सचिनला शिव्या घालणा-यांसाठी....
1 Jun 2011, 0004 hrs IST सचिन तेंडुलकरला देव मानणारे जसे कोट्यवधी चाहते आहेत, त्याचप्रमाणे त्याला शिव्या घालणारांचीही नवी जमात जन्माला आलीय... दरदिवशी टीकेचे बाऊन्सर त्याच्यावर उसळतायत. त्यापैकी एकाही टीकेला सचिनने उत्तर दिलेले नाही. परंतु मटा ऑनलाइनचे वाचक मिलिंद कारेकर यांनी मात्र सचिनसाठी बॅट हातात घेतलीय...
................
सचिन हा काही लोकांसाठी देव आहे देव! मी देखील त्याला देव मानतो. पण फक्त मैदानावर. मैदानाबाहेर मी त्याच्याकडून कसलीच अपेक्षा ठेवत नाही. तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यात कसा वागतो हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आपण त्याच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करतो आणि स्वतःलाच त्रास करून घेतो. सचिनला शिव्या घालताना आपण नेहमी एक गोष्ट विसरतो की तो कधीच कायदा मोडत नाही. शाहरुख आणि अमिताभसारख्या नामवंत आणि श्रीमंत कलाकारांना आयकरात सवलत मिळते हे आपल्यापैकी किती जणांना या आधी ठाऊक होतं ? आपल्यापैकी किती जणं अशी आहेत की त्यांनी आतापर्यंत कधीच कर सवलतीसाठी खोट्या औषधाच्या किंवा घर भाड्याच्या पावत्या भरल्या नाहीत ? किराणा मालाच्या दुकानातून पावती पुस्तक आणून स्वतःच्या वडिलांच्या नावाने घरभाडे भरल्याची पावती बनवून HRA लाटणारे कमी आहेत ? हा खोटेपणा करून देशाचं नुकसान होत नाही ? मग आपण खोटेपणा करून देशाचं नुकसान केलं तर ते चालतं. पण सचिनने कायद्यात राहून जर स्वतःचा पैसा वाचवायचा प्रयत्न केला तर तो गुन्हा ठरतो काय ?
पैसा कमावणं जितकं कठीण असतं ना त्याही पेक्षा पैसा टिकवणं जास्त कठीण असतं. नुसता आपल्या जवळ पैसा आहे म्हणून तो कसाही उडवून चालत नाही तर त्याची कदरही असावी लागते. तर श्रीमंती टिकून राहते. आणि घरात लक्ष्मी नांदते. आपल्या देशातले बहुतेक कुटुंब गरीब आहेत कारण त्यांना मिळालेल्या पैशाचा विनियोग कसा करायचा हेच मुळात ठाऊक नाही. आज जर एका गरीब आणि श्रीमंत माणसाला प्रत्येकी दोन दोन हजार रुपये दिले तर श्रीमंत माणूस ते दोन हजार रुपये कुठे गुंतवले तर दोनाचे चार होतील ह्याचा विचार करेल. तर गरीब दोन हजारात कुठे टच स्क्रीन मोबाईल मिळतो का ते शोधत फिरेल. खोटं वाटतं तर तुमच्या आसपास बघा. ज्या लोकांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा आहे ना तीच लोकं थोडं वेळेच्या आधी घरून निघून बसने न जाता टॅक्सी आणि रिक्षाने फिरताना दिसतील.
सचिनने FSI वाढवून मागितला तर काय बिघडलं ? कायद्यात बसत नाही का ते ? त्याने अनधिकृत बांधकाम करायला जागा मागितली होती का ? स्वतःच्याच जागेत FSI वाढायला कायदेशीररित्या परवानगी मागितली तर त्यात आपल्या पोटात शूळ कशाला उठायला हवा ? बेकायदेशीररित्या FSI वाढवून घेऊन मग पेनल्टी भरून ते बांधकाम कायदेशीर करून घेता येतं , पण तसं न करता त्याने सरळ FSI वाढवायला परवानगी मागितली. हा त्याचा चांगुलपणा आपल्या लक्षात का येत नाही ?
‘ फेरारी ३६० मॉडेना ’ ह्या गाडीवर कस्टमने सूट दिल्यामुळे त्याच्यावर लोकांनी खूप चिखलफेक केली. चिखलफेक करणार्या लोकांना कदाचित गाडीची खरी किंमत आणि तिच्यावर किती कर भरावा लागणार होता ह्याची कल्पना नसेल. खरं तर ज्या देशासाठी आपण खेळून बक्षीस मिळवलं त्याच देशात ते बक्षीस घेऊन जाण्यासाठी इतका कर भरणं व्यवहारिक दृष्टीने नुकसानीचं होतं. मग त्यात दुसरा पर्याय असा राहतो की ती गाडी त्याने परस्पर विकायला हवी होती. पण ह्याने देशाच्या प्रतिष्ठेला डाग नसता का लागला ? सत्यसाईबाबांच्या बाबतीत देखील तेच म्हणेन. माझा स्वतःचा सत्यसाईबाबांवर विश्वास नाही. माझ्या फेस-बुकला पहाल तर मी स्वतः त्यांच्या बुवाबाजीचा व्हिडिओ अपलोड केला आहे. पण माझा विश्वास नाही म्हणून सचिनचा देखील विश्वास नसावा अशी अपेक्षा मी करीत नाही.
कुणाची कुणावर श्रद्धा असावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
एका खेळाडूला मानसिकदृष्ट्या खंबीर असावेच लागते. आणि ते मनोबल त्याला सत्यसाईबाबांच्या दर्शनाने , उपदेशाने किंवा सल्ल्याने मिळत असेल तर त्यात काय वाईट आहे ? लहानपणी एका दिवाळी अंकात मी एक गोष्ट वाचली होती. ' सी. के. नायडूंची कॅप '. त्यातला नायक त्यांच्या कंपनीतल्या संघाचा मुख्य फलंदाज असतो. अचानक एकदा त्याचा बॅड-पॅच सुरु होतो. खेळाडू म्हणून नोकरीला लागला असल्यामुळे नोकरी जाते की काय अशी परिस्थिती निर्माण होते. अशावेळी त्याचे साहेब एक दिवस त्याला सी. के. नायडूंची त्यांच्या जवळ असलेली टोपी आणून देतात आणि पुढच्या सामन्यात ती टोपी घालून खेळायचा सल्ला देतात. ती टोपी घातल्यावर मानसिकदृष्ट्या त्याच्यामध्ये इतका फरक पडतो की , पुढच्याच सामन्यात तो शतक ठोकतो. अर्थात मी इथे खूप संक्षिप्तपणे गोष्ट सांगितली. खरी कथा मूळ लेखकाने खूप छान रंगवून लिहिली होती. कथेच्या शेवटी ते साहेब त्या नायकाला सांगतात की ती कॅप जी त्यांनी त्याला दिली होती ती त्यांच्याच मुलाची जुनी कॅप आहे. फक्त तुझे मनोबल वाढवण्यासाठी तुला मी ती सी. के. नायडूंच्या नावाने दिली होती. इथे कथा सांगायचं तात्पर्य हेच की सचिनच्या आयुष्यात जर नायकाच्या साहेबाचा रोल सत्यसाईबाबा करीत असतील तर आपल्याला अडचण कशाला यायला हवी ?
मुंबईत अमराठी लोकांना जेव्हा सचिनला शिव्या घालताना बघतो तेव्हा मी समजू शकतो. ते लोकं त्याला शिव्या घालत नसतात तर असा माणूस मराठी घरात का जन्माला घातलास ? म्हणून ते मनातून देवाला कोसत असतात. पण जेव्हा मराठी माणसालाच विचार न करता त्याला शिव्या घालताना पाहतो तेव्हा वाईट वाटतं.
आम्हाला भ्रष्ट मुख्यमंत्री चालतो. लालू , कलमाडी , ए. राजा आणि कनीमोळी सारखे घोटाळेबाज आम्ही सहन करतो. स्वतःच्या मनमानीने कारभार करणारे आणि नवनवीन कायदे अमलात आणणारे गृहराज्यमंत्री आम्हाला चालतात. गोकुळाष्टमीच्या निमित्ताने लाख लाख रुपयांच्या हंड्या बांधणारे नेते आम्हाला जास्त प्रिय. मग त्या चढाओढीत छोट्या मंडळातील कुणाचा अगदी जीव गेला तरी आम्हाला फिकीर नसते. ' पण सचिनने मात्र शॉवरखाली आंघोळ न करता बादलीमध्ये पाणी घेऊन आंघोळ करा. ' असा जरुरीचा सल्ला दिला तरी आम्ही तो मनावर घेत नाही.

No comments:
Post a Comment