CORRUPTION STORY 22
WILL PUBLISH ARTICLES REGLARLY ON CORRUPTION IN INDIA . PASS ON TO AS
MAY HONEST INDIANS AS POSSIBLE
Anna's Fast Unto Death - Your support needed urgently
उत्तम
मोबदल्यावर खेळणाऱ्या क्रिकेटपटूंवर कोट्यवधींची खैरात करणे म्हणजे सार्वजनिक पैशाचं अपहरण सचिन ऐवजी अण्णा
धोनी अण्णा हजारे ना भारत रत्ना द्या आणि सार्वजनिक पैसा...विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंवर सध्या कोटीकोटींची खैरात सुरू आहे आणि त्याचवेळी पेस-भूपतींसारख्या असंख्य अव्वल क्रीडापटूंकडे दुर्लक्ष होत आहे. कोणी खासगी पैशातून ही खैरात केली, तर आक्षेप नाही. पण सवंग प्रसिद्धीसाठी उत्तम मोबदल्यावर खेळणाऱ्या क्रिकेटपटूंवर कोट्यवधींची खैरात करणे म्हणजे सार्वजनिक पैशाचं अपहरण आहे. सत्ताधाऱ्यांचे असे व्यवहारही अण्णा हजारे यांच्या मनातल्या 'लोकपाल विधेयका'च्या कक्षेत येतील का? गेली ४२ वषेर् संसदेच्या पायरीवर पडून असलेल्या लोकपाल विधेयकासाठी अखेरची लढाई देण्यासाठी मुहूर्त निवडताना अण्णा हजारे यांच्या मनात नेमका कोणता विचार होता?
महात्मा गांधी यांनी दांडी मार्चचा समारोप करून सहा एप्रिलला दांडी येथे 'मूठभर मीठ' उचलून सत्याग्रह केला, ती तारीख देशाच्या राजधानीत उपोषण सुरू करताना त्यांच्या मनात असेल. पण पूर्णपणे मीडियाच्या वरचष्म्याखाली सुरू असलेल्या आजच्या या जगरहाटीत अण्णांना हा मुहूर्त निवडायला फारसा वाव तरी कुठे होता? गेला दीड महिना अवघ्या भारतवर्षांला भ्रांतचित्त करून सोडणाऱ्या वर्ल्ड कप क्रिकेटचा अंतिम सामना शनिवारी होता आणि आठच दिवसांत पुन्हा एकदा तोच तो संमोहनविद्येचा खेळ 'आयपीएल'च्या नावानं सुरू होणार होता. क्रिकेटचे मोहिनीअस्त्र आणि अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजांचीही फिकीर या भारतीय उपखंडात एकदा का क्रिकेटचे मोहिनीअस्त्र भिरभिरू लागले की लोकांना अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजांचीही फिकीर उरत नाही. त्यामुळेच वर्ल्ड कप जिंकल्याची 'नशा' उतरल्यानंतरचा आणि आयपीएलच्या पूर्वसंध्येची झिंग चढण्याआधीचा मुहूर्त पकडणं भाग होतं! दोन गल्लाभरू क्रिकेट मोसमांच्या मधला अण्णांनी दिल्लीत उपोषण सुरू केलं
देशभर ठिकठिकाणी त्यांच्या समर्थनार्थ लोक एकत्र आल्यामुळे दिसून आलं. पण त्यामुळेच अण्णांच्या समर्थनार्थ पुढे येणारा गावागावातला दोन-पाचशेचा समूह आणि शनिवारची रात्र 'टीम इंडिया'च्या नावानं मनवणाऱ्यांची संख्या असंख्य बारमध्ये आणि घरांत उंचावल्या गेलेल्या मद्यांच्या चषकांची संख्या काही कोटींच्या घरात होती आणि लोकांनी त्या रात्री किती लाख लिटर मद्य रिचवले, याची आकडेवारीही छापून आली आहे.
क्रिकेटच्या नशेत आम्हाला कशाचं भान उरलं नाही
क्रिकेटच्या या छोट्या जगानं आणलेली नशा बाकी सारे गम विसरून जायला पुरेशी होती. या नशेत आम्हाला कशाचं भान उरलं नाही! विश्वचषक विजयानं आम्हाला जगात एक नवं स्थान दिलं .पण त्या वास्तवाच्या नशेमुळे आपल्याला सभोवताली नेमकं काय चाललं आहे, याचं भान उरणार नसेल, तर तो चषक म्हणजे 'सपनों का ताज' आहे, असंच म्हणावं लागेल. आठ तासांच्या सामन्यातल्या अवघ्या तासा-दोन तासांच्या खेळानं सचिन-सेहवाग-युवराज-जहीर आणि ढोणी कंपनी सव्वाशे कोटींच्या गळ्यातले ताईत बनलेत, हे लक्षात येताच त्यांच्यावर सर्वपक्षीय राजकारण्यांनी कोटी कोटींची खैरात सुरू केली आणि अनेक प्रश्न उभे राहिले. गेल्या काही महिन्यांत याच राजकारण्यांनी सार्वजनिक पैशांचं अपहरण करून कोट्यवधींची माया कशी जमवली, त्याचे सामान्यांच्या आकलनापलीकडले आकडे प्रसिद्ध झाले आहेत. त्यातून गब्बर झालेल्या राजकारण्यांनी स्वत:च्या खिशातून काही इनामं जाहीर करायला हरकत नव्हती. पण प्रसिद्धीच्या लाटेवर स्वार होण्यासाठी सर्वपक्षीय सत्ताधाऱ्यांनी पुन्हा एकदा सार्वजनिक पैशावरच डल्ला मारला आणि 'आम आदमी'च्या पैशातून म्हणजेच सरकारी तिजोरीतून ही 'दक्षिणा' जाहीर केली. विश्वचषकाच्या या स्पर्धेत निव्वळ खेळण्यासाठी या खेळाडूंना भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं कोट्यवधींचा मोबदला दिला आहे. शिवाय, मोजक्या देशांच्या या स्पधेर्तून 'विश्वविजय' मिळवल्यानंतर लगोलग कोटी-कोटींची इनामं जाहीर झाली आहेतच. क्रिकेट हा खेळ आणि वर्ल्डकपची स्पर्धा म्हणजे निव्वळ एक 'व्यवसाय' आहे. मग त्यात यशस्वी होणाऱ्यांवर इतका सार्वजनिक पैसा उधळण्याचं कारण काय? विजय मल्ल्या यांच्या किंगफिशरनं 'टीम इंडिया'ला आजन्म फुकट विमानप्रवासाचे दिलेले पास आणि एखाद्या बिल्डरनं दिल्ली परिसरात दिलेले आलिशान व्हिलाज, या बाबी वेगळ्या आहेत; कारण या लोकांनी ही खैरात त्यांच्या खाजगी मालमत्तेतून केली आहे.
सचिनवर सर्वांचंच अपार प्रेम आहे. गेली दोन दशकं त्यानं सर्वांना भरभरून आनंद दिला आहे. तरीही सचिन आणि कंपनीवर होणारी ही खैरात म्हणजे सार्वजनिक पैशाचं सत्ताधाऱ्यांनी स्वत:च्या सवंग लोकप्रियतेसाठी केलेलं अपहरणच आहे. त्यामुळेच अम्पायरनं नाबाद दिल्यावरही बाद असल्यामुळे स्वत:हून मैदान सोडणारा सचिन तरी आता ही खैरात थांबवण्यासाठी किंवा हा सार्वजनिक पैसा जनतेच्या कामांसाठी उपलब्ध करण्यासाठी पुढे येईल का, असा प्रश्न विचारावासा वाटतो. अण्णांच्या मनातल्या लोकपाल संकल्पनेच्या कक्षेत सत्ताधाऱ्यांचे हे असले व्यवहारही आणता येतील का?
किंवा किमान केवळ क्रिकेटवर सुरू असलेली सार्वजनिक पैशांची उधळपट्टी थांबवून याच आठवड्यात जागतिक स्तरावरील टेनिसच्या दुहेरी क्रमवारीत प्रथम स्थान मिळवणारे लिऍन्डर पेस आणि महेश भूपती तसंच विश्वनाथन् आनंद अशा अन्य क्रीडापटूंच्या वाट्याला सार्वजनिक पैशांतील दक्षिणेच्या मोहरा सोडा किमान खुर्दा यावा, म्हणून सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचं कलम या विधेयकात समाविष्ट करता येईल का?
!
No comments:
Post a Comment