Total Pageviews

Tuesday, 7 June 2011

SINKING SHIP & RAMDEV BABA

बुडणारी माकडीण आणि पिल्ले!राजेश कालरा Tuesday June 07, 2011 बाबा रामदेव यांनी, काँग्रेसच्या अत्यंत ज्येष्ठ नेत्यांनी परदेशात पैसे पाठवले ठेवले आहेत त्यांची नावे जाहीर करण्याची धमकी दिली आणि बाबांचे ठरल्याप्रमाणे चाललेले उपोषण बिघडले. नंतरचे दुर्दैवी प्रसंग यातून घडत गेले. या राजापेक्षा राजनिष्ठ प्रणब मुखर्जी आणि कपिल सिब्बल या दोन मंत्र्यांमुळे बाबांची ढासळणारी विश्वासार्हता वर गेली. सगळे विरोधक सत्ताधा-यांविरुद्ध एकवटले. मी या आधी नमुद केल्याप्रमाणे, ज्या कोणी मंडळींनी बाबांचे उपोषण उधळून लावले ते नक्कीच काँग्रेसचे हितचिंतक नाहीत.काँग्रेस पक्षाला सव्वाशे वर्षांचा इतिहास आहे. इतर कोणत्याही पक्षापेक्षा या पक्षाचे देशाचा कारभार सांभाळला आहे. या पक्षातल्या बड्यांनी आता, कोणा एका विशिष्ट कुटुंबापेक्षा देश मोठा आहे याचा विचार करण्याची वेळ आली आहे. मला वाटते की, बाबा रामदेवांच्या उपोषणाला पक्षातल्या काहींनी ज्या पद्धतीची तोंड दिलं ते बघता या विशिष्ट कुटुंबालाही त्यांच्यामुळे त्रास होतो आहे.याच बाबा रामदेवांच्या स्वागताला, दोन, काही प्रमाणात बदनाम झालेले मंत्री आणि दोन ज्येष्ठ सनदी अधिकारी विमानतळावर उपस्थित होते. बाबा चार्टर्ड विमानाने आले होते. यामुळे बाबाची प्रतिमा उंचावण्याऐवजी ती डागाळली. एकंदर गोंधळ उडवण्याचे आणि अण्णा आणि बाबा गटात आणि भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत दुही निर्माण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट याबद्दल बरेच काही लिहीले गेले आहे.सरकार आणि काँग्रेस यांची बदलती भूमिका आणि वृत्ती याबद्दल अनेकांना आश्चर्य वाटते आहे. परंतु हे सारे ठरवून चालले होते हे मी वर नमुद केले आहे. त्यावरून कळायला हरकत नाही. वर म्हटलेले दोन मंत्री हे स्वत: याबाबत निर्णय घेऊन वागत होते असा समज जाणीवपूर्वक निर्माण केला गेला. परंतु हायकमांडकडून आदेश आल्याशिवाय एक इंचही हलणारे मंत्री असे काही करतील हे असंभव आहे. आता तर असेही पसरवले जाते आहे की, हे दोन मंत्री आणि दोन बाबू यांना, बाबांचे स्वागत करण्यासाठी वाकल्याबद्दल समज देण्यात आली.याबाबत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद मोदी हे चेष्टेने म्हणाले की, अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा यांच्या स्वागतासाठी जितके मंत्री विमानतळावर गेले होते त्यापेक्षा जास्त बाबांच्या स्वागतासाठी गेले होते. नंतर याच बाबांचे वर्णन ठग वगैरे करण्यात आले. दरम्यान पोलिसांनी अकारण कारवाई केली होती. 

No comments:

Post a Comment