Total Pageviews

Sunday, 5 June 2011

BABA RAMDEVA FAST DOES IT MATTER WHO SUPPORTED HIM

भावनावेग नव्हे, तर तारतम्याची आवश्‍यकता अनंत बागाईतकर (सकाळ न्यूज नेटवर्क) Monday, June 06, 2011 AT 01:00 AM (IST) सर्वसाधारण नागरिकाला भावनावेगाचे स्वातंत्र्य असते. अर्थात हा भावनावेग देशाच्या राज्यघटनेचे उल्लंघन करणारा असेल तर त्याला अतिरेक म्हणतात. सरकारला नियम, कायदे आणि राज्यघटनेच्या आधारेच चालावे लागते. रामदेवबाबांनी काळ्या पैशांविरोधात सुरू केलेल्या मोहिमेच्या निमित्ताने केलेल्या मागण्या लक्षात घेता त्यांची व्यावहारिकता तपासावी लागेल आणि ते करताना तारतम्यही बाळगावे लागेल. काळा पैसेवाल्यांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी बाबांनी केली आहे. जगभरात मृत्युदंड असावा की नाही, याबाबत चर्चा सुरू आहे. या शिक्षेचा अपवादात्मक स्थितीतच विचार करण्याबाबतचा मतप्रवाह असताना या मागणीवर विचारमंथन करावे लागेल. बाबांनी चार केंद्रीय मंत्र्यांबरोबर दिल्ली विमानतळावर झालेल्या चर्चेत अशा अनेक मागण्या केल्या आहेत. अगदी टीव्हीवरील आधुनिकता दाखविल्या जाणाऱ्या गोष्टी, सिनेसृष्टीत दाखविले जाणारे अत्याधुनिक जीवन यांच्या विरोधात बाबा बोलले. हे प्रकार प्रतिबंधित करण्यासाठी सरकारने उपाय केले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. हिंदी सक्तीचे करा म्हणूनही सांगितले. सर्वांना शेतीवरील जीवनाची ओळख होण्यासाठी शेती सक्तीची करण्याची सूचनाही त्यांनी केली. याखेरीज पाचशे एक हजाराच्या नोटा रद्द करण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला. परदेशातील काळा पैसा राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करणे, काळा पैसेवाल्यांना मृत्युदंड, पंतप्रधानांची निवड थेट निवडणुकीने व्हावी, अशा मागण्या करताना त्यांनी राज्यघटनेतही काही फेरफार सुचविले. थोडक्‍यात, काळ्या पैशाच्या निमित्ताने रामदेवबाबांनी आपला राजकीय जाहीरनामाच प्रसिद्ध केला. हा जाहीरनामा नीटपणे पाहिल्यास त्यातील छुपा जाहीरनामा हा वेगळ्याच मंडळींचा असल्याचे दिसून येते.
रामदेवबाबांनी काळ्या पैशांबाबत केलेल्या मागण्या किंवा अण्णा हजारे यांच्या आंदोलनाच्या विरोधात कोणीच नाही. काळा पैसा भ्रष्टाचार या संदर्भात त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्‌द्‌यांशी असहमती दाखविणारा विरळाच असेल. परंतु त्यासाठी अवलंबिण्यात येणारे मार्ग असे नसावेत, की ज्यामुळे देशात सुस्थापित झालेली आणि येथील विविधतेस अनुकूल असलेली तिची जपणूक करणारी संसदीय लोकशाही पद्धतीच नष्ट होईल. याचे तारतम्य आवश्‍यक आहे. सरकारकडून भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांच्या विरोधात होणारी कारवाई ही मंद गतीची आहे, हा मुद्दाही पटणारा आहे. परंतु कोणतीही गोष्ट ही दोन मिनिटांत तयार होणाऱ्या मॅगी नूडल्ससारखी नसते.
रामदेवबाबांबद्दल आणखी एक मुद्दा! निव्वळ योगाच्या माध्यमातून मिळालेल्या लाखो अनुयायांचा आपल्या वैयक्तिक इच्छा-आकांक्षेसाठी उपयोग करून घेणे कोणत्या नीतिमत्तेत बसते? अण्णांच्या आंदोलनात बाबांच्या तुलनेत कदाचित कमी लोक आले असतील, परंतु ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. अगदी मध्यम उच्च मध्यमवर्गीय, टीव्हीवर चेहरे दाखविण्यासाठी मेणबत्त्या लावणारेही आपणहोऊन आले होते. तंबू लावून, एक हजार पंखे, सातशे कूलर्स लावून त्यांनी उपोषण केले नव्हते. महात्मा गांधी जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाच्या हेतूत स्पष्टता होती. आधी एखाद्या कारणाने अनुयायी तयार करायचे आणि मग त्यांचा वापर आपल्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठी करायचा, अशी नैतिक प्रतारणा या नेत्यांनी केली नाही. रामदेवबाबांच्या मंडपात हिंडताना उत्स्फूर्तपणाचा अभाव दिसून आला, तो याच कारणाने! प्रतिक्रिया हेरंब फडके, पुणे said: एकदम बरोबर..... रामदेवबाबांना त्यांची मते मांडण्याचा अधिकार आहे.....वाटले तर सरकारने ती नाकारावीत...पण दडपशाही नाही.. अनंत बागाईतकर यांच्या मते कुलर्स लावून उपोषण करणे हे संसदीय लोकशाहीला धरून नाही....एकांगी लेख आहे तुमचा.... बाबांच्या आंदोलनातले लोक उत्फूर्त नाहीत आणि आणणा च्या आंदोलनातले लोक उत्स्फूर्त हे कशावरून ठरवल? सरकारने झोपलेल्या शांत निदर्शकावर अश्रुधूर आणि लाठीचार्ज केला हे कुठल्या सुस्थापित, संसदीय लोकशाही घटनेमध्ये बसणारी बाब आहे यावर लेखकाने आम्हा मूर्खांस शहाणे करावे..आणि जर लोकशाही विस्थापित झाली असेन तर सामान्य नागरिक मग त्यात योगगुरू (जो सुद्धा या देशाचा नागरिक असतो), लोहार, सुतार, इंजिनिअर, वकील, डॉक्टर, पाणी-पुरी वाला, भेळवाला, आणि कुणीही भारतीयाने लोकशाही सुस्थापित करण्याचा प्रयत्न केला तर पोटशूळ का? शेवटी अनुभवातूनच माणूस शिकतो.. किंवा भेसलीचे पेट्रोल विकत नाही नाही असा पेट्रोल पंप दाखवून द्या किंवा एक महिन्याच्या आत कुठलाही दलाल गाठता, एक रुपयाही लाच देता रेशन कार्ड काढून दाखवा. या देशातल्या कुठलाही पोलीस ठाण्यावर जावून अपमान होता तक्रार नोंदवून दाखवा, तुमच्या जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट मिळवून दखवा. अर्थात हे सर्व तुम्ही बागाईतक आहात हे सांगता करून दाखवा, आणि मग सकाळ मध्ये लोकांना पटविण्याचा प्रयत्न करा कि भ्रष्टाचाराच्या विरोधात कुणीच नाही.
On 06/06/2011 01:54 AM jay said:
On 06/06/2011 07:52 AM atul said:
On 06/06/2011 10:22 AM
@jay, atul =
On 06/06/2011 09:54 AM Vaibhav said:

No comments:

Post a Comment