Total Pageviews

Friday, 8 April 2011

ANNA HAZARE FAST UPTO DEATH AGAINST- CORRUPTION STORY 37

ANNA HAZARE FAST UPTO DEATH AGAINST- CORRUPTION STORY 37
WILL PUBLISH ARTICLES REGULARLY ON CORRUPTION / BAD GOVERNANCE IN INDIA . PASS ON TOAS
MAY HONEST INDIANS AS POSSIBLE
http://brighemantmahajan.blogspot.com/
निराशेचं
वातावरण दूर लोटलं गेलं, अण्णा हजारे खरे हिरो
यासाठी
आपण प्रत्येकजण काही-ना-काही करू शकतोजनलोकपाल विधेयकासंदर्भात लढा देण्यासाठी अण्णा हजारे मध्य दिल्लीतील ज्या जंतर मंतरवर उपोषणासाठी बसले आहेत ते ठिकाण जनसामान्यासाठी जणू एक तीर्थक्षेत्र झालं . इथं विद्यार्थी, शिक्षक, स्वातंत्र सैनिक, बस कंडक्टर, पर्यटक, सिने तारे-तारका वेळोवेळी आपली उपस्थिती दर्शवली. सेलिब्रिटींचा उद्येश्य हा तिथं कायम बस्तान मांडलेल्या प्रसिद्धीमाध्यमांचे लक्ष वेधून घेण्याचा असला तरी इतरांच्या प्रतिक्रिया मात्र अद्भूत अशा आहेत.सिने

तारे-तारकांचे वेड असलेल्या आपल्या देशाचे नागरिक या सेलिब्रिटींकडे एक त्रोटक नजर टाकल्यानंतर -या उद्येश्याकडे वळत असल्याचं दिसत होतं. खरे हिरो अण्णा हजारे हेच होते आणि सच्च्या भारतीयाचे त्यांच्यापासून मन विचलित करणं कुणालाही शक्य नव्हतं. मनातलं खरं बोलायचं आणि कोणाचाही मुलाहिजा बाळगता भ्रष्टाचा-यांचे जाहीरपणे नाव सांगणं आणि समर्पणाच्या वृत्तीमुळं नेता-बाबू-उद्योगपतीच्या भ्रष्ट साखळीमध्ये घबराट निर्माण करत सर्वसामान्यांचे ते मसिहा झाले आहेत. या घडामोडीमुळे निराशेचं वातावरण दूर लोटलं गेलं, ही आणखी एक चांगली गोष्ट झाली आहे.आतापर्यंत तरी सर्व काही नीट चाललय. पण या आंदोलनामुळे काय-काय साध्य करता येऊ शकते आणि आंदोलन कुठवर नेता येऊ शकते यावर नागरी चळवळीतील नेत्यांमध्ये जे मतभेद आहेत ते निराश करणारे आहेत. आंदोलनाद्वारे साधला जाणारा उद्देश्य हा व्यक्तीविशेषपेक्षा मोठा असेल. आंदोलनात काही व्यक्तींना सामिल करून घेणं धोक्याचं होतं. आपली लोकप्रियता वाढविण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून हे लोक या आंदोलनाचा वापर करतील.एखाद्या व्यक्तीला स्वतःमध्ये सुधार करून ते मदतीसाठी हात पुढे करत असेल या तर्कावर विश्वास ठेवला तर ते आंदोलनासाठी चांगलं आहे. दुसरा तर्क असा की सरकारमध्ये सामिल लोकांना यंत्रणा कशी काम करते याची माहिती असते आणि भ्रष्ट लोक मतलबासाठी त्याचा कसा वापर करतात याचीही त्यांना माहिती असते. आम्हाला जर अशी छिद्र बंद करावयाची असतील तर या कामी अशा लोकांचा चांगला वापर होऊ शकतो. मला वाटतं की या आंदोलनाचं जेव्हा जनआंदोलनात रुपांतर होईल (ते होताना दिसतय) तेव्हा स्वार्थी लोक आपोआपच बाजूला होतील. जेव्हा ३० हजार लोक भ्रष्टाचारविरोधात एकत्र येतात तेव्हा नेत्यांमध्ये घबराट निर्माण होणं स्वाभाविक आहे. या आंदोलनामुळे दिल्लीसह देशभरात जो उत्साह दिसतोय त्यामुळे आशा दहापटीने उंचावल्या आहेत. सत्ताधारी लोक निरर्थक बोलून याला गुंतागुंतीचं करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण ज्या लोकांना सरकारकडून चर्चेसाठी वारंवार बोलावलं जातय, ते भूलथापांना बळी पडणार नाही अशी आशा वाटते.भ्रष्टाचारविरोधात ही ज्योत अशीच पेटत राहो, तेवत राहो..देशभरात प्रकाश पसरवत राहो. विजय अखेर देशातल्या जनतेचाच होईल हे मात्र निश्चित.फेसबुकवाले ' लाइक ' करताहेत... मोबाइलवाले एसएमएस ' फॉरवर्ड ' करताहेत... -मेलवाले सपोर्ट मेसेज ' सीसी ' करताहेत... पण ' एवढेच ' करून भ्रष्टाचाराला लगाम बसेल ?
हे आंदोलन फक्त अण्णांचे नाही. जन्माला घालणा-या हॉस्पिटलपासून स्मशानापर्यंत चिरीमिरी मागणा-या व्यवस्थेला आणि वर्षानुवर्षे होणा-या कामांनी वैतागलेल्या तुम्हा आम्हा सगळ्यांचे हे आंदोलन आहे...
यासाठी आपण प्रत्येकजण काही-ना-काही करू शकतो.... काय करायचे हे ठरवायची ही वेळ आहे... फेसबूक, ट्विटरमुळे अण्णांचा फॅन क्लब वाढतच चालला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराविरोधात आमरण उपोषण सुरू केल्यानंतर त्यांना साथ देण्यासाठी हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. परंतु सध्याच्या इंटरनेट युगात सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून अण्णांच्या-सत्याग्रहाला पाठिंबा देणारांची संख्या त्याहून कितीतरी पटीने अधिक आहे. फेसबूक, ट्विटरमुळे तर अण्णांचा तरूणाई फॅन क्लब वाढतच चालला आहे.
सत्तरीच्या आसपास असलेल्या अण्णा हजारे यांच्या -चाहत्यांची संख्या ६५ हजाराहून अधिक आहे. अनेकांनी ट्विटरच्या माध्यमातून अण्णांच्या उपोषणाला सहकार्य करा असे आवाहन केले आहे. ट्विटरवर सगळ्यात जास्त अण्णा हजारे त्यांच्या आंदोलनाची माहिती देणारे ट्विट आहेत. केवळ भारतातच नाही तर अरबी देश , इंग्लंड आणि अमेरिकेसारख्या देशातही अण्णांची ख्याती ट्विटरच्या माध्यमातून पसरली आहे.
आवाज नावाच्या एका इंटरनॅशनल कम्युनिटीमध्ये सुमारे . दशलक्षाहून अधिक लोक सदस्य आहेत .या कम्युनिटीनेही आता अण्णांच्या उपक्रामाला सहकार्य करायचे ठरवले आहे. २००७ मध्ये तयार झालेली ही कम्युनिटी इंटरनेटद्वारे जगभरातील आंदोलनांना पाठिंबा देते.
अण्णांच्या उपोषणामुळे केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे लोकपाल विधेयक समितीतील मंत्रीगटातून बाहेर पडल्यानंतर अण्णांच्या अनुयायांनी हा मोठा विजय असल्याचे सांगितले. पण अण्णांची प्रतिक्रिया मात्र काहीशी निराळी होती. ते म्हणाले की, शरद पवार बाहेर पडले तरी अन्य कुणीतरी भ्रष्ट नेता या ठिकाणी येऊन बसले. तेव्हा सगळ्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. अण्णांच्या अशा निर्धारामुळेच अण्णांचे अनुयायी त्यांना दुसरेमहात्माम्हणत आहेत.
फेसबुकवर अनेकांनी आपल्या वॉलवर अण्णांच्या आंदोलना पाठिंबा देणारे आणि भ्रष्टाचाराविरोधात मत व्यक्त केले आहे. तसेच अनेकांनी आपण या आंदोलनात कशा प्रकारे सहभागी होणार आहोत याची वेळ आणि दिवसानुसार माहितीही फेसबुकवर दिली आहे.

अनेकांनी युट्युब या व्हिडिओ साईटवर अण्णांच्या आंदोलनाचे व्हिडिओ अपलोड केले आहेत. आतापर्यंत ९० हजारांहून अधिक लोकांनी हे व्हिडिओ पाहिले आहेत. तसेच अनेकांनी फेसबुक आणि ट्विटर तसेच एसएमएसच्या माध्यमातून लोकांपर्यंत सेदेश पोहोचवून अनेक ठिकाणी मोर्चे आणि कँडलमार्च आयोजित केले आहेत. इंडिया अगेन्स्ट करप्टशन या फेसबुकवरील पानावर भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचा -मेल आयडी देण्यात आला आहे. याच्या मदतीने अनेकांनी आपला संदेश राष्ट्रपती आणि पंतप्रधानांपर्यंत पोहोचवला आहे तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कळवा... तुमचे मत या मजकूराखालील प्रतिक्रियेच्या बॉक्समध्ये लिहून आमच्यापर्यंत पोहोचवा 

No comments:

Post a Comment