पोलीस दलातील गृहकलह nashik(07-June-2011) Tags : Editorialनाशिकमध्ये महापालिका आयुक्तपदासाठी दोन सनदी अधिकार्यांमध्ये संंगीत खुर्चीचा खेळ रंगला आहे. सानप-घोलप युतीचे घट्ट आणि निगरगट्ट हितसंबंधही त्यातून डोकावतात. पोलीस आयुक्तपदाचाही खांदेपालट दर्शनी तरी सुरळीतपणे झाला. नवे पोलीस आयुक्त विनोद लोखंडे यांनी विष्णुदेव मिश्रांकडून सूत्रे घेतली. तथापि कायदा सुव्यवस्थेबाबत पोलिस दलाची कर्तव्ये, गुन्हेगारांचा बंदोबस्त, जनतेच्या अपेक्षा याबाबत दोघांच्या कल्पना वेगळ्या असाव्यात, हे दोघांच्या बोलण्यातूनच स्पष्ट झाले. ढासळत्या कायदा-सुव्यवस्थेचे खापर मावळत्या आयुक्तांनी प्रचलित व्यवस्थेवर फोडले. नाशिककरांचे आभार मानताना पोलिसांच्या असहायतेचेही गाणे ते गायले. नव्या आयुक्तांनी मात्र त्यांचे म्हणणे साफ खोडून काढले. पोलिसांनी खंबीरपणे गुन्हेगारीचा बीमोड केला पाहिजे असे ठासून सांगितले. अर्थात जनतेने पोलिसांकडून फार अपेक्षा बाळगू नयेत, हे सांगण्यालाही ते विसरले नाहीत. एकूणच आयुक्तपद भूषविणार्या दोन ज्येष्ठ व अनुभवी अधिकार्यांमधील त्या अधिकारपदाच्या जबाबदारीबद्दल एकवाक्यता नसल्याचे जाणवले. त्यांना तरी कसा दोष द्यावा? महाराष्ट्राच्या गृह- खात्याची आणि त्याअंतर्गत काम करणार्या पोलीस दलाची सर्वत्र अनवस्था आहे. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही. कोल्हापूरच्या महिला पोलीस प्रशिक्षण केंद्रातील सेक्स स्कँडल नुकतेच गाजले. मैथिली झा आणि मीरा बोरवणकर या दोन पोलीस अधिकारी महिलांनी या प्रकरणी चौकशी केली. दोघींचा अनुभव दांडगा आहे. पण कोल्हापूर सेक्स स्कँडलबाबतचे त्यांचे अहवाल व निष्कर्षात बिलकुल सुसंगती नाही.मैथिली झा अत्याचारपीडित महिलांची प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी थेट नागपूरलाही गेल्या होत्या. त्यांना फक्त एक विवाहित महिला प्रशिक्षणार्थी गर्भवती असल्याचे आढळले. त्याआधारे महिला प्रशिक्षण केंद्रातील सर्वांना त्यांनी निर्दोष ठरवले. त्यानंतर पुण्याच्या पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी स्वतंत्रपणे चौकशी केली. प्रशिक्षण केंद्रात लैंगिक शोषण होत असल्याचा आणि त्यात वरिष्ठ अधिकार्यांचाही हात अ्रसल्याचा अहवाल त्यांनी दिला. त्याआधारे गृहखात्याने कोल्हापूरच्या जिल्हा पोलीस प्रमुखांसह केंद्रातील संबंधित अधिकारी व सेवकांवर कारवाई केली आहे. मैथिली झा यांचा अहवाल दिशाभूल करणारा होता किंवा काही दडपणाखाली दिला गेला होता असा याचा अर्थ नाही का?खरे तर श्री. सदाशिव मंडलिक यानी हे सेक्स स्कँडल वेशीवर टांगले. खुद्द गृहमंत्र्यांनी मैथिली झा यांच्याकडे चौकशी सोपवली. पण आबांचा विश्वास अनाठायी ठरला. झा यांचे झाकापाकीचे प्रयत्न उघडले पडले व पोलीस दल आणि गृहखात्याचे हसू झाले. इतके बेफिकीर पोलीस दल राज्यातील गुन्हेगारी कशी थोपवू शकणार
No comments:
Post a Comment