ब्राझीलमध्ये नुकत्याच झालेल्या ब्रिक्स परिषदेत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या अनुपस्थितीने जागतिक वर्तुळात अनेक तर्कवितर्क सुरू झाले आहेत. गेल्या दशकभरात जिनपिंग यांनी ब्रिक्स परिषदेला कधीही दांडी मारली नव्हती. त्यामुळे यंदा त्यांच्याऐवजी पंतप्रधान ली कियांग यांच्या उपस्थितीने चीनमध्ये नक्की काय चालले आहे, हा प्रश्न जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. यामागे दोन प्रमुख शक्यता वर्तवण्यात येत आहेत. काही वृत्तसंस्थांच्या मते, जिनपिंग सत्तेचे हस्तांतरण करण्याच्या तयारीत आहेत, तर अंतर्गत सूत्रांनुसार, त्यांना सत्तेपासून पद्धतशीरपणे दूर करण्यासाठी 'पॉलिट ब्युरो'मध्ये हालचालींना वेग आला आहे. मात्र, चीनच्या अभेद्य भिंतीआड नेमके काय शिजत आहे, याची नेमकी माहिती अद्याप कोणालाही नाही. त्यामुळे दोन्ही शक्यतांचा विचार करणे महत्त्वाचे ठरते.
जिनपिंग यांच्या निवृत्तीची चर्चा
शी जिनपिंग गेल्या १३ वर्षांपासून चीनच्या अध्यक्षपदावर कायम आहेत.
जिनपिंग यांच्या विरोधात अंतर्गत गटबाजी?
याउलट, 'सीसीपी'मध्ये सर्व काही आलबेल नसून, जिनपिंग यांच्या विचारधारेतील ताठरपणा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील अतिहस्तक्षेपामुळे 'सीसीपी'मध्ये नाराजी आहे. यापूर्वी जिनपिंग यांनी भ्रष्टाचार निर्मूलन मोहीम राबवून अनेक सरकारी मंत्री आणि लष्करातील उच्चपदस्थांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. आर्थिक पातळीवरही चीनमध्ये समस्या आहेत. गडगडलेले रिअल इस्टेट क्षेत्र, वाढती महागाई आणि अमेरिकेशी व्यापारयुद्धातून ताणले गेलेले संबंध यांसाठी जिनपिंग यांची एककल्ली धोरणेच जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या आर्थिक संकटातून चीनला बाहेर काढू शकेल, अशा सर्वसमावेशक नेत्याची गरज 'सीसीपी'ला वाटत आहे.
याचदरम्यान, चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष हू जिंताओ यांच्या 'पॉलिट ब्युरो'मधील समर्थकांनीही दबक्या आवाजात जिनपिंग यांच्या एकाधिकारशाहीला आव्हान देण्यास सुरुवात केली आहे. तसेच, चीनच्या 'पिपल्स लिबरेशन आर्मी' (पीएलए) चे उपप्रमुख जनरल झांग युक्सिया, जे एकेकाळी जिनपिंग यांचे निकटवर्तीय मानले जात होते, त्यांच्या हातात आता लष्करी शक्ती एकवटली आहे. यामुळे 'सीसीपी'ची चिंता वाढली आहे. एकीकडे आर्थिक प्रगती आणि त्याचबरोबर लष्करी सामर्थ्य, असे चीनचे दुहेरी सशक्तीकरण व्हावे, यासाठी 'सीसीपी' प्रयत्नशील दिसते. म्हणूनच विद्यमान पंतप्रधान ली कियांग किंवा माजी उपाध्यक्ष असलेले वांग यी यांच्याकडे जिनपिंग यांचे उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे ही जिनपिंग यांचीच नवीन खेळी आहे की जिनपिंग यांचाच 'खेला' होतोय
No comments:
Post a Comment