Total Pageviews

Saturday, 4 May 2013

SARABJIT SINGH KILLED IN PAKISTAN

सरबजितची हत्या आणी पाकिस्तानी/विदेशी तुरुंगांतिल ६,५६९ भारतीयचे मानविय हक्क
पाकिस्तानमधील तुरुंगात आपली अर्धीअधिक हयात खितपत पडलेल्या आणि तुरुंगात सडत असताना पाकिस्तानी कैद्यांच्या सूडाच्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या सरबजितने अखेर वैद्यकीय उपचारांना दाद देता बुधवारी मध्यरात्रीनंतर प्राण सोडले. आता त्याच्या मृत्युनंतर सरकारला आणि अनेक नेत्यांना त्याचा पुळका जरी आलेला असला, तरी सरबजित तेथे तुरुंगात खितपत पडलेला असताना शाब्दिक दिलाशांपलीकडे भारत सरकारकडून पाकिस्तानवर आवश्यक दबाव कधीच निर्माण केला गेला नाही. अफझल गुरू आणि कसाबला सुळावर चढवले गेल्यानंतर सरबजितला इतर कैद्यांकडून मिळालेल्या धमक्या लक्षात घेता, त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यासाठी जरी भारत सरकारने दबाव टाकला असता, तरी आजची ही वेळ आली नसती.
पाकिस्तानी कैद्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या सरबजीत सिंग याचा मृतदेह भारताकडे सोपवण्यात आला .त्याच्या शरीरातून हृदय आणि किडनी काढण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. भारतात सरबजीतचे पुन्हा शवविच्छेदन करण्यात आले तेव्हा ही बाब स्पष्ट झाली. सरबजीतच्या मृत्यूनंतर विश्वासघातकी पाकिस्तानविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे.सरबजीतच्या शरीरावर अनेक गंभीर जखमा होत्या.जगातील कोणता महत्वाचा आंतरराष्ट्रीय प्रश्न नुसत्या चर्चेने कायमस्वरूपी सुटलाय का, यावरच विचारमंथन करण्याची वेळ आलेली आहे. प्रत्यक्ष युद्धात लढण्याचा अनुभव किंवा तसा प्राणत्याग करण्याला जी प्रगल्भता लागते, प्रखर राष्ट्रप्रेम लागते ते आजच्या भारतातील किती राजकीय लोकांना आहे? इतरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वत: सुरक्षिततेत धन्यता मानणारेच दिसतात सगळीकडे दिसतात.
सरकारचे निष्फळ शाब्दिक इशारेपंतप्रधान आता ज्यालाभारताचा शूर सुपुत्र म्हणत आहेत, त्या सरबजितची भारत सरकारकडून सदैव उपेक्षाच झाली. सरबजितला सोडण्याचे नैतिक कर्तव्य भारत सरकारचे होते. निष्फळ शाब्दिक इशार्‍यांपलीकडे भारत सरकारने काहीही केले नाही . गेली दोन दशके त्याच्या कुटुंबियांनी सरकारचे पाठबळ नसताना आणि आपली आर्थिक ऐपत नसतानाही त्याच्या सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्न केले. मध्येच एकदा सरबजितला माफी बहाल झाली आहे आणि त्याची सुटका होणार अशा बातम्या आल्या. पण पाठोपाठ दुसरी वार्ता थडकली की सुटका होणार तो सरबजित नव्हे, तर सुरजित नावाचा दुसराच कैदी आहे. इतकी क्रूर थट्टा होऊनही सरबजितच्या कुटुंबियांचे प्रयत्न सुरूच होते. पाकिस्तान सरकारने सरबजितच्या बाबतीत जो काही खेळ मांडला होता तो तर माणुसकीला काळीमा फासणाराच होता.
आजच्या घडीला ६७ देशांमधील तुरुंगांमध्ये एकूण ,५६९ भारतीय डांबले गेले आहे. सगळ्यात जास्त भारतीय कैदी आखाती देशांत तुरुंगांमध्ये कैद आहे. यामध्ये सौदी अरेबिया (१६९१), कुवैत (११६१) संयुक्त अरब अमिराती (१०१२),बांग्लादेश - ६२, अफगाणिस्तान - २८, बहारिन - १८, आणी पाकिस्तान ५३५ (४८३ कोळी) यांचा समावेश आहे. १९७१च्या लढाई नन्तर आपण ९४,००० पाकिस्तानी सैनिक सोडुन दिले पण आजपण ५४ भारतिय सैनिक पाकिस्तानी तुरुंगांमध्ये आहेत. हे गेल्या ४२ वर्षात पहिल्यादा सन्चार मन्त्रि मनीष तिवारी यानी टिव्हि वाहिन्यावर सान्गितले. देशाची अस्मिता तो देश आपले ६,५६९ नागरिक जे विदेशी तुरुंगांत आहेत त्यान्चे रक्षण कसे करतो यावर ठरावयाला पाहिजे. सरबजित सिंग याची मिळेल त्या मार्गाने त्याच्या सुटकेचे प्रयत्न करणे हे देश म्हणून आपले कर्तव्य होते. ते आपण पार पाडण्यात कुचराई केली.
विद्वेषपूर्ण मनोवृत्ती पाकिस्तान सरकार नेहमिच दाखवीत आले आहे. काल सरबजितच्या कुटुंबियांना राहुल गांधी भेटले , त्यांना विमानतळापर्यंत सोडायला गेले , राहुल गांधींना यातही राजकारण दिसत असावे. शिखविरोधी दंग्यांतील आरोपी सज्जनकुमार यांची सुटका झाल्याने शीख समुदायामध्ये जी तीव्र नाराजी आहे, दिल्लीत कॉंग्रेसविरोधी निदर्शनांद्वारे व्यक्त होत आहे.म्हणून सरबजितच्या कुटुंबियांच्या पुढे पुढे करण्याचा हा प्रकार त्यांनी केला आहे. पाकिस्तानी मानवाधिकार कार्यकर्ते अन्सार बर्नी यांना सरबजितच्या सुटकेच्या प्रयत्नांसाठी काही कोटी रुपये हवे होते असे सरबजितच्या कुटुंबियांनी सान्गितले. स्वतःच्या सार्वभौमत्वाचा टेंभा मिरवणार्‍या परंतु आपल्या एका नागरिकाचे प्राणही वाचवू शकणार्‍या आपल्या देशाचे निष्क्रीय नेतृत्वही या प्रकरणात जगासमोर आले. पाकिस्तानचा हिंस्त्र चेहरा अनेक माध्यमांतून उजेडात येत असतो. मुंबईवर दहशतवादी हल्ला घडला, आपण शाब्दिक इशारे दिले. सीमेवर आपल्या जवानांच्या शिरच्छेदाचे हीन कृत्य घडले. आपण शाब्दिक इशार्‍यांपलीकडे काही केले नाही. सरबजितच्या हत्यारांना त्यांच्या कृत्याची सजा तरी भारत सरकार द्यायला लावू शकेल काय?भारतीय कैद्याच्या सुटकेकरता सर्वपक्षीय एकजुट महत्वाचीश्रद्धांजली वाहणे हे एक आपले खास वैशिष्टय़ आहे. आपण oद्धांजली वाहण्यात अत्यंत उत्साहाने आघाडीवर असतो. ज्याला श्रद्धांजली वाहिली जाते ती व्यक्ती जिवंत असताना पूर्ण दुर्लक्षित केली गेली असेल. पण तिच्या निधनानंतर मात्र त्या व्यक्तीचे गुणगान आपल्याकडे अहमहमिकेने केले जाते.पंतप्रधान सिंग यांना सरबजितविषयी इतकाच जर आदर आणि प्रेम होते तर त्याच्या सुटकेसाठी सरकारने किती प्रयत्न केले. सरबजितच्या निधनानंतर संसद वा अन्यत्रही सर्वपक्षीय दु:ख व्यक्त केले जात आहे. परंतु हे सर्वपक्षीय सरबजितची सुटका व्हावी यासाठी कधीही एकजुटीने उभे राहिले नाहीत.
सरबजितच्या निधनामागे पाकिस्तानी कैदी,पाकिस्तान सरकार आणि अल् काईदा, तालिबान आदी कट्टर अतिरेकी इस्लामी संघटना होत्या.सरबजितवर हल्ला करणारे मुदस्सर आणि आफताब नावाचे दोन कैदी हे लष्कर--तय्यबा या संघटनेशी संबंधित होते, पाकिस्तानची कृती निंदनीय असल्याची प्रतिक्रिया सरकारच्या वतीने व्यक्त केली आहे. ती अगदीच पोकळ आहे. एखाद्या कृतीबद्दल पाकिस्तानचे आभार मानावेत अशी घटना गेल्या ६५ वर्षांत एक तरी दाखवता येईल काय? याउलट भारतीय तुरुंगात २० वर्षे खितपत पडलेले खलिल चिस्ती यांची आपण गेल्या वर्षी न्यायालयाच्या आदेशानंतर सुटका केली आणि मायदेशी जाऊ दिले.पाकिस्तानने किमान माणुसकी दाखवण्यास हरकत नव्हती. परंतु तेवढेही पाकिस्तानला करता आले नाही.
नेभळटांचे मैत्री प्रस्ताव ही शरणागती सरबजितच्या सुटकेचे प्रयत्न मिळेल त्या मार्गाने करणे हे देश म्हणून आपले कर्तव्य होते. ते आपण पार पाडण्यात कुचराई केली. याचे कारण पाकिस्तानला कोणत्या प्रकारे हाताळायचे याबाबत आपले धोरणच स्पष्ट नाही. पाकिस्तानी प्रश्न फक्त चर्चेनेच सुटेल असे सांगणाऱ्या भंपक विद्वानाची संख्या आपल्या देशात मोठी असल्याने या प्रश्नावर जनमत तयार झालेले नव्हते.पण आता मात्र अनेक वर्तमान पत्रे आणी टीव्ही चनेलनी केलेल्या पहाण्यामध्ये ९९ % भारतियाना आपले पाकिस्तान धोरण पुर्णपणे चुकिचे वाटते आहे.पाकिस्तान भारताबाबत कायम स्वच्छ भूमिका घेऊन आहे. भारत हा आपला मित्र नाही असे पाकिस्तानने नेहमिच दाखवून दिलेले आहे.
पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे करणे हे आपले कर्तव्य असले तरी मैत्रीचा हात पुढे करणाऱ्या मनगटात ताकद असली तरच त्या मैत्रीच्या प्रस्तावाचा आदर केला जातो. नेभळटांचे मैत्री प्रस्ताव ही शरणागती असते. पाकिस्तानच्या बाबत आपण अशीच शरणागती दाखवत आलो आहोत.पाकिस्तानसारखा देश कधीही उठतो भारतात हिन्साचार करतो. आम्हीशांती संयम याची कास धरून पाकचा फक्त धिक्कार करतो. हे आणखी किती काळ चालणार? पाकिस्तान हे गुंड, झुंड दहशतवादी राष्ट्र आहे. त्याला धडा शिकवयाला हवा, पण राज्यकर्त्यांच्या दुबळ्या मनगटात तेवढी हिंमत आज उरली आहे काय?

No comments:

Post a Comment