ममतांच्या राज्यात हिंदू संकटात
evivek अज्ञात व्यक्तींनी एका मौलवीची हत्या केल्याच्या घटनेचे निमित्त करून दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील कॅनिंग भागात आणि नजिकच्या अनेक हिंदूबहुल भागात या दंगली योजनापूर्वक घडवण्यात आल्या. येथील कित्येक निष्पाप हिंदूंना धर्मांध मुसलमानांच्या अनन्वित छळाला सामोरे जावे लागले. मुस्लीम जमावाने हिंदूंची घरे जाळली, दुकाने लुटली, लोकांना मारझोड केली, गावातील स्त्रियांवर आणि मुलींवर अत्याचार केले. दुर्दैव असे की पोलीस, सुरक्षा पथके, प्रशासन कोणीच हा उच्छाद थांबवू शकले नाही. प.बंगालमध्ये मुस्लीम वर्गाचा अतिरेकीपणा दिवसेंदिवस वाढत आहे. याला कारण म्हणजे ममता बॅनर्जी यांच्या सरकारचे तुष्टीकरणाचे धोरण. याला बॅनर्जी जरी ‘सेक्युलॅरिझम’ म्हणत असल्या तरी त्यामागचा त्यांचा स्वार्थ सर्वांनाच माहीत आहे.देशाच्या विविध भागांतून सध्या नवरझाकारांची फौज उदयास येत असल्याचे दिसत आहे. निजामाच्या काळात ज्याप्रमाणे तत्कालीन हिंदुद्वेष्टया रझाकारांनी हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले, त्याप्रमाणे हे धर्मांध मुस्लिमांचे गट येथील हिंदूंना त्रस्त करून सोडताना दिसतात. देशातील कोटयवधी हिंदू हे आपले शत्रू आहेत, त्यांना नष्ट केले पाहिजे, असे यांचे तत्त्वज्ञान आहे. मग त्यासाठी काहीतरी कारणे काढून धार्मिक दंगली घडवायच्या आणि हिंदू नागरिकांवर हल्ले करायचे. आंध्र प्रदेशातील हैद्राबाद किंवा महाराष्ट्रातील मालेगाव अशा मुस्लीमबहुल भागात असे प्रकार सातत्याने पाहायला मिळतात. नुकतेच पश्चिम बंगालमध्येही धर्मांध मुसलमानांनी असाच उच्छाद मांडला आणि त्यात हिंदू नागरिकांचे अतोनात नुकसान झाले.
अज्ञात व्यक्तींनी एका मौलवीची हत्या केल्याच्या घटनेचे निमित्त करून दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील कॅनिंग भागात आणि नजिकच्या अनेक हिंदूबहुल भागात या दंगली योजनापूर्वक घडवण्यात आल्या. येथील कित्येक निष्पाप हिंदूंना धर्मांध मुसलमानांच्या अनन्वित छळाला सामोरे जावे लागले. मुस्लीम जमावाने हिंदूंची घरे जाळली, दुकाने लुटली, लोकांना मारझोड केली, गावातील स्त्रियांवर आणि मुलींवर अत्याचार केले. दुर्दैव असे की पोलीस, सुरक्षा पथके, प्रशासन कोणीच हा उच्छाद थांबवू शकले नाही.
या दंगलीला कारणीभूत ठरलेली घटना नेमकी काय होती? 19 फेब्रुवारी रोजी कॅनिंग-1 ब्लॉकमधील नलिआखली या हिंदूबहुल गावात हा प्रकार घडला. रुहूल कुड्डूस नामक 49 वर्षीय मौलवी, जो पार्क सर्कस भागातील मशिदीचा इमाम होता, तो सोमवारी 18 फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा मोटारसायकलवरून जमताला येथील धार्मिक जलशावरून आपल्या गावी, बसंतीला परतत होता. त्याच्या सोबत त्याचा एक मित्र सिराजूल मोल्ला (45) होता. नलिआखली हमरस्त्यावर काही अज्ञात दरोडेखोरांनी त्यांना अडवले आणि त्यांच्यावर गोळया झाडल्या. त्यात तो इमाम जागीच ठार झाला, तर सिराजूल जबर जखमी झाला
सुदैवाने विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते, अन्य काही सामाजिक कार्यकर्ते आणि काही स्थानिक राजकीय नेते यांनी दंगलग्रस्त भागातील हिंदूंसाठी मदतकार्य सुरू केले. ममता बॅनर्जी यांच्या सरकारला जाग यायला मात्र खूप उशीर झाला. सदर गंभीर प्रकरणातही त्यांनी आपल्या असंवेदनशील वृत्तीचे प्रदर्शन केले. कॅनिंगमधील परिस्थिती चिघळल्याचे बघून ममता बॅनर्जी यांनी आपल्या पक्षाचे प्रतिनिधी मंडळ दंगलग्रस्त भागात पाठवले. मात्र या प्रतिनिधी मंडळातील सदस्यांची यादी पाहिली तर हे मंडळ परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गेले होते की मुस्लीम दंगलखोरांना पाठीशी घालण्यासाठी गेले होते, असा संशय यावा. फिराद हकीम (नागरी विकास आणि नगरपालिका कामकाज मंत्री), मोहम्मद सुफी (जलवाहतूक मंत्री), जिआसुद्दीन मोल्ला (अल्पसंख्याक मंत्री), जावेद खान (आपत्ती निवारण मंत्री), हैदर अझीझ (सहकार मंत्री) आणि अबू ताहेर (कार्याध्यक्ष, नागरी प्रकरण, द. 24 परगणा जिल्हा परिषद) या मुस्लीम नेत्यांचा या प्रतिनिधी मंडळात समावेश होता. त्यामुळे या प्रतिनिधी मंडळाने बेघर झालेल्या, आपले सर्वस्व गमावलेल्या हिंदू दंगलग्रस्तांच्या दु:खावर काय मलमपट्टी केली असेल? हा प्रश्नच आहे.प.बंगालमध्ये मुस्लीम वर्गाचा अतिरेकीपणा दिवसेंदिवस वाढत आहे. याला कारण म्हणजे ममता बॅनर्जी यांच्या सरकारचे तुष्टीकरणाचे धोरण. याला बॅनर्जी जरी ‘सेक्युलॅरिझम’ म्हणत असल्या तरी त्यामागचा त्यांचा स्वार्थ सर्वांनाच माहीत आहे. मतांच्या लोभाने मुस्लीम जनतेवर आश्वासनांचा पाऊस पाडणे, मुस्लीम नेत्यांना पाठीशी घालणे, कधी ईदच्या नमाजात किंवा इफ्तारच्या पाटर्यांमधून जाणीवपूर्वक झळकणे अशा मार्गाने मुख्यमंत्री मुस्लीम जनतेप्रती आपली ममता वारंवार दाखवतात. इतकेच नव्हे, तर त्यांच्या मंत्रीमंडळातही मुस्लीम नावांचाच भरणा दिसतो. म्हणूनच त्यांच्या टीएमसी (तृणमूल काँग्रेस) पक्षाला टीकाकार ‘टोटल मुस्लीम काँग्रेस’ असे म्हणतात. याच ममताबाई महिनाभरापूर्वी कॅनिंगमध्ये झालेल्या रॅलीमध्ये गुजरात दंगलीवरून फूत्कार टाकत होत्या. "गुजरातचे उदाहरण मला देऊ नका. गुजरातमध्ये दंगली होतात, आमच्याकडे नाही" अशी शेरेबाजी करत होत्या. त्यांची ही बढाई किती फोल होती, याचा या घटनाक्रमानंतर ममताबाईंना प्रत्यय आला असेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाहीसंदर्भ : http://hinduexistence.org व इंटरनेटवर प्रसिध्द झालेली अन्य वृत्ते.)
No comments:
Post a Comment