Total Pageviews

Saturday 18 June 2011

DIGVIJAY SINGH HUMOURS ARTICLE PRAHAR

दिग्गीराजा..19 June, 2011 04:30:00 AM पांडुरंग सांगलीकर
स्वातंत्र्योत्तर भारतातील सर्वाधिक स्पष्टवक्ते परखड नेते अण्णा हजारे यांचे हितचिंतक रामदेवबाबांच्या मागे हात धुवून लागलेले मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री असलेले काँग्रेस पक्षाला दिशादर्शन करणारे थोर विचारवंत प्रिय दिग्गीराजा यांना दोन्ही कर जोडोनि कोपरापासून नमस्कार..दिग्गीराजा आपण ज्याम खूश आहोत तुमच्यावर. तुमची तोफ ज्या पद्धतीनं धडधडतेय ना, रामदेवबाबांनी स्वत:च्या खर्चानं उभारलेल्या मंडपात अखंड बडबड करावी आणि तुम्ही समोर आलेल्या च्यानलांच्या कॅमे-यांसमोर एखादा बाईट देऊन त्या साऱ्यावर पाणी फिरवावं. कॅमे-यांसमोर जे बोलतात त्यालाबाईट’ असं का म्हणतात, हे लोकांना समजत नव्हतं. पण तुम्ही अलीकडच्या काळात बोलता त्यावरूनबाईट’ म्हणजे काय याचा अर्थ माध्यमनिरक्षर जनतेला कळू लागलाय. मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी असताना काँग्रेसमधले मवाळ नेते, अशी तुमची प्रतिमा तयार झाली होती. त्यामुळेच उमा भारतींनी आक्रमकपणे हल्ला करून तुमच्या राजवटीत मध्य प्रदेशात बीएसपी म्हणजे बिजलीसडकपाणी या प्रॉब्लेमकडे लोकांचे लक्ष वेधले आणि तुम्हाला मध्यप्रदेश सोडून दिल्लीचा रस्ता धरावा लागला. मध्य प्रदेशात काँग्रेसचे अर्जुन सिंगांपासून माधवराव सिंदियांपर्यंत बडेबडे नेते असूनही तुम्ही तुमचं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. पंढरपूरच्या विठ्ठलाची कृपा होती तुमच्यावर. त्याशिवाय का तुम्ही आषाढीची पूजा चुकवत नाही?पाठीमागून व्हीआयपींचा जत्था येतोय, असा इशारा देत पायलट कार पुढं जात असते, तशी पायलट कारची भूमिका तुम्ही अलीकडं छान वठवायला लागलाय. कितीही काँप्लिकेटेड प्रश्न असला तरी तुम्ही त्यावर बोलायला घाबरत नाही. अगदी दिल्लीतल्या बाटला हाऊस चकमकप्रकरणीही तुम्ही वेगळं मत नोंदवलंत आणि वादळ ओढवून घेतलंत. तुम्ही आधी बोलायचं, त्यावर लोकांच्या काय प्रतिक्रिया येताहेत याचा अंदाज घेऊन काँग्रेस पक्ष पाठोपाठ आपली भूमिका जाहीर करतो. प्रकरण अंगाशी येतंय म्हटल्यावर काँग्रेस पक्ष तुमच्या मताशी असहमती व्यक्त करतो आणि ते तुमचं व्यक्तिगत मत असल्याचं सांगितलं जातं. याचाच दुसरा अर्थ असा की, काँग्रेससारख्या पक्षात लोकशाही प्रक्रिया गतिमान करण्याची सुरुवातही तुम्हीच केलीत. पक्षाच्या धोरणाविरोधात बोलण्याचा अधिकार असलेले फक्त तुम्ही एकटे नेते आहात. कितीतरी वेळा तुम्ही पक्षापेक्षा वेगळी लाईन घेतली, पण तुम्हाला कधीच त्याचा खुलासा कुणी विचारला नाही. मागं एकदा दंतेवाडातील नक्षलवादी हल्ल्यानंतर तुम्ही गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्यावरच ठोका टाकायला मागंपुढं पाहिलं नव्हतं.खरं तर प्रत्येक राजकीय पक्षानं एक पक्षांतर्गत विरोधी पक्षनेतेपद तयार करायला पाहिजे, असं तुमच्याकडं बघून वाटतं. म्हणजे काँग्रेसअंतर्गत विरोधी पक्षनेतेपदावर तुमची एकमतानं नियुक्ती झाली असती. लोकपाल विधेयकाचा एवढा मोठा एपिसोड भारतीय राजकारणात सुरू आहे. तिथंही तुम्ही पंतप्रधानांना लोकपालाच्या कक्षेत आणायला पाहिजे, असं विधान करून खळबळ उडवून दिलीत. हे जरा जास्तच होतंय म्हटल्यावर माघार घेतलीत. दिग्गीराजा बोलतात तेव्हा त्यांच्या तोंडून सोनियाजी बोलतात का राहुल गांधी, याचा अंदाज अजून अहमद पटेलांनाही आलेला नाही, असं दिल्लीच्या वर्तुळात बोललं जातं. पण तुमच्या शब्दांना जे काही वजन असतं ना, ते म्हणजे एक घाव दोन तुकडेच. रामदेव बाबांना तुमच्यासारखा इरसाल माणूस आयुष्यात दुसरा भेटला नसेल. उपोषणाआधी जेव्हा रामदेवबाबांचे नैतिक वजन घटले नव्हते तेव्हाही तुम्ही रामदेवबाबा आणि त्यांचा तो बालकृष्णन का कोण तो आचार्य त्या दोघांना ठोकायला सुरुवात केलीत. रामलीला मैदानातून रामदेवबाबांनी पलायन केल्यानंतर तर बोलायलाच नको. महाठग, भामटा अशी शेलकी विशेषणं वापरून तुम्ही रामदेवबाबांचा बुक्का पाडलात. तेवढय़ात सुषमादीदींनी राजघाटावर ठुमके मारले आणि तुम्ही लगेच भारतीय जनता पक्ष हीनाच्यांची पार्टी’ असल्याचं बोलून टाकलंत. राजकारणात इतकं रोखठोक अलीकडं ऐकायला मिळत नाही हो. अण्णा हजारेंना तुम्ही दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ऐकून तिकडं त्या अरविंद केजरीवालांना ताप भरलाय म्हणे. वयोमानानुसार अण्णांनी उपोषणं करू नयेत, ती जबाबदारी केजरीवालांसारख्या तरुणांनी घ्यावी, असं सुचवून तुम्ही जनलोकपालांच्या तंबूत घबराट उडवून दिली. तरी बरं तुम्ही भूषण पिता-पुत्रांना उपोषणाला बसण्याचं आवाहन केलं नाहीत, नाहीतर ते सुट्टी घेऊन विदेशात गेले असते.काहीही म्हणा तुमच्यामुळं टीव्हीवाल्यांची एक सोय झालीय. एखाद्या दिवशी काहीच बातमी नसली आणि तुमच्याकडं आलं तर हमखास न्यूज मिळणार, याची खात्री झालीय आता. नाहीतर अमरसिंह वनवासात गेल्यापासून बिचा-यांना सगळं नीरस वाटत होतं. तुमच्या बाइट्सचा फॅन

No comments:

Post a Comment