Total Pageviews

Sunday 20 March 2011

HUMAN RIGHTS COMMON INDIAN

सामान्या माणासा वर अत्याचार;पोलिस कोठडीतील मृत्यूत महाराष्ट्र नंबर वन महाराष्ट्रातील पोलिस कोठडीमधील मृतांची संख्या देशात सर्वाधिक आहे. गेल्या चार वर्षांत राज्यातील विविध पोलिस कोठडींमध्ये 94 जणांचा मृत्यू झाल्याने अत्याचार प्रतिबंधक कायद्याची गरज अधिक जाणवू लागली आहे. लोकसभेतील प्रश्‍नोत्तरांच्या तासात देण्यात आलेल्या लेखी उत्तरामध्ये महाराष्ट्रात 2010 ते 31 जानेवारी 2011 पर्यंत पोलिस कोठडीत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. 2009 ते 2010 मध्ये 20 जणांचा, 2008 ते 2009 मध्ये 23, तर 2007 ते 2008 मध्ये 25 जणांचा मृत्यू झाला आहे. इतर कोणत्याही राज्यामधील पोलिस कोठडीत झालेल्या मृत्यूंपेक्षा महाराष्ट्रात झालेल्या मृत्यूंची संख्या खूपच अधिक असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.कायदा सुव्यवस्थेबाबत नेहमी शंका घेतल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेश राज्यातील पोलिस कोठडीमध्ये महाराष्ट्रापेक्षा कमी मृत्यू झालेले आहेत. उत्तर प्रदेश या क्रमवारीत महाराष्ट्राच्या खालोखाल असून, तिथे मागील चार वर्षांत 84 मृत्यू झाले आहेत. तसेच 2009 पासून पोलिस कोठडीतील मृत्यूच्या प्रमाणात येथे लक्षणीय घट झाली आहे. 2009 ते 2010 मध्ये 16 आणि 2010 ते 2011 मध्ये 15 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, महाराष्ट्रातील पोलिस कोठडीमधील मृत्यूच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. देशभरात मागील चार वर्षांत पोलिस कोठडीत 560 जणांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय मानवी हक्‍क आयोगानेही अशा मृत्यूबाबत नाराजी व्यक्‍त करीत कैद्यांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीबाबतची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत



No comments:

Post a Comment