Total Pageviews

Thursday, 31 March 2011

भारत-पाकिस्तान सामन्यात १७ हजार कोटीचा सट्टा लागला

३३,१०० पैकी प्रत्यक्ष विक्रीसाठी अवघी चार हजार तिकिटे :सामान्य क्रिकेटप्रेमींना घरी बसून सामना बघावा
 
भारत-पाकिस्तान सामन्यात १७ हजार कोटीचा सट्टा लागला
हा सट्टा कानुनी करुन यावर कर लाउन सरकारी उत्पन्न का वाधवले नाही
?
वानखेडेवर जादा वीजपुरवठा
ही विज जर शेतकर्याना पुरवली असती तर जास्त चान्गले पिक येउन सामन्या माणसाला दीलासा मिळाला अस्ता
. वर्ल्डकपच्या फायनल मॅचसाठी वानखेडे स्टेडियमला सतत झळाळत ठेवण्यासाठी बेस्टतफेर् शनिवारी तीन मेगावॉट इतका प्रचंड वीज पुरवठा होणार आहे. मॅचच्या दिवशी वीज पुरवठा खंडीत होऊ नये म्हणून बेस्टने स्टेडियममध्ये खास कंट्रोल पॅनल तयार केला आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यात एप्रिलला वानखेडेवर र्वल्डकपची फायनल मॅच होणार आहे. न्यूझीलंड श्रीलंका यांच्यात येथे झालेल्या एका सामन्यादरम्यान एक जनरेटर बंद पडला होता. त्यामुळे सात मिनिटांसाठी एक पॅनेल बंद पडला होता. शनिवारची मॅच अत्यंत महत्त्वाची असल्याने वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न होत आहेत. यासंदर्भात बैठका झाल्याचे बेस्ट समितीचे अध्यक्ष संजय पोतनीस यांनी सांगितले.
अभूतपूर्व
बंदोबस्त :पोलिसांव्यतिरीक्त एनएसजी, क्युआरटी, फोर्स वन, सीआयएसएफ आणि लष्कर, नौदल, हवाई दलाने सुरक्षेसाठी कंबर कसली
हा अभूतपूर्व
भारत विरुद्ध श्रीलंका या दोन संघात होणा-या वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्या साटी वानखेडे स्टेडियम आणि खेळाडूंचा निवास असलेल्या ताज हॉटेलसह अवघ्या मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दक्षिण मुंबई नो फ्लाइंग झोन म्हणून जाहीर करण्यात आला असून पोलिसांव्यतिरीक्त एनएसजी, क्युआरटी, फोर्स वन, सीआयएसएफ आणि लष्कर, नौदल, हवाई दलाने सुरक्षेसाठी कंबर कसली आहे.
स्टेडियमच्या सुरक्षेसाठी त्रिस्तरीय बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तिकीट आणि आयकार्ड दाखवल्याशिवाय आत शिरता येणार नाही. एकदा आत शिरले की बाहेर येता येणार नाही. सामन्याची सर्व तिकिटे आधीच विकली गेली असल्यामुळे तिकीट मिळेेल या आशेवर कोणीही स्टेडियमकडे फिरकू नये . भारत आणि श्रीलंकेच्या राष्ट्रपतींसह अनेक मान्यवर सामन्याला उपस्थित राहणार आहेत. व्हीव्हीआयपी व्यक्तींव्यतिरीक्त कोणाचीही वाहने स्टेडियमपर्यंत सोडण्यात येणार नाहीत. प्रिन्सेस स्ट्रीटवरील पुलापर्यंत खासगी वाहने नेता येतील. सर्व महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्हीचा वॉच आहे. ठिकठिकाणी फायर ब्रिगेडची पथके आणि मल्टी स्पेशालिटी अॅम्ब्युलन्स तैनात करण्यात आल्या आहेत. पोलिस सैन्याच्या तिन्ही दलांशी समन्वय साधून काम करीत आहेत .
सामन्याच्या दरम्यान मासेमारी बंदी -कोळी समाजानी काय करायचे ?
सामन्याच्या दरम्यान मासेमारी आणि बल्क एसएमएसवर बंदी असेल. स्टेडियमवर पाणी, खाद्यपदार्थ, कॅमेरा, दुबिर्ण नेण्यास मनाई आहे. सीआयएसएफचे जवान स्टेडीयमवर तैनात असलेल्या पोलिसांचीही तपासणी करतील. केटरींगच्या व्यवस्थेत असलेल्या दोन हजार लोकांसह, पोलीस आणि अन्य व्यवस्थेत असलेल्या लोकांना पोलिसाच्या आयकार्डचे वाटप करण्यात आले आहे

एप्रिलला मुंबईत सरकारी सुट्टी
सरकारी
आणि निमसरकारी कर्मचा-यांना रवीवारी काम करायला लावामुंबईतील सरकारी आणि निमसरकारी कर्मचा-यांना वर्ल्ड र्ल्ड कप फायनल पाहण्यासाठी फारशी धावपळ, दगदग करावी लागणार नाहीए. कारण, या मंडळींवर मेहरबान होऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांना एप्रिलला विशेष सुट्टी देऊन टाकली आहे. त्यामुळे सकाळी आरामात उठून, नाश्ता-जेवण करून, एखादी डुलकी काढून अगदी टॉसपासून संपूर्ण मॅचचा आनंद ते लुटू शकणार आहेत.
मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर होणारी भारत-श्रीलंका फायनल एन्जॉय करण्यासाठी तमाम क्रिकेटप्रेमींनी जय्यत तयारी सुरू केली आहे. ऑफिसला दांडी मारायची का, ते शक्य नसेल तर लवकर कसं पळायचं, कितीची ट्रेन पकडायची, वगैरे प्लॅनिंग मुंबईकरांनी सुरू केलंय. पण मुंबईतल्या सरकारी आणि निमसरकारी कर्मचा-यांनी या कशाचीच काळजी करायची गरज नाहीए. एप्रिलला त्यांना एक दिवसाची विशेष सुट्टी देण्याची घोषणा मुख्यमंत्री कार्यालयातून झाली आहे. अर्थात, ही सुट्टी देण्यामागे एक विशेष उद्देश आहे आणि तो म्हणजे दक्षिण मुंबईतील गर्दी कमी करणे...
वर्ल्डकप फायनलदरम्यान कुठलाही घातपात घडू नये, यादृष्टीने मुंबईत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. अनेक मोठे नेते आणि बड्या व्यक्ती या सामन्यासाठी येणार असल्यानं पोलिसांवर आधीच मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे . मुंबईतील गर्दी कमी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. फायनल बघण्यासाठी हजारो प्रेक्षक वानखेडेवर येणार आहेत. त्याचवेळी ऑफिसातून घरी जाणा-यांचीही गर्दी उसळली तर सगळीच कोंडी होईल आणि पोलिसांसाठी वेगळीच डोकेदुखी उद्भवेल. या परिस्थितीवर तोडगा म्हणून राज्य सरकारनं आपल्या कर्मचा-यांना सुट्टी देऊन टाकली आहे. वानखेडे स्टेडियम आणि भोवतालच्या परिसरात सुमारे दहा हजार पोलीस बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात येणार आहेत. आता सरकरानं सुट्टी जाहीर केल्यानं आणखी एक हजार पोलीस बंदोबस्तासाठी उपलब्ध होणार आहेत. एप्रिलला वर्ल्डकप फायनलमुळे सुटी जाहीर केल्याने राज्य सरकारच्या कर्मचा-यांना आता तीन दिवसांची सुट्टी मिळणार आहे. कारण एप्रिलला रविवार आहे तर सोमवारी एप्रिल रोजी गुढीपाडव्याची सुट्टी आहे. त्यामुळे मुंबईतील सरकारी कर्मचारी खूष झालेत

क्रिकेट आणि डिप्लोमसी
सेमी फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तानची टक्कर होणार आहे. अनायसे चालून आलेल्या या संधीचा उपयोग करुन घेत पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी पाकशी चर्चा करण्याचा घाट घातलाय. क्रिकेट आणि डिप्लोमसी एकाचवेळी सुरू होत आहे. पण अशाने प्रश्न सुटणार आहेत का?... याचं उत्तर नाही असेच येण्याची शक्यता जास्त आहे.याआधी देखिल क्रिकेट सामन्यांचे निमित्त पुढे करत भारत-पाक यांच्यात चर्चा सुरू करण्याचे प्रयत्न झाले आहेत. पाकिस्तानात लोकशाही सरकार पाडून सत्तेवर आलेल्या झिया ऊल हक आणि परवेझ मुशर्रफ या दोन लष्करशहांनी भारतीय क्रिकेटपटूंशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. मग भारताने शांतता चर्चा करण्याचा प्रस्ताव मांडला. पण पुढे काय, अनेक मुद्द्यांवर असहमती झाल्याने काही महिन्यांतच बोलणी थांबली. दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला.आता देखिल काहीसा असाच प्रकार घडतोय. मुंबईत २००८ मध्ये २६ नोव्हेंबरच्या रात्री दहशतवाद्यांनी हल्ला केला. अनेक देशी-विदेशी सामान्य नागरिकांची हत्या केली. या दहशतवादी हल्ल्यानंतर थांबलेली भारत-पाक चर्चा आता क्रिकेटच्या निमित्तानेच पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण दोन्ही देशांच्या मूलभूत भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही.जम्मू-काश्मीर आणि दहशतवाद या दोन विषयांवरुन भारत-पाकमध्ये वारंवार तणाव निर्माण होतो. पण या दोन्ही बाबतीत भारत-पाकची भूमिका अगदी विरुद्ध टोकाची आहे. अनेक वर्षापासून हीच परिस्थिती आहे. मग चर्चा कशासाठी?मुंबईवर हल्ला झाला त्यानंतर अनेकांनी मेणबत्त्या घेऊन श्रद्धांजली अर्पण करण्याचा जाहीर कार्यक्रम केला. दहशतवादाचा कायमचा बंदोबस्त करण्याची एकमुखाने मागणी झाली. मग काय, २६/११ हल्ल्याच्या मास्टर माईंड विरोधात पाकने कारवाई करावी म्हणून भारताने प्रचंड दबाव आणायला सुरुवात केली. भारत-पाक चर्चा थांबली....झालं गेलं विसरुन आपल्या पंत्रधानांनी पाकचे पंतप्रधान युसुफ रझा गिलानी यांना मॅच बघण्यासाठी बोलावलं. मॅचच्या निमित्ताने भेटायचं आणि भारत-पाक चर्चेची नव्याने सुरुवात करण्यासाठी रुपरेखा ठरवायची, असेही ठरले.पाकने असे काय केले ज्यामुळे भारताने पाकशी नव्याने चर्चा सुरू केली?, २६/११ च्या पाकमधल्या मास्टर माईंडला शिक्षा दिली जाणार आहे का?, दहशतवादाचा बंदोबस्त होणार आहे का?, की काश्मीरच्या मुद्द्यावर पाकच्या विचारांमध्ये बदल झाले आहेत?.यातल्या एकाही प्रश्नाचे उत्तर होकारार्थी नाही. तरीही पाक पुरस्कृत दहशतवाद वाढला म्हणून बंद केलेली चर्चा सुरू करण्याची घाई भारत सरकार करत आहे.चर्चाच करायची तर त्यासाठी क्रिकेट मॅचचेच निमित्त कशाला हवे?. दोन्ही देशांची ज्या प्रश्नांबाबत एवढ्या वर्षात भूमिकाच बदलेली नाही ते प्रश्न मॅचच्या निमित्ताने चर्चा सुरू करुन सुटतील, अशी आशा करणे फारच भाबडेपणाचे ठरेल. अर्थात हे सगळं माहित असूनही पंतप्रधानांनी चर्चा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. कारण एकच जे प्रश्न आपल्याला सोडवता येत नाही ते पुढच्या नेत्याच्या हाती सोपवेपर्यंत वेळ घालवत राहणे आवश्यक आहे. नेमके हेच पंतप्रधान मनमोहन सिंह करत आहेत. क्रिकेट मॅच हा मिडीयाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. त्याचा उपयोग करुन घेत चर्चेचे गु-हाळ घालायचे आणि वेळ काढायचा.जागतिक दबावांना तोंड देत मैत्रीची भाषा करायची आणि भारतीयांच्या अस्मितेचे भान ठेवत चर्चा थांबेपर्यंत आपल्या मुद्द्यांवर ठाम राहायचे अशी पाकची गेम स्ट्रॅटेजीआहे . हीच तर आहे, क्रिकेट डिप्लोमसी
क्रिकेट
पीचवर काश्मीरमोहालीतील क्रिकेट डिप्लोमसीचे गुणगान सर्वत्र सुरू असताना, क्रिकेटच्या या पीचवर पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी काश्मीर प्रश्नाचा गुगली टाकण्याची संधी साधलीच. भारत-पाकिस्तान दरम्यानचा कळीचा काश्मीर प्रश्न तातडीने सुटावा, अशी अपेक्षा गिलानी यांनी बुधवारच्या भेटीत पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे व्यक्त केली.
भारत-पाक क्रिकेट सामना संपल्यानंतर आयोजित केलेल्या खास डिनरनंतर उभय पंतप्रधानांनी संवाद साधला. मनमोहन सिंग गिलानी यांच्यात झालेल्या चचेर्ची माहिती पाकच्या वतीने परराष्ट्र खात्याचे सचिव तेहमिना जनुजा यांनी गुरुवारी दिली. उभय देशांदरम्यान अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यातील काश्मीर प्रश्न तातडीने सोडवण्याची आवश्यकता आहे आणि तोही काश्मिरी जनतेच्या आशाआकांक्षा ध्यानात ठेवून, असे मत गिलानी यांनी सिंग यांच्याकडे व्यक्त केले.
त्याचवेळी, जुने शत्रुत्व मागे ठेवून दोन्ही देशांतील मतभेद दूर करणाऱ्या वाटा आपण शोधू या, असे आवाहन मनमोहन सिंग यांनी गिलानी यांना चचेर्दरम्यान केले. वादाचे प्रश्न दूर करण्याची क्षमता दोन्ही देशांकडे आहे आणि चचेर्द्वारे ते सोडवण्याची तयारी मनमोहन सिंग यांनी मोठ्या मनाने दर्शविली असल्याचे गिलानी म्हणाले. 'क्रिकेट' हा दोन्ही देशांतील कोंडी फोडणारा दुवा ठरला आहे. त्यामुळे दोन्ही देशांचे पंतप्रधान एकत्र आले आणि ही खूप चांगली सुरुवात आहे, असे मनमोहन यांनी नमूद केले
दीड लाख मोजा, तिकीट मिळवा
मुंबईत शनिवारी होणारी वर्ल्ड कपची अंतिम लढत बघायची असेल तर दीड लाख रूपये मोजण्याची तयारी ठेवा. सध्या या सामन्याचे तिकीट या दराने विकले जात आहे आणि आश्चर्य म्हणजे या अव्वाच्या सव्वा दराने तिकीट घेणारेही बरेच आहेत.
हे दर वाढले ते भारत अंतिम सामन्यात आला त्या क्षणी. आज ताजे दर असे आहेत:
इस्ट - वेस्ट स्टँडः किमान १८ हजार (प्रत्यक्ष दर ,५००)
नॉर्थ स्टँडः किमान ३६ हजार (प्रत्यक्ष दर ५०००)
सचिन तेंडुलकर स्टँडः किमान ८५ हजार (प्रत्यक्ष दर १५,०००)
वेस्ट अॅव्हेन्यूः सव्वा लाख ( प्रत्यक्ष दर ३७,५००)
व्हीव्हीआयपी तिकीटः अडीच लाख (प्रत्यक्षात विक्रीसाठी नाही)
तिकीटासाठी धडपडणा-यांमध्ये राजकारण्यांपासून विद्यार्थ्यांपर्यंत अनेक जण आहेत. यात काही बुकीही सामील झाले होते. पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, तिकीटांचा काळाबाजार रोखणे याला आमचा अग्रक्रम नाही तर कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही आमच्या दृष्टीने अधिक महत्त्वाची बाब अहे.
तिकिटांचे दर वाढण्यामागे आणखी एक कारण म्हणजे वानखेडे स्टेडियमची क्षमता जेमतेम ३३,१०० आहे. यापैकी प्रत्यक्ष विक्रीसाठी अवघी चार हजार तिकिटे होती. बाकीची सर्व तिकिटे विविध क्लब्जना, तसेच खास निमंत्रितांना दिली गेली आहेत. त्यामुळे सामान्य क्रिकेटप्रेमींना घरी बसून तिकीट पाहण्यातच धन्यता मानावी लागणार आहे
 
बंदोबस्त 'नक्षली दहशती वीरुध का करत नाहि ?
अटीतटीच्या भारत-पाकिस्तान सामन्यात भारताची सुरुवात दणक्यात झाली. पण सामन्याची गणिते सतत बदलत होती आणि तसेच बदलत होते बुकींचे भावही. सुमारे १७ हजार कोटीचा सट्टा लागलेल्या या मॅचमध्ये दोन्ही देशांच्या भावात सतत चढउतार होत असला तरी अखेरपर्यंत भारतच बुकींचा फेव्हरीट होता.
मोहालीतल्या सामन्यात बुकींचे रेट ओव्हरगणिक बदलत राहीले. सेहवागने सामन्याच्या सुरुवातीला जबरदस्त टोलीबाजी केल्यानंतर बुकींनी भारताचा रेट आणखी खाली नेत ४८ पैसे केला. पण २६ व्या षटकात विराट कोहलीच्या पाठोपाठ फॉर्मात असलेल्या युवराज सिंगची विकेट पडल्यावर हा रेट वाढायला लागला. ३७ व्या षटकात सचिन बाद झाल्यावर हा आणखीनच वाढला. ४२ षटकात बुकींनी भारताचा रेट .२० पैसे म्हणजे सामना सुरू होताना असलेल्या रेटच्या दुप्पट वाढवला. पण पुढच्या सहा षटकात भारताने चांगली फटकेबाजी केल्यानंतर हा रेट ४९व्या षटकात पुन्हा ७५ पैसे इतका खाली आला. भारताची इनिंग संपली असताना भारतावर ७८ पैसे आणि पाकीस्तानवर .२० रुपये असा भाव सुरू होता.
पाकिस्तानच्या डावाची सुरुवात झाल्यानंतर ३० व्या षटकापर्यंत भारताची सामन्यावर पकड कायम होती. सट्टेवाल्यांनी भारताला २७ पैसे आणि पाकिस्तानला .५० रुपये भाव देऊन भारताच्या बाजूने झुकते माप दिले. पण सामन्याचा निर्णय होईपर्यंत बुकींच्या दरात सतत चढ उतार होत होती. सामन्यात बुकींचे दान अचूक पडले असले तरी सामन्यात सतत रस्सीखेच सुरु असल्यामुळे कोणत्याही क्षणी ही गणित उलटसुलट होतील अशी स्थिती अखेरपर्यंत कायम होती

No comments:

Post a Comment