Add to that the situation that there probably aren't even laws to send teachers taking bribes to jail.
सामान्य भारतीय नागरिक जबाबदार आहे. नैतिकता हि कुठेच राहिलेली नाही कारण लहानपणा पासून स्य्स्तेम ला कसे वाक्वे हे शिकविले जाते. भारत अराजक कडे वाटचाल करतो आहे. मी NewYork मध्ये मास्टर्स साठी संशोधन करत आहे. इथे दोन वर्षे खपून देखील IEEE जौर्नाल्स मध्ये पुब्लीश केलेला प्रबंध निवडला गेला नाही कारण संशोधनाचा दर्जा पाळला जातो. आणि प्रत्तेक publication हे त्या विषयातील तज्ञअकडून चेच्क केले जाते. काही तरी नवीन केले असेल आणि सर्व procedures follow केल्या असतील तरच पदवी मिळते. ज्ञानाला
भ्रष्टाचाराचा हा मार्ग राज्य्कार्त्यानीच आणि राजकीय पक्षांनीच आखून दिला आणि संधी मिळेल तिथे तो प्रशस्त केला. शिक्षण क्षेत्राला दोष देण्यात अर्थ नाही. माणसाची मुलभूत नितीमाता पूर्णतः खालावली आहे तिथे phd साठी कोण मन लावून संशोधन करणार? बंद करा Phd पोषक वातावरण म्हणजे काय आणि ते कसे असते, कसे दिसते , त्या वातावरणात काय काय केले जाते हे जरा उलगडून सांगा, नुसतीच भाषणबाजी नको.
The self-proclaimed great old Indian scientists are WHITE ELEPHANT. They obtain awards being very close to politicians. Look at our hopeless, calibreless, corrupted, nitwit & Noor-de-well scientist from national & Private research institute . "Scientist are origin of corruption". They hardly work and expecting their names in research paper. First remove all these junk old corrupted scientist, ~80% corruption will be over. Only productive scientists should be paid off otherwise punished.
:
college professor needs PHD.. no idea why?? why not master degree is enough..We have so much population.. unless population is rediced to half.. nothign will be solved.
लागलेली हि कीड अतिशय चिंताजनक आहे . वेळीच ह्यावर उपाययोजना केली पाहिजे अन्यथा अगोदरच कमी प्रमाणात संशोधनाकडे वळणारे गुणवंतांचे प्रमाण आणखी कमी होयील. संशोधन ही एक तपस्या आहे, हा मार्ग न्हवे पैसा कमावण्याचा ! कित्येक लोक तुलनेने कमी मोबदल्यात मुलभूत संशोधनासाठी स्वताला झोकून देतात, त्यांचे प्रमाण आपल्याकडे कमी आहे , पण योगदान मोठे आहे . त्यामुळे संशोधनाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड वेळीच नष्ट केली पाहिजे अन्यथा मुलभूत विज्ञानाचा ऱ्हास होयील ....
No comments:
Post a Comment