Total Pageviews

Sunday 5 June 2011

BABA RAMDEVA FAST MORE THAN 100 INJURED SERIOUSLY

क्रूरपणे दडपून टाकले, ती आंदोलन सुरूच वृत्तसंस्था Monday, June 06, 2011 AT 02:30 AM (IST) हरिद्वार - आपले शांततामय मार्गाने सुरू असलेले आंदोलन सरकारने अत्यंत क्रूरपणे दडपून टाकण्याचा प्रयत्न केला; मात्र तरीही हे भ्रष्टाचाराच्या विरोधातील आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे रामदेवबाबा यांनी आज येथे जाहीर केले. बाबांनी कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावरही टीकेची तोफ डागली.
दिल्लीच्या रामलीला मैदानातून पोलिसांनी बाबांना हुसकावून लावल्यानंतर ते पहाटे हरिद्वारला आले. सकाळी अकरा वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी, आपल्याला ठार करण्याचे कारस्थान रचले गेले असल्याचा आरोप केला. या कारस्थानात केंद्रातील काही मंत्री सामील असल्याचे या मंत्र्यांनी आपल्याला बैठकीत धमकी दिल्याचे रामदेवबाबा म्हणाले.
रामदेवबाबांनी पत्रकार परिषदेच्या वेळी त्यांचा नेहमीचा भगवा पोषाख घालता महिला घालतात तसा सलवार-कमीज परिधान केला होता. हा एका महिलेचा पोषाख घालून आपल्याला रामलीला मैदानातून पळ काढावा लागल्याचे त्यांनी सांगितले. ""भ्रष्टाचाराच्या मुद्‌द्‌यांवर चर्चेची सरकारची अजिबात तयारी नाही, काळ्या पैशाचे मुद्दे सरकारने गांभीर्याने घेतलेले नाहीत. विशेषतः सरकारच्या वतीने वाटाघाटी करणारे मंत्री कपिल सिब्बल यांनी कुटीलपणे मला फसविले,'' असे रामदेवबाबा यांनी म्हटले.

""
रामलीला मैदानावर जमलेल्या सुमारे एक लाख नागरिकांवर पोलिसांनी बेछूटपणे लाठ्या चालविल्या. महिला मुले यांनाही त्यांनी दयामाया दाखविली नाही, त्या सर्वांना पोलिसांनी ओढत, फरपटत नेले मारले,'' हे सांगताना रामदेवबाबा भावूक झाले होते.

""
सोनिया गांधी या "रिमोट कंट्रोल'ने सरकार चालवितात; त्या जन्माने परकीय असल्या, तरी या देशाच्या सूनबाई आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून वेगळ्या अपेक्षा होत्या, तथापि त्यांचे देशवासीयांवर प्रेम नाही,'' असे नमूद करून रामदेवबाबा म्हणाले, ""मला काही इजा झाली, तर त्यास सोनिया गांधी कॉंग्रेसचे सरकार जबाबदार राहील...त्यांच्या काळ्या कारवाया उघड होऊ नयेत म्हणून माझ्या जिवावर ते उठले आहेत.'' प्रतिक्रिया महास्के साहेब जर तुम्हाला येवढा कॉंग्रेस चा पुळका आहे तर मग मैदानात या आणि आव्हान करा बघा काय उत्तर मिळतंय तुम्हाला कश्याला घालवून घेताय स्वताची एक दिवस सत्याचाच विजय होईल,बाबा लगे रहो, हम सब आपके साथ है. मित्रानो, आपण सगळे आपले मत मांडत आहात हे वाचून चांगले वाटले,पण आपण स्वत: भ्रष्टाचार रोखण्यासाठी आज काय केल? ट्राफिक पोलीस मामांना लाज दिली? एखाद्या सरकारी कार्यालयात पैसे चारले कि आसाच काही तरी? आता सगळ्यांनी स्वत:चा विचार सोडून "लागे राहो मुन्नाभाई" सारखी "गांधीगीरी" करायला हवी आहे, तीच आजची गरज आहे... जर तुमचा स्वभाव मावळ नसेल तर "मी शिवाजी राजे भोसले बोलतोय" मधील दिनकररावांचा कणखर मार्ग स्वीकारायला हवा. हि सरळ सरळ सरकारची दादागिरी आहे.... त्यांनी अधिकाराचा गैरवापर करून आंदोलन चिरडून टाकले... जो कोणी विरोध करेल त्याला असेच गप्पा केले जायील... सर्वांनी बाबांच्या पाठी उभे राहावे त्यांना सपोर्ट करावा हि विनंती. रामदेव बाबा यांचा विचार पत्न्या सारखा नाही. सरकार ने मागण्या मान्य केली नंतर आंदोलन का नाही मागें घेतले. आणि महिलेचा पोषाख घालून रामलीला मैदानातून पळ काढावा का काढला? अटक का नाही करून घेतले? रामदेव बाबा चा हव्यास स्पष्ट जाला आहे ह्या घटने मुले. त्यांना फक्त प्रसिद्धी हवी होती. अन्न हजारे सारखे प्रशिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला आणि फसले. सरकारने फार मोठी चूक केली आहे. उपोषण करणे म्हणजे गुन्हा नाही. याने राष्ट्र पित्याच्या विचारांचा अपमान झाला आहे. तुम्हाला एवढे जर बाबां बदल चुकीचे बोलायचे आहे तर तुम्हीच का आवाज उठवत नाही या corruption वरती, त्या वेळी का सरकारच्या नावाने ओरडता , आपल्याला जे जमत नाही ते बाबा करत आहे आणि तुम्ही त्यांनाच नावे ठेवता . रामदेव बाबा चा हव्यास स्पष्ट जाला आहे ह्या घटने मुले. त्यांना फक्त प्रसिद्धी हवी होती. कारण त्यांना ना बोलता येत होता ना त्यांना त्यांचे विचार मांडता येत होते . त्यांचा विचार होता कि अन्न हजारे सारखा करून नेता बनावा बाकी काही नाही

नवी दिल्ली - आंदोलने आणि सभांनी दणाणून जाणारे राजधानीतील रामलीला मैदान आज सकाळी मात्र उदास भासत होते... ऐन मध्यरात्री अर्धवट झोपेत असलेल्या आंदोलकांवर सरकारने अचानक लाठ्या चालविल्याने जीव वाचविण्यासाठी झोपेतच मैदानाबाहेर धावलेल्या महिला बालकांपैकी अनेक जण आपल्या सामानाच्या शोधासाठी आले होते... काही जण रुग्णालयातील आपल्या सहकाऱ्यांच्या बॅगा शोधत होते.
रामलीला मैदानावर सकाळी सहाला सर्वत्र अस्ताव्यस्त चपला आणि कपड्यांचेच ढीग होते. आपल्या सामानाच्या शोधासाठी आलेल्या आंदोलकांना पोलिसांची परवानगी नव्हती. मंडप आणि खुर्च्यांच्या कंत्राटदारांना मात्र मैदानात प्रवेश मिळत होता. त्यांच्याही चेहऱ्यावर आपले "भांडवल' सुरक्षित जाईल ना याचीच चिंता भेडसावत होती. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी दिल्ली खाक्‍या दाखवून मैदानात प्रवेश मिळवत अनेक भाविकांचे सामान बाहेर आणून त्यांच्या सुपूर्त केले. संघ विश्‍व हिंदू परिषदेच्या अनेक संस्थांनी या भाविकांसाठी गेल्या दोन दिवसांपासून अन्नछत्रे चालविली आहेत.
शनिवारी (ता. 4) मध्यरात्री रामलीला मैदानावर पळापळ झाल्यानंतर हजारो आंदोलकांनी दिल्लीतील गुरुद्वारा, बडा उदासीन यांसारख्या आश्रमांसह दिल्लीतील विविध धर्मशाळांत आश्रय घेतला होता. आंदोलकांपैकी काही जखमी महिला मुले रुग्णालयात होती. यात काही मराठी भाविकही होते. यापैकी रमाबाई जोग यांनी, "लाठ्या मारण्यासारखे आम्ही काय केले होते? या देशात देवाचे नाव घेतले तरी लाठ्या खाव्या लागणार का?' असा काळजाला घरे पाडणारा सवाल केला. पतंजली योग समितीचे विष्णू भुतडा हंसराज मिश्रा यांच्या डोळ्यांना अश्रूधुराचा त्रास दिवसभर जाणवत होता. भारत स्वाभिमानचे प्रांताध्यक्ष विष्णू पवार यांनी सांगितले, की मध्यरात्री अनेक आंदोलक झोपेतच होते. व्यासपीठावर स्वतः बाबा भारत स्वाभिमान आंदोलनाचे अन्य कार्यकर्ते तसेच साधू-संत होते. आम्ही काही कार्यकर्ते भारत स्वाभिमानची गीते भजने म्हणत होतो. प्रतिक्रिया भारताची वाटचाल हुकुमशाही राज्यव्यवस्थेकडे होतेय. असे वाटायला लागले आता. पोलीस कारवाई चा आदेश देणार्याला रामलीला मैदानात उभे करून बडवा !!
On 06/06/2011 02:35 AM nsp said:
On 06/06/2011 10:22 AM Sachidanand said:

On 06/06/2011 09:47 AM punam said:
maske
On 06/06/2011 06:57 AM dev maske said:
On 06/06/2011 09:59 AM Ram said:
On 06/06/2011 10:15 AM dayanand said:
On 06/06/2011 10:26 AM RAM BHOLWANKAR said:
yek divas satyachach vijay hoil.baba lage raho ham sab aapke sath hai.
On 06/06/2011 10:26 AM Pratik said:
On 06/06/2011 10:28 AM MILIND BHANDARKAR said:
Black Money - Should come in System urgently from abroad & whiten India One should take serious stapes & we all should support big H
On 06/06/2011 10:27 AM Guru said:
On 06/06/2011 10:29 AM RAM BHOLWANKAR said:
On 06/06/2011 10:44 AM Tirupati said:
 

No comments:

Post a Comment