Total Pageviews

1,114,663

Wednesday, 16 March 2011

अतिरेक्यांच्या भूसुरुंग स्फोटात कवठे येथील जवान शहीद

अतिरेक्यांच्या भूसुरुंग स्फोटात कवठे येथील जवान शहीद पुन्हा एकदा कवठे गावावर शोककळा पसरली असून कवठ्याचे सुपुत्र प्रवीण प्रताप डेरे (वय 27) हे आसाम बॉर्डर येथे कुकरी कालापानी येथे रात्रगस्त घालत असताना तेथील पेट्रोल पंपानजिक अतिरेक्यांनी पुरून ठेवलेल्या भूसुरूंगाच्या सहाय्याने 9 जवानांसह गाडी उडवली. त्यामध्ये कवठ्याचे जवान प्रवीण डेरे शहीद झाले. वीर जवान प्रवीणचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या कवठे येथील प्राथमिकशाळेत झाले. वयाच्या दुसऱ्या वर्षी वडिलांचे छत्र हरपले. दोन मुली प्रवीण यांच्या शिक्षणाची संसाराची धुरा आईने जिद्दीने कष्टाने सांभाळली. प्रवीणचे माध्यमिक शिक्षण सुरूर येथील श्री शिवाजी विद्यालय येथे तर 12 वी पर्यंतचे शिक्षण वाईतील किसन वीर महाविद्यालयात झाले. त्यानंतर 2005 मध्ये प्रवीणची बी. एस. एफ. मध्ये रॅंक कॉन्स्टेबल, जी. डी. या पदावर नियुक्ती झाली. सेवेची पाच वर्षे पूर्ण होताच आईने जानेवारी 2010 मध्ये प्रवीणचा विवाह काशिदवाडी, ता. फलटण येथील श्रीकांत कदम यांची सुकन्या अश्विनी हिच्याशी करून दिला. परंतु लग्नाची पूजा करताच तो पुन्हा कामाचीऑर्डर आल्याने कामावर हजर झाला. त्यानंतर 1 महिन्यानंतर रजा मिळाली. लग्नाची पूजा झाली तो कामावर हजर झाला.
31
डिसेंबर 2010 रोजी प्रवीणला कन्यारत्न झाले परंतु मुलीला अडीच महिनेही पुरते होताहेत तोच पित्याचे छत्र हरपले. प्रवीणच्या पश्चात आई, पत्नी, कन्या असा परिवार आहे. कवठे गावाला पूर्वीपासूनच देशसेवेचे वेड आहे. याच क्रांतिवीरांच्या, स्वातंत्र्य सैनिकांच्या गावात आणखी एका शहिदाची भर पडली. यापूर्वीही शहीद हिंदुराव डेरे, प्रवीण शामराव डेरे, अंबादास पवार यांनी देशसेवेत हौतात्म्य पत्करून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.
:

No comments:

Post a Comment