Total Pageviews

Saturday, 4 June 2011

INDO SHREELANKA WORLD CUP FINAL IS FIXED

तिलकरत्नेच्या गौप्यस्फोटाने खळबळ
नवी दिल्ली - अरविंद डिसिल्वा व सनथ जयसूर्या हे आपले संघसहकारी मॅच फिक्सिंगच्या प्रकारात सहभागी होते, असा जबरदस्त बाँबगोळा टाकून श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू हसन तिलकरत्ने याने प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. या संबंधीच वृत्त श्रीलंकेतील प्रसारमाध्यमांनी दिले आहे.
तिलकरत्ने याने देशाचे अध्यक्ष महिंदा राजपाक्षे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोरच हा गौप्यस्फोट केला. माझ्यासोबत खेळणारे संघातील दोन सहकारी अशा प्रकारांत सहभागी होते, असे त्यांने अध्यक्षांना सांगितले. यावेळी त्याने श्रीलंका क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष थिलंगा सुमथिपाला यांच्यावर मॅच फिक्सिंगचा आरोप केला. नुकत्याच संपलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत व श्रीलंका यांच्यातील अंतिम सामनाही फिक्स करण्यात आला होता, असा आरोप त्याने या आधी केला आहे

No comments:

Post a Comment