Total Pageviews

Monday 20 May 2013

ओवेसीची गरळ!samna agrlekh

शिवसेनाप्रमुखांनीच एकदा सांगितले होते की, मुस्लिमांचा मतदानाचा अधिकार काढून घ्यावा. तसा तो काढून घेतला तर त्यांची राजकीय सौदेबाजी व व्होट बँकेचे तसेच दबावाचे राजकारण एकदाचे थांबेल.
ओवेसीची गरळ!
...तर मुसलमानांचा मताधिकार काढा!
हिंदुस्थानातील मुसलमानांचे नवे ‘मसिहा’ असाउद्दीन ओवेसी याने त्यांच्या जातभाईंना पुन्हा राजकीय मैदानात उतरवले आहे. ‘रिझर्व्हेशन नही तो वोट नही’, अशी बांग त्यांनी हिंदूंच्या संभाजीनगरात आणि मुसलमानांच्या ‘औरंगाबादे’त ठोकली आहे. संभाजीनगरात येऊन ओवेसीने दुष्काळावर वगैरे मतप्रदर्शन केले, पण ओवेसीच्या तोंडी राज्याचे व जनतेचे प्रश्‍न येणे हा विनोदच ठरतो. ओवेसी म्हणजे हिरवा नाग. त्याने त्याचा धर्म सोडून कसे चालेल? आपल्या स्वधर्मास जागून त्याने जे फूत्कार सोडले ते विचार करण्यासारखे आहेत. महाराष्ट्रातील मुस्लिमांची अवस्था दयनीय असल्याबद्दल ओवेसीने अश्रू ढाळले आहेत. राज्यातील मुस्लिमांची ही दूरवस्था कॉंग्रेस-राष्ट्रवादीमुळेच झाली असल्याची बोंबदेखील त्याने ठोकली आहे. मात्र त्याचवेळी राज्यातील मुस्लिमांनो, नोकर्‍यांत आरक्षण मिळाल्याशिवाय शांत बसू नका. आरक्षण मिळाले नाही तर मतदानावर बहिष्कार टाका, अशी गरळ या महाशयांनी आता ओकली आहे. हे सर्व वाचल्यावर आम्हाला प्रश्‍न पडला की, हैदराबादच्या ओवेसीना मुसलमानांचे जीना व्हायचे आहे की डॉ. आंबेडकर व्हायचे आहे? अर्थात यापैकी काहीएक व्हायची या ओवेसीची पात्रता नाही. जीनांप्रमाणेच ओवेसीच्या मनात व नसानसांत हिंदुद्वेष ठासून भरला आहे. ओवेसी बंधूंनी तर पंचवीस कोटी मुसलमानांच्या जोरावर शंभर कोटी हिंदूंची कत्तल करण्याचा संकल्प सोडला आहे. त्याचा मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलिमीन अर्थात ‘एमआयएम’ हा पक्ष म्हणजे आपल्या देशातील मुसलमानी तरुणांसाठी दुसरे ‘अल कायदा’च बनले आहे. मुसलमानी तरुणांना अधिकाधिक
धर्मांध व माथेफिरू बनविण्याचे काम ‘एमआयएम’ करीत आहे. हा आपल्या देशासाठी मोठाच धोका निर्माण झाला आहे. जीना याने मुसलमानांची डोकी भडकवून पाकिस्तान निर्माण केले व त्या पाकिस्तानचा तो निर्माता बनला. अर्थात हाच पाकिस्तान तेथील मुसलमानांसाठी सध्या ‘नरक’ बनला आहे. साठ वर्षांनंतरही तेथील जनता नरकातून बाहेर पडू शकलेली नाही. पाकिस्तान नावाचा एक नरक अस्तित्वात असताना हिंदुस्थानातील पंचवीस कोटी मुसलमानांच्या जोरावर ओवेसीसारखे लोक हिंदुस्थानचा नरक बनविण्याचे स्वप्न पाहात आहेत व तशी योजना आखत आहेत. पण या देशातील हिंदूंनी हाती बांगड्या भरल्या नाहीत. महाराष्ट्राच्या मुळावर आलेल्या पापी औरंगजेबाची कबर ओवेसीछाप धर्मांध पुढार्‍यांनी एकदा नीट पाहून घ्यावी व मगच हिंदूंच्या वाटेस जावे. ओवेसी यास ज्याप्रमाणे जीना होता येणार नाही, त्याप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरही बनता येणार नाही. डॉ. आंबेडकरांच्या नखाचीही सर या ओवेसीला येणार नाही. वर्षानुवर्षे, पिढ्यान्पिढ्या उपेक्षित राहिलेल्या व खितपत पडलेल्या पददलितांच्या मनात स्वाभिमानाचा अंकुर फुलविण्याचे काम डॉ. आंबेडकरांनी केले. पददलितांना गुलामीतून बाहेर काढण्याचे कार्य डॉ. आंबेडकरांनी केले व त्यासाठी ‘शिका आणि संघर्ष करा’ हा मंत्र त्यांनी आपल्या बांधवांना दिला. डॉ. आंबेडकरांनी राखीव जागांची संकल्पना मांडली ती सामाजिक भान ठेवून. त्यामागे त्यांचे राजकारण किंवा मतबँकेचे धोरण नव्हते. राखीव जागांचा पांगुळगाडा दहा वर्षांनंतर फेकून द्या, ही त्यांची सूचना होती. त्याचे पालन नंतर झाले नाही हा भाग वेगळा, पण हे ओवेसी महाशय आता मुसलमानांसाठी कोणत्या मुद्यावर ‘आरक्षण’ मागत आहेत? सच्चरपासून मच्छरपर्यंत मुसलमानांवर फक्त सवलती व पैशांचाच पाऊस कॉंग्रेजी राज्यकर्ते पाडत आहेत. लोकसंख्येच्या बळावर राज्यकर्त्यांना झुकवून हवे ते पदरात पाडून घेण्यात मुसलमान आघाडीवर आहेत. लोकसंख्येच्या जोरावर मुसलमानांनी एकदा देशाची फाळणी करून पाकिस्तान पदरात पाडून घेतला. आता त्याच लोकसंख्येच्या जोरावर त्यांना हिंदुस्थानचेच पाकिस्तान करण्याचे स्वप्न पडू लागले आहे. मुसलमानांची जन्मभूमी व कर्मभूमी येथेच असली तरी त्यांना पाकिस्तान प्रेमाच्या उचक्या लागत असतात व हाच खरा धोका आहे. या ओवेसीने आपल्या समाजासाठी काय केले? मुसलमानांचे राहणीमान व सामाजिक दर्जा खरेच सुधारायचा असेल तर त्यांनी कुटुंब नियोजन करायला हवे. स्वत:च्या लोकसंख्येवर नियंत्रण मिळवायला हवे. मुसलमानांच्या हम पाच हमारे पचीसमुळे प्रत्येकाच्या घरात एक ‘गाव’च वसलेले असते. त्यामुळे यांना
‘आरक्षण’ का व कशासाठी द्यायचे? ते हिंदुस्थानचा कायदा न पाळता ‘शरियत’ पाळतात. वास्तविक जे आमचा कायदा पाळत नाहीत त्यांना कोणत्याही सरकारी योजना व सवलतींचा लाभ मिळू देऊ नये. डॉ. आंबेडकरांप्रमाणे ओवेसीने मुसलमानांना ‘शिका, संघर्ष करा व वंदे मातरम् म्हणा’ असा नारा दिला असता तर त्यांचे स्वागत झाले असते. महाराष्ट्रातील १ कोटी २७ लाख मुस्लिमांना आरक्षण मिळालेच पाहिजे अशी गर्जना या ओवेसीने केली आहे. म्हणजे महाराष्ट्रातील मुसलमानी मतांचा आकडा यानिमित्ताने जाहीर करून हा ‘आकडा’ कुणास हवा असेल तर मागण्या मान्य करा, अशी ‘ऑफर’ ओवेसीने दिली आहे. आरक्षण नाही तर मतदान नाही या असाउद्दीन ओवेसीच्या भूमिकेवर आम्ही काय बोलणार? सरकारने आरक्षण अजिबात देऊ नये व मुसलमानांनी मतदान करू नये. हे एकदा व्हायलाच हवे. किंबहुना शिवसेनाप्रमुखांनीच एकदा सांगितले होते की, मुस्लिमांचा मतदानाचा अधिकार काढून घ्यावा. तसा तो काढून घेतला तर त्यांची राजकीय सौदेबाजी व व्होट बँकेचे तसेच दबावाचे राजकारण एकदाचे थांबेल असेच आम्हाला वाटते. ओवेसीने जीना व डॉ. आंबेडकर बनण्याचा प्रयत्न चालवला आहे. ती एकप्रकारे सौदेबाजीच आहे. मुसलमानांसाठी आणखी एक ‘नरक’ निर्माण करणारा ओवेसी स्वत:च्या स्वार्थापलीकडे दुसरे काहीच पाहात नाही. ‘आरक्षण’ म्हणजे या देशातील एक शिवी झाली आहे. या शिवीचा जे तिटकारा करतील तेच देशाचे सच्चे पाईक. बाकी सगळे ढोंगी आहेत.

No comments:

Post a Comment