Total Pageviews

Friday 17 June 2011

DESHDOOT EDITORIAL ON HOW TO BE HAPPY

जीवन-कसरत एका तारेवरची’ अहमदनगर (17-June-2011) ,Editorial-माणसाच्या जीवनाला नेहमी प्रवासाची उपमा दिली जाते. कारण प्रवास जसा ठरल्या वेळेत सुरू होतो आणि ठरलेल्याच वेळेत संपतो तसा माणसाचा जीवनप्रवासदेखील अध्यात्मिक धारणेनुसार ठरलेल्या वेळी झालेल्या जन्मापासून सुरू होतो अन् वेळ आली की संपतो. जन्म आणि मृत्यूमधील अंतर किंवा काळ माणसांगणिक कमी जास्त होतो. असे असल्यामुळे माणसाच्या वाट्याला आलेले जीवन किती होते यापेक्षा प्राप्त जीवन तो कसे जगतो हे फार महत्त्वाचे ठरते. जीवनाचा काळ मर्यादित असतो आणि मर्यादा अज्ञात असते हे एकदा लक्षात आले की त्याचा उपयोग जास्तीत जास्त चांगल्या तर्‍हेने करून आंनदाची समाधानाची प्राप्ती करून घेणे हे क्रमप्राप्त ठरते. परंतु असे करणे हे सोपे नसते. त्यासाठी शरीराला आणि मनाला शिस्त लावून जीवनकाळाचे नियोजन करणे हे अत्यावश्यक असते. जीवनाचे नियोजन करताना आधी काही पथ्ये ठरवावी लागतात. थोरामोठ्यांच्या वचनांतून किंवा लिखणांतून प्रेरणा घेऊन योग्य ती मार्गदर्शक तत्त्वे निवडावी लागतात. या संदर्भात मी कॉमर्स कॉलेजमध्ये शिकत असताना अभ्यासलेली दोन पुस्तके आठवतात. एक होते जेम्स हिल्टन या लेखकाचीलॉस्ट होरायझन’ ही कांदबरी. त्या कांदबरीतील एका प्रकरणांत एक तिबेटियन लामा त्यांच्या ल्हासा येथील आश्रमाबद्दल माहिती देताना सांगतो की तेथील सर्व लोक त्यांच्या रोजच्या आचरणांत मध्यम मार्गाचे पालन करतात.
दुसरे एक जे विविध लेखांचे इंग्रजी पुस्तक होते, त्यातील एका लेखांत एक सुरेख वाक्य होते. ते कायमचे स्मृतीत राहिले आहे. ते असे होते- Too much anticipation is enemy of pleasure !प्रत्येक व्यक्तीने आपली राहणी, आचार-विचार यांत मध्यम मार्ग स्वीकारून टोकाला जाणे टाळणे हिताचे असते. शाळा, कॉलेज मध्ये मित्र निवडताना, त्यांच्याशी वागता बोलताना मध्यम मार्ग अवलंबला तर मतभिन्नता त्यामुळे होणार्‍या संघर्षाची तीव्रता कमी होते. हाच मार्ग नोकरी-व्यवसायांतही उपयोगी पडतो. त्याचप्रमाणे नातेवाईक, स्नेही, हितचिंतक यांच्याशी संबंध ठेवताना मध्यम- मार्गी भूमिका ठेवली तर संबंध आंनददायी ठरण्याचे प्रेमाचे राहण्याची शक्यता वाढते. आयुष्यात शिक्षणासंबंधी, नोकरी व्यवसायासंबंधी महत्त्वाकांक्षा बाळगताना, अपेक्षा ठेवताना कौटुंबिक वातावरण, सभोवतालची परिस्थिती स्वत:च्या शारीरिक आणि बौद्धिक क्षमता जाणून घेता आल्या पाहिजेत त्यांचे सदैव भान राहिले पाहिजे. म्हणजे अपेक्षा अवास्तव ठरता त्यांची पूर्ती होण्याची शक्यता वाढते. ठेवलेल्या अपेक्षा वाजवीपेक्षा जास्त असतील तर Too much anticipation is enemy of puleasure या बोधवाक्यानुसार अपेक्षाभंगाचे दु: नशिबी येऊ शकते. असे दु: अर्थातच टाळता येण्याजोगे आहे. त्यासाठी Right anticipation is right course to happiness हे आपल्या मनावर बिंबवता आले पाहिजे. आपल्या सतांनी याबाबतीत बरेच मार्गदर्शन केले आहे. संत तुकारामांनी ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असू द्यावे समाधान’ हे जे सांगितले आहे ते अपेक्षाभंगाचे दु: टाळता यावे यासाठीच आहे. काही जणांना संत तुकरारामांचे सांगणे नकारार्थी, प्रगतीला मारक आहे असे वाटू शकेल. परंतु तसे ते नक्कीच नाही. हातपाय हलवू नका, असेल हरी तर देईल खाटल्यावरी असे त्यांना नक्कीच अभिपे्रत नाही. अनंताने किंवा इश्‍वराने ज्या परिस्थितीत जन्माला घातले आहे, बरोबर शारीरिक क्षमतांची, बुध्दीची जी पुंजी दिली आहे, त्याचे सदैव भान ठेवावे, समाधानी वृत्ती जोपासावी असे त्यांना सुचवायचे आहे. जेणेकरून निराशेचे क्षण जीवनात कमी येतील. दुसरे त्यांना हे सूचित करायचे आहे की समाधान हे बर्‍याच वेळा होत नसते, ते मानावे लागते. वास्तवतेची जाण असली तरच असे करता येते. या विषयांत मनन करताना माझ्या ऑफिस जीवनांतील एक घटना आठवते. आमच्या महाराष्ट्र वाङ्‌मय मंडळातर्फे एका फलकावर रोज आम्ही एक सुविचार लिहायचो. एखाद्या दिवशी थोरामोठ्यांचा सुविचार आठवला नाही, वेळेवर मिळाला नाही तर आमच्यापैकी कुणाला एखादा विचार सुचला तर तो आम्ही लिहायचो. एकदा अशाच प्रसंगी समाधानासंबंधी मला सुचलेला विचार आम्ही लिहिला होता. तो असा होता, ‘समाधान हे क्षितिजासारखे असते. जेवढे आपण त्याच्या जवळ जायचा प्रयत्न करू तेवढे ते दूर पळते.’ यानुसार हाताशी आलेले सुखाचे क्षण स्वीकारयचे, उपभोगायचे की अधिकाधिक सुखांच्या प्राप्तीसाठी धावपळ करीत रहायचे हे प्रत्येकाला ठरवावे लागते. धावपळ करायचीच असे ठरवले तर निदान तिच्यासहित वास्तवतेचे भान ठेवून एक सीमा ठरवायला हवी. म्हणजे दु:खाचे क्षण पदरी यायची शक्यता सीमित राहील. एकंदरीत जीवन जगणे ही तारखेची कसरत आहे वाटू लागते. परंतु जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर ती प्रत्येकाला करावीच लागते. कारण त्यामुळेच आनंद-समाधान-सुख-शांती या जीवन यशस्वी करणार्‍या पायर्‍या दृष्टीपथात येतात. पावले त्या दिशेने टाकता येतात. जीवनप्रवास योग्य दिशेने सुरू राहतो

No comments:

Post a Comment