यूपीए
सरकारच्या लाळघोटेपणाचा कळस-जवानांचा शिरच्छेद वेशीवर टांगून पाक पंतप्रधानांचे जंगी स्वागत!-- दालबाटी, चुरमा.. लाल मांसची शाही दावत- हॉटेल, अजमेरात दर्ग्याबाहेर संतप्त निदर्शने
नवी दिल्ली, दि. ९ (वृत्तसंस्था) - मुस्लिम मतांच्या लाचारीपोटी यूपीए सरकारच्या लाळघोटेपणाने आज कळस गाठला. जवानांचा शिरच्छेद वेशीवर टांगून पाक पंतप्रधान राजा परवेझ अश्रफ यांच्यासाठी हिरव्या पायघड्या घालण्यात आल्या. एवढेच नाही तर हत्ती, उंट नाचवून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. हिंदुस्थानचे परराष्ट्र व्यवहारमंत्री सलमान खुर्शीद यांनी अश्रफ यांना बिर्याणी, मटण पुलावची शाही दावत दिली. भरपेट पाहुणचार घेतल्यानंतर कुटुंबकबिल्यासह अश्रफ यांनी अजमेरच्या दर्ग्यावर जियारत केली. यावेळी ‘शहीद जवानांचे शिर वापस करा’ अशा गगनभेदी घोषणा दर्ग्याच्या परिसरात घुमल्या. पाकिस्तानचे पंतप्रधान राजा परवेझ अश्रफ यांचे आज दुपारी १२ वाजता जयपूरच्या सांगानेर विमानतळावर खास विमानाने आगमन झाले. यावेळी हिंदुस्थान सरकारच्या वतीने परराष्ट्र व्यवहारमंत्री सलमान खुर्शीद यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर अश्रफ आणि त्यांच्यासोबत आलेला फौजफाटा पंचतारांकित हॉटेल रामबाग पॅलेसकडे रवाना झाला. आत जेवण, बाहेर निदर्शने
रामबाग पॅलेस येथे राजा परवेझ अश्रफ व त्यांचा कुटुंबकबिला बिर्याणी ओरपत असताना बाहेर पाकिस्तानच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात येत होती. कर्णी सेनेच्या कार्यकर्त्यांनी अश्रफ यांच्या विरोधातही घोषणा दिल्या. अशरफ यांची खातिरदारी म्हणजे शिरच्छेद करण्यात आलेल्या जवानांचा अपमानच असल्याची संतप्त प्रतिक्रिया या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. राजा अश्रफ यांच्याविरोधात आंदोलन करणार्या वकिलांना पांगवण्यासाठी पोलिसांनी फव्वारा सर्कल भागात बळाचा वापर केला. या आंदोलनामुळे घुघरा हेलिपॅडकडे जाण्यासाठी पाकिस्तानी पंतप्रधानांना आपला परतीचा मार्ग बदलणे भाग पडले.रस्ते धुऊन काढले
अजमेरात दर्ग्यापर्यंत जाण्यासाठी अतिशय चिंचोळे रस्ते आहेत. ज्या ज्या रस्त्यावरून राजा परवेझ अश्रफ यांचा काफिला गेला त्या रस्त्यांवर काळे झेंडे लावण्यात आले होते. हिंदुस्थानी जवानांचा शिरच्छेद करणार्या राष्ट्राचे पंतप्रधान ज्या ज्या रस्त्यांनी गेले, त्यांची नापाक पावले या पवित्र भूमीवर पडली ते रस्ते व्यापार्यांनी नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन काढण्याचे ऐलान केले.
‘अतिथींचा सत्कार करणे ही आमची संस्कृती आहे. त्यानुसारच पाकचे पंतप्रधान राजा परवेझ अश्रफ यांच्यासाठी शाही दावत ठेवण्यात आली होती. त्यांच्याशी केवळ जियारतवरच चर्चा झाली. राजकीय व दहशतवादाच्या मुद्यावर आम्ही एक शब्दही बोललो नाही.’ - सलमान खुर्शीद, परराष्ट्र व्यवहारमंत्री
दहशतवादावर गप्प, ख्वाजाची इच्छा म्हणून आले
मेजवानीचा आस्वाद घेतल्यानंतर राजा परवेझ अश्रफ व सलमान खुर्शीद हे माध्यमांसमोर आले. यावेळी खुर्शीद यांनी ‘ख्वाजांची इच्छा असल्यामुळेच आपण येथे आलात’ अशा शब्दांत अश्रफ यांचे स्वागत केले. दहशतवाद तसेच इतर कोणत्याही विषयावर आमच्यात चर्चा झाली नाही, आम्ही बोललो ते फक्त जियारतवर असे खुर्शीद यांनी सांगितलेमोगलांचे राज्य कुणाला हवे?-जपानच्या मार्गाने देश वाचवा!हिंदुस्थानात मुसलमानांच्या प्रश्नांनी अक्राळविक्राळ स्वरूप धारण केले आहे. दहशतवादापासून ते राजकारणापर्यंत मुसलमानांचा प्रभाव आहे. मोगलांचे जुलमी राज्य जणू पुन्हा येऊ घातले आहे. मुसलमानांचा प्रश्न चीन व जपानसारख्या राष्ट्रांनी कसा सोडवला, ते जरा पहा!
सारा देश गुंतागुंतीच्या मार्गावरून कसा प्रवास करीत आहे ते चित्र सध्या दिल्लीत दिसत आहे. पाकिस्तानातील अराजकता व हिंसाचार दिसत आहे. हिंदुस्थान आतून खदखदतो आहे. कधीही मोठा स्फोट होईल अशी भीती आता सगळ्यांनाच वाटते. धर्मांध मुस्लिम संघटना, मुस्लिमांच्या लांगूलचालनाचे राजकारण करणारे राजकीय पक्ष व थेट पाकिस्तानसारख्या राष्ट्रांतून आपल्याकडे नियंत्रित होणारा दहशतवाद. यामुळे हिंदुस्थानची अवस्था वाळवीने पोखरलेल्या पुरातन वाड्यासारखी झाली आहे. गृहखात्यातील एक वरिष्ठ अधिकारी भेटले. त्यांनी सांगितले, ‘‘परिस्थिती गंभीर आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, उत्तर प्रदेश व बिहारात निवडणुकांच्या आधी जातीय दंग्यांची ठिणगी पडू शकते. सर्व सिद्धता झाली आहे. पण सरकार तरी काय करणार?’’ हिंदुस्थान धुमसणार्या राखेच्या ढिगार्यावर बसला आहे व धर्मांध मुसलमानांच्या संघटना हातात पलिते घेऊन देश पेटवायला निघाल्या आहेत. प्रत्येकाला आपले राजकारण करायचे आहे. निवडून यायचे आहे. त्यामुळे मुसलमानांच्या धर्मांध राजकारणाचे निखारे त्यांना बर्फाच्या गोळ्यासारखे वाटू लागले आहेत. हे चित्र भयंकर आहे.राज्य कोणाचे?मोगलांचे राज्य दिल्लीवर सुरू होतेच. आज मोगलांचे राज्य संपूर्ण भारतवर्षात येऊ पाहत आहे. आणि ते लहानसहान गोष्टींतून दिसत आहे. उत्तर प्रदेशात सरकार कोणाचेही असले तरी तेथे फक्त गुंडाराज सुरू असते. ‘टांडा’ जिल्ह्यात डीवायएसपी झिया उल हक यांची ड्युटीवर असताना गोळ्या घालून हत्या झाली. यामुळे मोठीच खळबळ उडाली. उत्तर प्रदेशात सध्या ‘यादवां’चे समाजवादी राज्य आहे. मायावतींच्या बसपाने झिया उल हक यांच्या हत्येमुळे संसद बंद पाडली व संसदेने त्यांना श्रद्धांजली वाहावी अशी मागणी केली. झिया उल हक यांची हत्या दुर्दैवीच म्हणावी लागेल. त्याच दिवशी व नंतर उत्तर प्रदेशात सरपंच, व्यापारी व डॉक्टरांच्या मिळून १४ हत्या झाल्या. पण झिया उल हक यांच्या निमित्ताने उत्तर प्रदेशातील मुसलमान मतदारांना संदेश देण्याचा प्रयत्न मायावती यांच्या पक्षाने केला. मुसलमानांच्या रक्ताच्या थेंबाचे सहज राजकारण होते. पण हिंदूंच्या रक्ताचे पाट वाहत आहेत त्याकडे कुणीच लक्ष देत नाही. हे जातीय राजकारण सर्वच पातळ्यांवर सुरू आहे.अब्दुल्ला रडले!जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे विधानसभेत ओक्साबोक्शी रडले. हे वाचून मला गंमत वाटली. त्यांच्या रडण्याचे कारण काय? जम्मू-कश्मीरच्या बारामुल्लात हिंसक निदर्शने झाली. सुरक्षा दलाने हिंसा रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला. शेवटी हिंसक जमावाला पांगवण्यासाठी गोळीबार करावा लागला. त्यात एका युवकाचा मृत्यू झाला. त्या युवकाच्या मृत्यूने विधानसभेतच ओमर अब्दुल्लांच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. ओमर म्हणाले, ‘‘हे सर्व माझे लोक आहेत. आता मी त्यांना काय उत्तर देऊ? कश्मीरातून लष्कर हटवायला हवे ही माझी मागणी आहे, पण माझे कुणी ऐकत नाही.’’ अब्दुल्ला पुढे म्हणतात, ‘‘माझे काळीज फाटलेय. काय बोलावे समजत नाही. बारामुल्लात मोर्चा निघाला होता. दगडफेक सुरू होती, पण त्यात कोणी आतंकवादी नव्हता. मग लष्कराने गोळीबार का केला? जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री म्हणजे अल्लाचा अवतार नाही. जमाव हिंसक झाला, दगडफेक सुरू झाली तरीही गोळीबार का केला? असे ते विचारतात, हे सर्व माझे लोक आहेत, असे ते म्हणतात. मग याच कश्मीर खोर्यात असंख्य हिंदूंच्या सामुदायिक कत्तली झाल्या. कश्मिरी पंडितांना घरेदारे टाकून पळून जावे लागले. हे सर्व लोक अब्दुल्लांचे कोणीच नव्हते काय?ख्वाजा युनूसची आठवण!गुन्हे करणार्या, गुन्ह्यात सहभागी होणार्या देशभरातील किती ‘आयपीएस’ पोलीस अधिकार्यांवर कारवाई झाली? व अशा किती पोलीस अधिकार्यांवर आरोपपत्र दाखल झाले. या प्रश्नावरील चर्चेत एक मुसलमान खासदार तिरमिरीत उठून उभे राहिले व महाराष्ट्राबाहेरच्या या मुसलमान खासदाराने परभणीच्या ख्वाजा युनूस प्रकरणात पोलिसांवर काय कारवाई झाली ते विचारले, ख्वाजा युनूस प्रकरण आता विस्मृतीत गेले. या घटनेस दशक उलटले. मुख्य म्हणजे मुंबईतील बॉम्बस्फोट प्रकरणातला हा एक आरोपी होता व त्याचा नंतर रहस्यमयरीत्या मृत्यू झाला व या प्रकरणी काही पोलिसांवर कारवाई झाली, पण दशकानंतरही ख्वाजा युनूसचे भूत मुसलमान राजकारण्यांच्या मानेवरून उतरायला तयार नाही. अफझल गुरू, कसाब, ख्वाजा युनूस यांच्यासाठी मानवतेचे अश्रू यांच्या डोळ्यांतून का ओघळतात हे एक कोडेच आहे.ही नावे पहा!हैदराबाद बॉम्बस्फोटांत सांडलेले निरपराध्यांचे रक्त अद्याप सुकलेले नाही. आक्रोश आणि किंकाळ्या अद्याप थांबलेल्या नाहीत. हैदराबाद स्फोटांत ज्यांच्या विरोधात पोलिसांनी वॉरंट काढले आहे त्यांची नावे पहा -१) रियाज भटकळ
२) इक्बाल भटकळ
३) मोहसीन चौधरी
४) अमीर रेजा खान
५) डॉ. शाहनवाज अश्रफ
६) असदुल्लाह अख्तर
७) आरिज खान
८) मो. खालिद
९) मिर्जा शादाब बेग
१०) मोहम्मद साजिद
११) ओबादा उर्र - रहमान
ही सर्व नावे पाहिल्यावर देशाचे गृहमंत्री त्यांना ‘हिरवा आतंक’वाद म्हणण्याचे धाडस दाखवतील काय? हिंदूंना बदनाम करणे आता सोपे झाले आहे. पण मुसलमानांच्या अतिरेकाविरुद्ध शब्द उच्चारण्याची हिंमत नाही.अल्पसंख्याक कोण?या देशात अल्पसंख्याक फक्त मुसलमानच आहेत काय? स्वातंत्र्यापूर्वी मुसलमानांनी स्वत:ला हिंदूंच्या तुलनेत अल्पसंख्याक ठरवले व त्याच अल्पसंख्याक मुसलमानांनी देशाची फाळणी घडवून पाकिस्तान निर्माण केले. मुस्लिमांचा अनुनय म्हणजेच धर्मनिरपेक्षता हेच कॉंग्रेससारख्या पक्षांचे धोरण आहे तोपर्यंत हा देश अस्थिर राहील. देशात मुस्लिमांची संख्या आता २० टक्के आहे. या सगळ्यांनी कॉंग्रेसला मतदान केले तरी कॉंग्रेस सत्तेवर येऊ शकत नाही, पण उरलेले ८० टक्के ‘हिंदू’ म्हणून एकगठ्ठा कॉंग्रेसच्या विरोधात मतदान करीत नाहीत. इस्लामला लोकशाही मान्य नाही. इस्लामला मातृभूमी मान्य नाही. चीनमधल्या एका प्रांतात मुस्लिमांची लोकसंख्या वाढताच त्यांनी चीनमधून फुटून नवा देश निर्माण करण्याचा प्रयत्न करताच लाल ड्रॅगनच्या पोलादी पंजांनी मुसलमानांचा हा प्रयत्न चिरडून टाकला. हिंदुस्थानचे दुबळे राज्यकर्ते मात्र धर्मांध मुसलमानांचा उत्पात राजकीय लाचारीपोटी उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत व काहीजण मुसलमानांच्या अशा बेताल वागण्यास प्रोत्साहन देत आहेत.याला म्हणतात देश!मुसलमानांचा प्रश्न कसा सोडवायचा याचे उत्तर ज्यांना हवे त्यांनी जपानमध्ये काय घडले ते पाहायला हवे. ‘राष्ट्रपर्व’ या साप्ताहिकात वाचलेली माहिती इकडे देतो व विषय संपवतो.
‘‘जपान हा सार्या जगात एकमेव देश आहे, जो मुसलमानांना नागरिकत्व देत नाही. इस्लामच्या प्रचारालाही तेथे बंदी आहे. तेथे मदरसा उघडण्यास बंदी आहे. तेथे कोणाचे धर्मांतर करता येत नाही. मुसलमान हे धर्मांध व कट्टरता निर्माण करणारे आहेत, असे जपान सरकार मानत असल्याने जपानने मुसलमानांविषयी कमालीची सावधानता बाळगली आहे. त्याचा परिणाम म्हणून -१) जपानमध्ये आतापर्यंत एकही दहशतवादी कृत्य घडलेले नाही.२) जपानमध्ये चौथ्या शतकापूर्वी १० लाख मुसलमान होते. आजच्या घडीला तेथे पावणेदोन लाख मुसलमान राहिले आहेत.३) हे मुसलमान फक्त जपानी भाषा बोलतात. जपानी भाषेत अनुवाद केलेले कुराण जवळ बाळगू शकतात.४) नमाजही फक्त जपानी भाषेत पढू शकतात.५) जपानमध्ये फक्त पाच मुस्लिम राष्ट्रांचे दूतावास आहेत. आणि त्यांच्या कर्मचार्यांना जपानी भाषेतूनच संवाद साधावे लागतात.६) जपानमध्ये धर्मांतरास कायद्याने बंदी आहे.७) ख्रिश्चन धर्मगुरूही (पाद्री) येथे बेकार आहेत. गेल्या ५० वर्षांत जपानमध्ये ख्रिश्चनांच्या संख्येत कोणतीही वाढ झालेली नाही.हिंदुस्थानने धर्मनिरपेक्षतेचे पोकळ लोढणे फेकावे व जपानच्या मार्गाने जावे. असंख्य संकटे, वादळे, हल्ले पचवून जपान का उभा आहे, त्याचे हे उत्तर आहे!
No comments:
Post a Comment