Total Pageviews

Friday, 3 June 2011

most popular post

समर्थ रामदासांनी छत्रपती शिवरायांना लिहिलेले पत्र -

समर्थ रामदासांनी छत्रपती शिवरायांना लिहिलेले पत्र -
निश्‍चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू
अखंड स्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी
उपकाराचीया राशी। उदंड घडती जयासी
तयाचे गुण महत्त्वासी। तुळणा कैसी
यशवंत! कीर्तिवंत! सामर्थ्यवंत! वरदवंत!पुण्यवंत! नीतिवंत! जाणता राजा
आचारशील! विचारशील! दानशील! धर्मशील!सर्वज्ञपणे सुशील। सकळा ठायी
धीर, उदार, गंभीर। शूर क्रियेसी तत्पर
सावधपणे नृपवर। तुच्छ केले
तीर्थक्षेत्रे मोडिली। ब्राह्मण स्थाने भ्रष्ट झाली
सकळ पृथ्वी आंदोळली। धर्म गेला
देवधर्म गो ब्राह्मण। यांचे करावया संरक्षण
हृदयस्त झाला नारायण। प्रेरणा केली
उदंड पंडित पुराणिक। कवीश्‍वर याज्ञिक वैदिक
धूर्त तार्किक सभानायक। तुमचे ठायी
या भूमंडळाचे ठायी। धर्मरक्षी ऐसा नाही
महाराष्ट्र धर्म राहिला काही। तुम्हा कारणे
आणिकही धर्मसत्रे चालती।
आश्रित होवून कित्येक राहती
धन्य धन्य तुमची कीर्ति। विश्‍वी विस्तारली
कित्येक दुष्ट संहारिले। कित्येकास धाक सुटले
कित्येकास आश्रय झाले। शिवकल्याण राजा

No comments:

Post a Comment