Total Pageviews

Friday, 22 April 2011

BAD GOVENANCE STORY 81- ROAD SAFETY

भारतात रस्त्यांवरील अपघातात दर वर्षी लाखो लोक जर आपला जीव गमावत
INDIA AGAINST CORRUPTION & BAD GOVERNANCE STORY 81
WILL PUBLISH ARTICLES REGULARLY ON CORRUPTION / BAD GOVERNANCE IN INDIA . PASS ON TO AS MAY HONEST INDIANS AS POSSIBLE
http://brighemantmahajan.blogspot.com/ एखाद्या देशाने किती प्रगती केली, याचे मोजमाप वेगवेगळ्या निकषांवरून केले जाते. मग तो निकष सुशिक्षितांचे एकूण प्रमाण हा असेल; देशाचा आर्थिक विकास दर असेल किंवा संशोधन क्षेत्रात दिलेले योगदान असेल. याशिवाय इतरही अनेक कसोट्या विचारात घेतल्या जात असतील. परंतु एखाद्या देशाची रस्ता वाहतूक किती सुरळीत चालते, यावरूनही त्या देशाच्या एकूण प्रगतीचा आढावा घेतला पाहिजे. कारण पायाभूत सुविधांच्या विकासाचे स्वरूप, वाहनचालकांची वृत्ती आणि सवयी, शासन संस्था नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करते आहे किंवा नाही, या सर्वच गोष्टींचा रस्ता हा आरसा असतो. भारतात रस्त्यांवरील अपघातात दर वर्षी लाखो लोक जर आपला जीव गमावत असतील, तर त्यातून त्या देशाचे कोणते चित्र समोर येते? केंद्रीय गृहसचिव गोपाळ पिल्ले यांनी देशातील अपघाती मृत्यूंची आकडेवारी सांगताना, सरकारी खासगी क्षेत्रांनी एकत्र येऊन वाहतुकीचे व्यवस्थापन केले पाहिजे, अशी सूचना केली आहे. एकीकडे वाहनांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. पण त्या वेगाने वाहतूक व्यवस्थापनाचे तंत्र सुधारत नाही. खासगी संस्थांची सरकारला मदत अपेक्षित असली तरी तिचा परिणामकारक उपयोग व्हायचा असेल, तर सरकारला या व्यवस्थापनाची घडी बसविण्याची जबाबदारी टाळता येणार नाही. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सर्वदूर मजबूत करणे हे त्यातील एक प्रमुख उद्दिष्ट असले पाहिजे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम असेल तर कितीतरी वाहनचालक खासगी वाहने रस्त्यावर आणणार नाहीत. सर्वच संबंधित यंत्रणांवरील ताण त्यामुळे कमी होईल. परंतु मुंबईसारख्या शहराचा अपवाद वगळता इतर भागांत अद्यापही पुरेशा सोई निर्माण झालेल्या नाहीत. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि राज्यांची परिवहन खाती, प्रादेशिक वाहतूक प्राधिकरणे, पोलिस यांनी एकत्रितरीत्या प्रयत्न करून अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. या सर्वच विभागांतर्फे "रस्ता सुरक्षा सप्ताह' जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात साजरा होतो. पण वर्षभरच रस्ता सुरक्षेसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. लोकशिक्षण, अभियांत्रिकी, नियमांची अंमलबजावणी, तातडीची वैद्यकीय सेवा या सर्वच आघाड्यांवर प्रत्येक घटकाने वाटा उचलला तर सुरक्षितता साध्य होईल. प्रश्‍न केवळ निधीचा नाही, तर सुरळित रस्ता वाहतुकीची संस्कृती निर्माण करण्याचा आहे

No comments:

Post a Comment