Total Pageviews

Friday, 22 April 2011

ANTI NATIONAL NEWS PAPER & COLUMN WRITERS UNITE AGAINST ANNA UNDER CORRUPT POLITICIANS


 
तथाकथित
सुधारक आणि काही प्रसार माध्यमेसुद्धा अण्णांचे यश मान्य करण्यात, त्यांचे कौतुक करण्यात कद्रूपणा करीतात
INDIA AGAINST CORRUPTION & BAD GOVERNANCE STORY 82
WILL PUBLISH ARTICLES REGULARLY ON CORRUPTION / BAD GOVERNANCE IN INDIA . PASS ON TO AS MAY HONEST INDIANS AS POSSIBLE
http://brighemantmahajan.blogspot.com/मला ना तुला, घाल कुत्र्याला’ असा एक मराठी वाक्‌प्रचार आहे. त्याची सत्यता अण्णा हजारे यांच्याबाबत प्रकर्षाने येत आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध अण्णांनी रणशिंग फुंकले. त्याला मिळालेला प्रतिसाद आणि यश अभूतपूर्व आहे. सरकारला गुडघे टेकावे लागले. ४२ वर्षांपासून भिजत पडलेला लोकपालाचा विषय अण्णांच्या अवघ्या चार दिवसांच्या उपोषणाने मार्गी लागला. अण्णांचा निर्धार आणि त्यांच्या उपोषणाची धार महाराष्ट्रातील आघाडी, युतीच्या नेत्यांना चांगलीच परिचित आहे. त्यापैकी काही भ्रष्ट नेत्यांना यापूर्वी मंत्रिपद गमवावे लागले आहे. काहींना तुरुंगाची हवाही खावी लागली. जनलोकपाल विधेयकाच्या निमित्ताने राष्ट्रीय पातळीवर त्याची झलक दिसली. इंग्रजीचा गंध नसलेला एक फकीर आपल्या नैतिक बळाने दिल्लीचे तख्त हादरवू शकतो हे जगाने पाहिले. सगळा देश त्यामुळे प्रभावित झाला. राळेगणसिद्धीसारख्या आडवळणाच्या गावाला राष्ट्रीय तीर्थस्थानाचे महत्त्व प्राप्त झाले. विदेशातही अण्णांच्या आंदोलनाची दखल घेतली गेली. महाराष्ट्राचे तारणहार म्हणवून घेणार्‍यांना मात्र अण्णांची कर्तबगारी आणि उत्कर्ष रूचलेला दिसत नाही. अण्णांच्या आंदोलनाने जनता जागी झाली. त्याचा राजकारण्यांना राग येणे एकवेळ समजू शकते. पण तथाकथित सुधारक आणि प्रसार माध्यमेसुद्धा अण्णांचे यश मान्य करण्यात, त्यांचे कौतुक करण्यात कद्रूपणा करीत असल्याचे जाणवते. ‘अण्णांचे घूमजाव’, अण्णा नरमले’, ‘अण्णांचे माघारनृत्य’ यासारखे काही प्रमुख वृत्तपत्रांमधील मथळे आणि अण्णांच्या लढ्याने भ्रष्टाचार दूर होईल का अशी शंका उपस्थित करणार्‍या विद्वानांचे पांडित्य पाहिले तरी यांना अण्णांबद्दल असुया तर वाटत नाही ना अशी शंका येते. आश्‍चर्य म्हणजे महाराष्ट्रातील नेत्यांना दिल्ली दरबारात कोणी विचारत नाही, ते श्रेष्ठींपुढे गुडघे टेकतात, महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवतात अशी टीका करण्यात या पत्रक पंडितांचा नेहमी पुढाकार असतो. आता महाराष्ट्राच्या एका भूमिपुत्राने महाराष्ट्राचा बाणेदारपणा दाखवला, दिल्लीश्‍वरांना शरणागती पत्करायला लावली तर त्यालाही नाक मुरडले जात आहे ! अर्थात त्यात नवल काही नाही. किंबहुना महाराष्ट्राची ती परंपराच आहे. स्वत:ला पुढे जाता आले नाही तरी चालेल, आपल्यातील दुसरा कोणी पुढे जात असेल तर पाय ओढून त्याला खाली खेचायचे ही खेकड्याची मनोवृत्ती महाराष्ट्राने जपली आहे. स्वत:ला काही करायचे असेल तर दुसर्‍याने तेच केलेले काही वेळा खपत नाही. अण्णांच्या लढ्याबाबत तसेही म्हणता येणार नाही. भ्रष्टाचाराचा शाब्दिक निषेध सगळेच करतात. हस्तीदंती मनोर्‍यातून बाहेर पडायला कोणीच तयार नाही. स्वत: काही करायचे नाही आणि अण्णा करतात ते सहन होत नाही हा कद्रूपणाच नाही तर काय?

No comments:

Post a Comment