Total Pageviews

Monday 20 June 2011

WHY NOT PERMIT E BOOKING FROM ALL TRAVELL AGENTS CYBER CAFFES

जनसाधारण तिकिट बुकिंग सेवकांचा शोध

पश्चिम रेल्वेचा उपक्रम

. टा . खास प्रतिनिधी

घरातून घाईघाईत बाहेर पडल्यावर रेल्वेच्या तिकिटांच्या रांगेत उभे राहण्याचे दिव्य आठवले की तिकिटावर प्रवास करणाऱ्या मुंबईकरांचा उत्साह निम्मा होतो . रांगेची ही अडचण दूर करण्यासाठी पश्चिम रेल्वेने , रेल्वेच्या तिकिट खिडक्यांव्यतिरिक्त इतरत्रही जनसाधारण तिकिट बुकिंग सेवकांची फौज तयार करण्याचे ठरवले आहे . ' एटीव्हीएम ' आणि कूपन मशिन्स या यंत्रणांमुळे खिडक्यांवरची गर्दी कमी होण्यास फारशी मदत झाल्याने आता हे नवे तंत्र अवलंबण्याचे पश्चिम रेल्वेने ठरवले आहे .

कम्प्युटराइज्ड अनारक्षित तिकिट देण्यासाठी या सेवकांना नेमण्यात येणार आहे . समजा तुम्ही अंधेरीत राहाता . दादरला जायचे आहे . घाईघाईने घराबाहेर पडता आणि शेजारीच असलेल्या तिकिट बुथवरून अंधेरी ते दादरचे तिकिट खरेदी करता आणि रेल्वेतील तिकिटांच्या रांगेकडे ढूंकूनही बघता थेट गाडी पकडण्यास धावता . अशी सोय मुंबईच्या पश्चिम उपनगरात २४३ ठिकाणी करण्यात येणार आहे .

पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरील ३७ स्टेशनांपैकी ३१ स्टेशनांसह वापी , बिलिमोरिया , वलसाड , नवसारी , उधना आणि सुरत येथेही तिकिट बुथची सेवा देण्यात येणार आहे . अंधेरी स्टेशनातून दररोज सुमारे . ६६ लाख प्रवासी प्रवास करत असल्याने सर्वाधिक २२ तिकिट बुथ अंधेरीत असतील . खालोखाल बोरिवलीसाठी २० बूथ , दादर , वांद्रे , गोरेगाव आणि कांदिवली येथे प्रत्येकी १२ , सांताक्रूझ आणि भाईंदर येथे प्रत्येकी दहा तिकिट बुथ देण्यात येणार आहेत .

तिकिट बुथ चालवणाऱ्या जनसेवकांच्या निवडीसाठी निरनिराळे निकष लावण्यात आले आहेत . त्यात , जनसाधारण तिकिट बुकिंग सेवक म्हणून निवड होण्यासाठी , त्यांची जागा , दुकान . हे लोकांना सहज सापडले अशी असावे , ज्या स्टेशनवरून तिकिट देणार त्याचा परिसरातील ते रहिवासी असावेत , त्यांना चारित्र्य प्रमाणपत्र , पोलिसांचा दाखला द्यावा लागेल , रेल्वेच्या निर्देेशांप्रमाणे जेटीबीएस टर्मिनल , तिकिट प्रिंटर्स आदींचा खर्च अर्जदाराने करायचा आहे . अर्ज स्वीकारण्याची शेवटची मुदत सहा जुलैपर्यंत आहे .

पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांची संख्या दरवर्षी वाढते आहे . त्यात दररोज प्रवास करणाऱ्यांची संख्या एक लाखाने वाढून आता ३३ . ९२ लाख झाली आहे . त्यांच्यासाठी उपनगरीय क्षेत्रात ३२७ तिकिट खिडक्या असून ११५ ' एटीव्हीएम ' बसवण्यात आलेली आहेत , तर २४२ कूपन मशीन्सची सोय करण्यात आली आहे . ही सर्व सुविधा अपुरी पडत असल्याने आता नवीन मार्ग शोधला असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे

No comments:

Post a Comment