क्रेडिट कार्ड वापरताना अधिक सतर्क राहणे आज काळाची गरज बनली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने योग्य काळजी घेतल्यास यातील फसवणूक टाळता येणे शक्य आहे. त्याच बरोबर ‘स्मार्ट क्रेडिट कार्ड युजर’ म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी आपण काही चांगल्या सवयी लावल्यास नवीन क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट लिमिट वाढविण्यासही मदत होईल.
ऑनलाइन बँकिंग प्रमाणेच ई-पेमेंटचा पर्याय चांगलाच लोकप्रिय झाला आहे. शॉपिंग, ऑनलाइन तिकीट बुकिंग यासारख्या आर्थिक व्यवहारांसाठी क्रेडिट कार्डचा अधिकाअधिक वापर करण्यात येत आहे. क्रेडिट कार्डच्या वाढत्या वापराबरोबर या कार्डचा दुरुपयोगही वाढला आहे. अनेक वेळा कार्ड हरविल्यामुळे त्याचा गैरवापर केला जातो. नकली कार्डच्या माध्यमातून क्रेडिट कार्डधारकांच्या खात्यातील पैसेही उकळले जातात, फसवणूक केली जाते. क्रेडिट कार्डवर देण्यात येणाऱ्या क्रेडिट लिमिटचाही गैरवापर केला जातो. यामुळे क्रेडिट कार्ड वापरताना अधिक सतर्क राहणे काळाची गरज बनली आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने योग्य काळजी घेतल्यास यातील फसवणूक टाळता येणे शक्य आहे. त्याच बरोबर ‘स्मार्ट क्रेडिट कार्ड युजर’ म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी आपण काही चांगल्या सवयी लावल्यास नवीन क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट लिमिट वाढविण्यासही मदत होईल.
जर तुम्ही पहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घेणार असाल तर तुमच्यावर कर्जाचा डोंगर असता कामा नये. नामवंत बँकेकडून क्रेडिट कार्ड हवे असल्यास खातेधारकावर वैयक्तिक अथवा कुठल्याही प्रकारची कर्जे असता कामा नये. यामुळे आपली पत राखण्यास मदत होईल. तसेच बँकही आपल्याला क्रेडिट कार्ड देण्यास विश्वास दाखवतील.
जर तुम्हाला दुसरे नवीन कार्ड हवे असेल तर अगोदरच्या कार्डवरील तुमचा व्यवहार चांगला असावा. क्रेडिट कार्डची संख्या वाढविताना आपण कर्जाच्या खाईत तर जाणार नाही ना, याची काळजी घ्यावी. दिलेल्या क्रेडिटच्या 30 ते 50 टक्क्यांपर्यंत सरासरी वापर करावा. त्यापेक्षा अधिक किंवा ओव्हर लिमिट वापरल्यास तुम्ही कर्जामध्ये असल्याचा बँकेला अंदाज येईल. तसेच जर लिमिटचा वापर न केल्यास बँकेच्या नजरेत तुमची पत घसरेल, यामुळे भविष्यात लिमिट वाढविण्यासाठी तुम्हाला अडचणी येऊ शकतात.
क्रेडिट कार्डचे खाते बंद करताना बिलाची रक्कम थकीत ठेऊ नका. यामुळे तुमची क्रेडिट रेटींग नकारात्मक होऊ शकते. कुठल्या खरेदीसाठी कार्डचा वापर करणार याबाबत वर्गवारी करा. शुल्लक खरेदीसाठी कार्ड वापरू नका.
फसवणुकीची तक्रार
अनेक वेळा क्रेडिट कार्डचे येणारे अवाजवी बिल हे कार्डधारकांना डोकेदुखी ठरते. यामध्ये वापरापेक्षाही अधिक बिल पाठविण्यात येते. यावर आपणही ठीक आहे, पुढच्या महिन्यात कमी येईल, या विचाराने बिलाचा भरणा करत असतो. मात्र बिलाची रक्कम दर महिन्याला वाढतच असते. ही डोकेदुखी थांबविण्यासाठी या विरोधात तक्रार करणे गरजेचे आहे. यामध्ये कार्ड देणा-या बँकेकडे लिखित आणि ऑनलाइन स्वरूपात तक्रार करणे, त्या तक्रारीचा नंबर आणि इतर तपशील घेणे, तसेच त्या लिखित तक्रारीची एक झेरॉक्सही जवळ ठेवणे.
या तक्रारींवर एक ते दोन आठवडय़ामध्ये बँकेकडून काही कारवाई अथवा विचार न झाल्यास बँकांच्या ओम्बुड्समनकडे दाद मागू शकता. एक महिन्याच्या आता ओम्बुड्समनकडे तक्रार करता येऊ शकते. बँकेवर कारवाई करण्याचे अधिकार ओम्बुड्समनकडे असल्यामुळे तुमची तक्रार रास्त आणि खरी पाहिजे. त्याबाबतची माहिती ओम्बुड्समनसमोर स्पष्टपणे मांडता आली पाहिजे.
No comments:
Post a Comment