Total Pageviews

Tuesday 29 March 2011

भ्रष्टाचारावर क्रिकेटने केली मात

भ्रष्टाचारावर क्रिकेटने केली मात
कसाबलाही भारत-पाक क्रिकेट सामन्याची स्पेशल तिकिटे पाठवून द्यावी
देशात सध्या विश्‍वचषक क्रिकेटचाज्वर’ वाढला आहे. एवढा की कुणाला दुसरे काही सुचतच नाही. जपानप्रमाणे इकडे भूकंप झाला, सुनामी आली तरी त्या विध्वंसाच्या ठिकर्‍यांवरही क्रिकेटचा विश्‍वचषक खेळला जाईल. आता हा विश्‍वचषकज्वर’ एका वेगळ्या वळणावर नेण्यात आला आहे. बुधवारी मोहालीत भारत-पाकिस्तान यांच्यात क्रिकेटचा सामना होणार आहे त्या खास सामन्यासाठी पंतप्रधान मनमोहन साहेबांनी पाकचे पंतप्रधान गिलानी राष्ट्रपती झरदारी यांना खास आमंत्रित केले आहे. पाक पुरस्कृत अतिरेकी हल्ल्यांत जे निरपराधी मारले गेले, जे सैनिक शहीद झाले त्यांच्या बलिदानाचे काय?. गिलानी-झरदारींना क्रिकेट सामन्यांचे आमंत्रण म्हणजेशांतीचा पैगाम’ आहे, असे काही मंडळींना वाटते, पण सैतान कधी गीता वाचेल काय? पाकिस्तानीमीडिया’ने या सर्व प्रकारासशांतीचा षटकार म्हटले आहे. खुद्द मनमोहन सिंग हिंद-पाक क्रिकेटचा सामना पाहायला जाणार आहेत. या आधीही पाकिस्तानचे अनेक राष्ट्रपती पंतप्रधान हिंदुस्थानात क्रिकेटचे सामने पाहायला आले. म्हणून त्याशांतीच्या छक्क्या’ने भारतातील अतिरेकी कारवाया थांबल्या नाहीत. उलट त्या वाढतच गेल्या. संसदेवर हल्ला झाला. मुंबई - दिल्लीत बॉम्बस्फोट झाले. कारगिलचे युद्ध झाले. कसाब त्याच्या टोळीने मुंबईत घुसून हल्ला केला. त्यात २० पोलीस अधिकारी शहीद झाले २००च्या वर निरपराधी मारले गेले. क्रिकेटच्याशांती पैगामा’चे फळ ते हेच काय? झिया उल हक, मुशर्रफ वगैरे पाक राष्ट्राध्यक्ष इकडे क्रिकेट बघायला आल्याने त्यांचे मतपरिवर्तन झाले नाही. उलट सूडाग्नीचा भडाग्नी अधिकच पेटला. आता पाकिस्तानातून झरदारी गिलानीस बोलावलेच आहे तर मग मनमोहन सिंगांनी आर्थर रोड तुरुंगातील कसाबलाही भारत-पाक क्रिकेट सामन्याची दोन स्पेशल तिकिटे पाठवून द्यावी. त्यांच्यावर तरी अन्याय कशासाठी?आदर्श घोटाळा, टूजी स्पेक्ट्रम, कॉमनवेल्थ गेमपासून गल्ली ते दिल्लीपर्यंत लहान मोठ्या माफियांच्या संगतीने नोकरशाही, धनदांडग्या राजकारण्यांनी भ्रष्टाचाराच्या अमाप पीक घेतल्याचा आरोप करून भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी रणशिंग फुंकले. त्या लढ्याचा भाग म्हणून मुंबईत मोठी सभा घेण्याचा इरादा होता. पण, वर्ल्डकप क्रिकेटचे गारूड मुंबईकरांवर असल्याने, अण्णा हजारे यांना क्रिकेटच्या लोकप्रियतेमुळे भ्रष्टाचाराच्या विरोधातील सभा तीन दिवस पुढे ढकलावी लागली आहे.
र्वल्ड कप कोणाच्या ताब्यात जाणार यापेक्षा भारत पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटची मॅच म्हणजे खेळातील जबरदस्त युद्ध असते. क्रिकेटच्या युद्धात पाकला चारीमुंड्या चीत करण्याची मोहालीत ३० तारखेला किमया पाहण्यासाठी प्रत्येक भारतीय क्रिकेटप्रेमी उत्सुक आहे. भारत-पाक मॅचच्या दिवशी मुंबईच काय पण बहुतेक शहरांतील रस्ते ओस पडतील. त्यामुळे भ्रष्टाचाराचा लढा हा कळीचा सामाजिक प्रश्ान् असला तरी क्रिकेटपुढे तो फिका ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळेच हजारे यांची ३० मार्चची परळच्या नरे पार्क मैदानावरील जाहीर सभा रद्द करण्याचा निर्णय संयोजकांना घ्यावा लागला. भ्रष्टाचारावर क्रिकेटने मात केली, अशी सामाजिक संघटनात चर्चा रंगली आहे.
क्रिकेटपायी पुढे ढकलली गेलेली भष्टाचाराच्या विरोधातील जाहीर सभा आता एप्रिल रोजी सायंकाळी परळच्या नरे पार्क मैदानात होणार आहे. या सभेत ज्येष्ठ अण्णा हजारे, ज्येष्ठ माजी पोलीस अधिकारी किरण बेदी, नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेधा पाटकर, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे भालचंद कांगो, माहिती अधिकाराच्या लढ्यातील अग्रणी अरविंद केजरीवाल, स्वामी अग्निवेश आणि विविध कामगार संघटनांचे नेते या सभेस मार्गदर्शन करणार असल्याचे सांगण्यात आले.
भ्रष्टाचारी सापडले तरी त्यांना जरब बसविणारे कायदे कुठे आहेत? अस्तित्वात असलेल्या कायद्यांची अंमलबजावणी करण्याची सत्ताधारी आणि सर्वच पक्षांच्या पुढाऱ्यांमध्ये राजकीय इच्छाशक्ती नाही. बहुतेकांचे आथिर्क हितसंबंध भ्रष्टाचारात गुंतले आहेत. आता जनतेने तयार केलेला लोकपाल कायदाच हवा, असा हजारे यांचा आग्रह आहे. या लढ्यात मुंबईकरांची साथ मिळविण्यासाठी रविवारी जाहीर सभा घेण्यात आल्याचे संयोजकांनी सांगितले

No comments:

Post a Comment